मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : सरप्राइझ देण्याच्या तयारीत पण परिणाम काय होईल माहितीये? पाहा राशिभविष्य

Daily Horoscope : सरप्राइझ देण्याच्या तयारीत पण परिणाम काय होईल माहितीये? पाहा राशिभविष्य

23 नोव्हेंबर 2022 रोजीचं 
सूर्यराशीनुसार राशिभविष्य.

23 नोव्हेंबर 2022 रोजीचं सूर्यराशीनुसार राशिभविष्य.

23 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं सूर्यराशीनुसार भविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 23 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

कौतुक करणाऱ्या प्रामाणिक प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत येतील आणि दिवस आनंदात जाईल. आज तुमची ऊर्जा खूप उत्साहाची असेल. दर दिवसाच्या तुलनेत आजच्या दिवसाचं व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी सलोखा निर्माण करा.

LUCKY SIGN - A red rose petal

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुम्हाला जोडीदाराचं बिनशर्त सहकार्य मिळेल. आरोग्यविषयक काही किरकोळ समस्या उद्भवू शकतील. कामाच्या ठिकाणी गोंधळापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. बँकेच्या कामाविषयी, तसंच नव्या गुंतवणुकीविषयी सावधगिरी बाळगा.

LUCKY SIGN - A cinnamon stick

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

आज तुमची सर्व प्रकारची भीती लांब ठेवा. आजचा दिवस विजयाचा आणि भविष्याबद्दलचं गंभीर नियोजन करण्याचा आहे. जवळचा मित्र जेलस असू शकतो. तुमचे गुप्त/जवळचे प्लॅन्स जाहीर करू नका. तुमच्या खाण्याच्या सवयींचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करा.

LUCKY SIGN - Pepper corns

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुमच्या कल्पना पुढे मांडण्याची संधी मिळेल. परदेशातली एखादी व्यक्ती तुमच्या प्रयत्नांची दखल घेईल आणि कौतुक करील. कोणाला तरी सरप्राइज देण्याचा तुमचा प्लॅन यशस्वी होईल.

LUCKY SIGN - A revolving disc

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहून किंवा पुस्तकं वाचून स्वतःला रिलॅक्स करा. काम तुलनेने कमी असेल; मात्र तुम्ही व्यग्र राहाल. प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण करू शकाल. पार्ट टाइम जॉब्जबद्दल पुन्हा एकदा काम करणं गरजेचं आहे.

LUCKY SIGN - A gold vase

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

आजचा दिवस हेक्टिक असेल; पण काही तरी सकारात्मक बातमी मिळेल. तुमच्या टीमला तुमच्याकडून अधिक इंटरॅक्टिव्ह सेशन्सची गरज आहे. घरच्या आघाडीच्या व्यवस्थापनासाठी तुमच्या जोडीदाराचं साह्य मिळेल.

LUCKY SIGN - A neon sign

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

आज तुमचे प्लॅन्स नीट अंमलात येत नसल्यासारखं वाटलं, तरी काळजी करू नका. लवकरच तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. ऐन वेळच्या प्रसंगासाठी ऐन वेळीच उपाय करावे लागतात. तुम्ही एक्सची वाट पाहत असलात, तर तो/ती परत येण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A yellow sapphire

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

निस्वार्थी वृत्तीने कोणाला तरी मदत केल्यानंतर तुम्हाला शांत वाटेल. छोटे वाद खूप मोठे होईपर्यंत ताणण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्ष आयुष्यातले शिकण्याचे अनुभव मिळतील. त्यांचा दिवस बाहेर जाईल.

LUCKY SIGN - A milestone

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना तुमचा दृष्टिकोन स्पष्ट होण्यास आता सुरुवात होईल. आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीत असलेल्यांसाठी आजचा दिवस रिवॉर्डिंग असेल. साधा दृष्टिकोन आज उपयुक्त ठरेल. डॉक्टर्सनी त्यांच्याकडचे रेकॉर्ड्स अधिक शिस्तबद्धपणे ठेवणं गरजेचं आहे.

LUCKY SIGN - A shimmering shoe

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुमचा आतला आवाज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष केंद्रित करून ऐका. एखादा मित्र तुम्हाला कॉल करील आणि तुमचा उत्तम संवाद होईल. शेजाऱ्यांकडे एखादी आश्चर्यचकित करणारी बातमी असेल.

LUCKY SIGN - Eucalyptus tree

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

एखाद्या गैरसमजुतीमुळे भविष्यात मोठा गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असतानाच गोष्टी स्पष्ट करा. पार्टनरला तुमच्याबद्दल पझेसिव्ह वाटेल. दुपारच्या वेळेस तुम्हाला कंटाळवाणं किंवा त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे. तुमच्या एखाद्या वरिष्ठाला तुमची गरज भासण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A grey coat

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

एखादा गंभीर गैरसमज होणं टाळता येईल. तुमची भावनिक बाजू काळजीचं कारण ठरू शकेल. फॅमिली आउटिंगचा प्लॅन ठरू शकेल. तुमचे आई-वडील प्रवासाचा बेत आखतील.

LUCKY SIGN - A blue bag

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs