मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily horoscope : आज या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी कुणासाठी ठरणार फलदायी?

Daily horoscope : आज या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी कुणासाठी ठरणार फलदायी?

Daily horoscope : आज संकष्टी चतुर्थी (Sankashti chaturthi) असून तुमचं आजचं राशिभविष्य काय आहे पाहा.

Daily horoscope : आज संकष्टी चतुर्थी (Sankashti chaturthi) असून तुमचं आजचं राशिभविष्य काय आहे पाहा.

Daily horoscope : आज संकष्टी चतुर्थी (Sankashti chaturthi) असून तुमचं आजचं राशिभविष्य काय आहे पाहा.

आज बुधवार दिनांक 22 डिसेंबर, 2021 तिथी मार्गशीर्ष कृष्ण तृतीया/चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. चंद्र पुष्य नक्षत्रात भ्रमण करेल. तिथून तो मंगळाशी नवपंचम योग करेल. गणरायाला वंदन करून पाहूया आजचं बारा राशींचं भविष्य. मेष आज चंद्र उच्चीचा असून तुम्हाला उत्तम गृहसौख्य देईल. घरात शुभता येईल. घर सजावट, साफसफाई यात दिवस जाईल. खरेदी कराल. समारंभ आयोजित कराल. शुभ दिवस. वृषभ आज तृतीय चंद्र आहे, प्रवास  घडेल. काही महत्त्वाचे संपर्क होतील. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. मौल्यवान वस्तू खरेदी करणं शुभ राहिल. दिवस आनंदात घालवा. मिथुन आज धन स्थानातील ग्रह कुठूनतरी आर्थिक लाभ मिळवून देणार आहेत. कुटुंब सुख मिळेल. कुटुंबीयांना हवा तसा वेळ द्याल. कुटुंबियांसाठी खरेदी कराल. दिवस शुभ आहे. कर्क राशीच्या पंचमात केतू मंगळ आहेत. जपुन रहा. संततीची काळजी घ्या. राशीतील उच्च चंद्र अणि सप्तम शुक्र शुभ फल देईल. प्रवास किंवा आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम. सिंह आज चंद्र बाराव्या स्थानात असून काही नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. धार्मिक बाबींसाठी खर्च संभवतो. मुलं खूश राहतील. दिवस मध्यम आहे. कन्या आज दिवस मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत मजा करण्याचा आहे. लाभ होतील. नवीन खरेदी होईल. प्रकृती साथ देईल. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. दिवस शुभ आहे. तुला आज अचानक काम आलं तरी करावं लागेल. त्यासाठी काही नियोजन करून ठेवा. घरीदेखील वेळ द्या. मंगळ तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. दिवस बरा जाईल. वृश्चिक चंद्राच्या भाग्य स्थानातील शुभ प्रभावात असलेल्या वृश्चिक व्यक्तींना आज आनंदी राहण्याचा संकेत आहे. परोपकार, हाती घेतलेल्या कामात यश आणि प्रशंसा मिळेल. दिवस शुभ आहे. धनु आज अष्टमात आलेला चंद्र शारीरिक त्रास दर्शवतो. घरी आरामात रहा. वाहन चालवणं टाळा. आर्थिक नुकसान संभवते. एकूण मिश्र फळ देणारा दिवस आहे. मकर सप्तम चंद्र, शनिच्या प्रतियोगात आहे. थोडी नकारात्मक मानसिकता होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. आर्थिक स्थिती ठीक. दिवस चांगला. कुंभ आज दिवसभर थकवा वाटेल. आराम करा. कोणाशी बोलाचाली करू नका. शत्रू निर्माण होतील. आर्थिक व्यवहार टाळा. उपासनेत वेळ घालवा. दिवस मध्यम जाईल मीन आज दिवस मुलांच्या मागण्या, पुरवण्यात जाणार आहे. अध्यात्मिक साधना  होईल. वाचन किंवा अभ्यास उत्तम होईल. दिवस आनंदात घालवा. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या