• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • Daily Horoscope : 2 राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अडचणीचा; जरा जपून राहा

Daily Horoscope : 2 राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अडचणीचा; जरा जपून राहा

आज तुमच्या राशीत काय आहे पाहा.

  • Share this:
आज सोमवार दिनांक 22  नोव्हेंबर 2021 तिथी कार्तिक कृष्ण  तृतीया. चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष व्यवसाय वाढीस लागेल. महत्त्वाचा फोन येऊन चर्चा होईल. कौटुंबिक सुख लाभेल. थोडं मानसिक द्वंद्व चालू राहील. हितशत्रू त्रास देतील. आर्थिक बाजू चांगली राहिल. दिवस उत्तम आहे. वृषभ पैशांसंबंधी महत्त्वाचा आठवडा आहे. घरात काही तरी योग्य निर्णय होईल. भावंडांची प्रगती होईल. आर्थिक लाभ संभवतात. गुरु कृपा कामात मदत करेल. दिवस चांगला जाईल. मिथुन राशीतील चंद्र गुरूशी नवपंचम योग करत आहे. दिवस शुभ आणि आनंदी आहे. थोडा खर्च होईल. पण कुटुंब त्यामुळे खुश राहील. अष्टम शनि फक्त जपून राहण्याचा संकेत देतो आहे. दिवस शुभ कर्क आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बुध आता पुढच्या राशीत जाण्याची वेळ आली आहे. महत्त्वाचा निर्णय  सरकारी कामे उरकून घ्या. दिवस मध्यम  जाईल. सिंह आज दिवस झपाट्याने कामे मार्गी लावण्यास मदत करेल. राशीच्या तृतीय स्थानातील मंगळ ऊर्जा आणि तेज निर्माण करेल. जे चांगल्या कामासाठी वापरले तर फायदा होईल. प्रभावशाली दिवस. कन्या दशमातील चंद्र आज कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचा बदल घडवून आणेल. रखडलेलं काम ताबडतोब मार्गी लागेल. घरातले सगळे मदत करतील. प्रकृती जपा. दिवस शुभ आहे. तुला आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक उन्नती दाखवत आहे. काही प्रवास, भेटी आणि धार्मिक कार्य संभवतात. थोडी दगदग होईल. पण दिवस चांगला जाईल. वृश्चिक शारीरिक दुखणी विशेष करून अंगदुखी त्रास देईल. मन थोडं उद्विग्न राहिल. पण शांत रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. दिवस  मध्यम आहे. धनु आज काहींना मौजमजेसाठी वेळ काढावा असं वाटेल. जोडीदार मदत करेल. त्यांच्यासोबत वेळ घालवा. कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. दिवस शुभ. मकर आज नवीन लोक भेटतील. बौद्धिक पातळीवर तुम्ही चमकून जाल. वाहन अगदी जपून चालवा. दशम शुक्र उत्तम संधी मिळवून देईल. जोडीदाराचा योग्य सल्ला ऐका. दिवस चांगला जाईल. कुंभ आज संतती सुख भरपूर लाभेल. मुलं मनासारखी वागतील. शत्रू तुम्हाला घाबरून राहतील. मंगळाचा जप करावा. जोडीदाराला  जपावं. वाद नको. दिवस शुभ. मीन आज तुम्हाला दिवस निवांत आणि फार दगदग ना करता घालवायचा आहे. घरात जास्तीचं काम पडेल. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी. संतती चिंता कमी होईल. दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published: