मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : भरकटलात, दिशाहीन झालात; आजच्या राशिभविष्यात सापडेल योग्य मार्ग

Daily Horoscope : भरकटलात, दिशाहीन झालात; आजच्या राशिभविष्यात सापडेल योग्य मार्ग

22 नोव्हेंबर 2022 रोजीचं राशिभविष्य.

22 नोव्हेंबर 2022 रोजीचं राशिभविष्य.

22 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं सूर्यराशीनुसार भविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 22 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

जवळचा फॅमिली फ्रेंड नव्या कामाची संधी सुचवू शकेल. दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित परिणाम साध्य होऊ शकतील. एखाद्या ट्रिपचा अनुभव दीर्घ काळ मनावर टिकणारा परिणाम करील.

LUCKY SIGN - A butterfly

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

उच्च शिक्षण किंवा कौशल्यवृद्धीसाठी आता काळ अनुकूल असेल. तुम्हाला ग्रँट किंवा मदत मिळू शकते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आईला त्रासदायक वाटेल आणि ती शीघ्रकोपी बनेल.

LUCKY SIGN - A neon sign

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुमच्या नियोजनानुसार झेप घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. व्यवसायाची कल्पना सुरुवातीला चांगले रिझल्ट्स देईल. औपचारिकरीत्या आलेला विवाहाचा प्रस्ताव चांगला ठरेल.

LUCKY SIGN – A Salon

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

काम आवाक्यातलं, पण व्यग्र ठेवणारं असेल. लीगल केसमध्ये सहभाग असेल, तर तुमचे पुरावे सुरक्षित राहतील याची काळजी घ्या. कोणी तरी जवळची व्यक्ती तुमच्याबद्दलची गुप्त माहिती देण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल.

LUCKY SIGN – Antique article

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल विश्‍वास वाटत असेल, तर आता इतरांचीही त्याला सहमती मिळेल. कामात काहीशा अस्वस्थतेच्या काळाचे संकेत आहेत. तुमच्यातल्या राक्षसी वृत्ती वारंवार तुमचं लक्ष विचलित करतील. त्याकडे जास्त लक्ष दिलं जाणार नाही, याची काळजी घ्या.

LUCKY SIGN - A silver coin

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुमची भावंडं किंवा जवळच्या मित्रांकडून तुमच्या कौशल्याची चाचणी घेतली जाईल. व्यक्तिमत्त्वात थोडासा बदल होण्याचे संकेत आहेत. तो स्वयंजागरूकतेतून होईल आणि चांगल्यासाठी असेल. स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं खूप उपयुक्त ठरेल.

LUCKY SIGN - A kite

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

भूतकाळातल्या काही तीव्र आठवणी तुमचा नवा दृष्टिकोन ठरवतील. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत तुम्ही दक्ष राहाल. थोड्या चांगल्या आर्थिक प्रगतीमुळे तुमची गाडी पुन्हा रुळावर येईल. तुम्ही स्वतःवर खूपच टीका करत असल्याचं लक्षात येईल.

LUCKY SIGN - A blue car

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

इतरांवर दबाव आणण्याचे तुमचे डावपेच आता अयशस्वी ठरतील. तुम्ही आता तुमच्या आजूबाजूच्या काही व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकाल. अधिकारपदावर असलात, तर चांगला प्रभाव पाडणं सुरू ठेवाल. रिअल इस्टेट क्षेत्रातल्या व्यक्तींना चांगला नफा मिळू शकतो.

LUCKY SIGN – Your favourite sweet

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

नव्या विचारांच्या गर्दीने मन भरकटेल, दिशाहीन झाल्यासारखं वाटेल. कार्यक्षेत्रातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती भेटेल, जिचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल. रोमँटिक नात्याला क्वालिटी टाइम देण्याची गरज आहे.

LUCKY SIGN - An indoor plant

मकर (Capricorn) ( 22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुम्ही एखाद्या व्यक्तीशी नातं जोडण्याचा किंवा एखादी प्रगतीची संधी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी मनापासून कसून प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुम्हाला अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि फ्रेंडली वाटेल. तुमच्या जोडीदाराची सूचना विचारात घेण्यासारखी असेल.

LUCKY SIGN - A candle stand

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

आतापर्यंत ज्यांनी इतरांचं वर्चस्व सहन केलं आहे ते आता आपली भूमिका बरोबर उलट करण्यासाठी सक्रियपणे विचार करू शकतात. काही वेळा तुम्ही भावनाविवश व्हाल. नव्या जॉबच्या शोधात असाल तर आता चांगल्या संधी दिसायला सुरुवात होऊ शकेल.

LUCKY SIGN – A yellow stone

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

ऊर्जेची साथ नसल्यासारखं वाटेल. आज तुम्ही जे काम करू इच्छिता, त्या इच्छेला कृतीचं पाठबळ मिळणार नाही. पब्लिक डीलिंग क्षेत्रात व्यवहार करणाऱ्यांनी गैरसमजूत टाळण्यासाठी सावधगिरीने संवाद साधण्याची गरज आहे.

LUCKY SIGN - A cup holder

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs