मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : कामाच्या ठिकाणी पाळा डेडलाइन्स, मिळू शकते मोठी संधी; वाचा राशीभविष्य

Daily Horoscope : कामाच्या ठिकाणी पाळा डेडलाइन्स, मिळू शकते मोठी संधी; वाचा राशीभविष्य

Daily Horoscope : कामाच्या ठिकाणी पाळा डेडलाइन्स, मिळू शकते मोठी संधी; वाचा राशीभविष्य

Daily Horoscope : कामाच्या ठिकाणी पाळा डेडलाइन्स, मिळू शकते मोठी संधी; वाचा राशीभविष्य

21 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं सूर्यराशीनुसार भविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 21 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःचे लाड करणं या गोष्टी तुम्ही पुढे ढकलत असाल, तर आज तुम्हाला त्यासाठी काही वेळ मिळू शकतो. कोणी तरी विनाकारण तुम्हाला जज करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुमचं ऑफिसचं काम अप टू द मार्क ठेवा. कारण अचानक तपासणी होण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A selenite

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुमच्या आउटिंग प्लॅन्सची अंमलबजावणी करण्याची ही वेळ आहे. कारण सोशियलायझिंगचे संकेत आहेत. आज मित्रमंडळी आणि तुमच्या आजूबाजूच्या मंडळींमध्ये आनंद शोधण्याचा दिवस आहे. आर्थिक प्रगतीचे चांगले संकेत आहेत. अडकलेला रोखीचा प्रवाह सुधारेल.

LUCKY SIGN - Tourmaline

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त वेळ सत्कारणी लावा. कारण तुम्ही जे काही पूर्ण करू इच्छिता त्या अनुषंगाने ऊर्जा मिळणार असल्याचे संकेत आहेत. तुमचा बॉस अधिक मोठ्या संधीसाठी तुमचं नाव सुचवू शकतो. एखाद्या स्पेशल व्यक्तीकडून तुम्हाला संध्याकाळी ट्रीट मिळण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A sand stone

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुम्ही तुमच्यासाठी शॉपिंगचं नियोजन केलं असेल, तर तुम्ही त्यात स्वतःचे लाड पुरवाल. कामाच्या ठिकाणी डेडलाइन्स पाळाव्या लागतील. घरगुती मदतनीसाकडून नेहमीच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - Tree of life

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

आज तुमच्यासाठी टीमवर्क उपयुक्त ठरेल. कोलॅबोरेशनची संधी मिळाली, तर ती तुम्ही आवर्जून स्वीकारली पाहिजे. घरी झालेल्या वादावादीमुळे तुमचा दिवस प्रभावित होईल. ते सोडून द्या.

LUCKY SIGN - Steel box

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुमचं काम अडकून पडत असेल आणि ते सुरळीत होण्यासाठी कोणाचा तरी इगो सुखावण्याची गरज असेल, तर ते आत्ता करा. दीर्घकालीन नियोजन फायद्याचं ठरेल. आज रात्री पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही पुरेसे तयार आहात ना, याची खात्री करा.

LUCKY SIGN - A ruby

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

घरी किंवा व्हर्च्युअली भावंडांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाची मागणी जास्त असेल. तुमच्या योगदानाचा फेरआढावा घ्यावा लागेल. विनाकारण घेतलेला अतिप्रचंड ताण त्रासदायक ठरेल.

LUCKY SIGN - A blue sapphire

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

तुमची नैसर्गिक पॅशन कधीच मरू देणार नाही, ती कायम जिवंत ठेवेन, अशी स्वतःशी प्रतिज्ञा करा. त्याची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवसाकडे प्रगतीची ऊर्जा असेल. त्यामुळे जे काही सुरू कराल, ते पूर्ण करू शकाल.

LUCKY SIGN - Yellow glass

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

खूप दुरून किंवा परदेशातून आलेल्या कॉलमुळे तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला खास वाटेल. छोट्या ट्रिपचा प्लॅन तयार करू शकता. तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपला काही प्रश्नांची तातडीने उत्तरं हवी आहेत. स्पर्धेवर बारीक नजर ठेवा.

LUCKY SIGN - A red coral

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

एखादं नवं रूटीन सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखादं पुस्तक किंवा लेख वाचून प्रेरणा मिळू शकेल. तुम्ही एखादी गोष्ट हरवली आहे असं समजत होतात, ती सापडू शकेल. तुमच्या गरजांचे प्राधान्यक्रम निश्चित करा.

LUCKY SIGN - Few birds

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुम्ही जे करण्याबाबत चिंतन करत आहात, त्यात संथ प्रगतीची चिन्हं दिसतील. तुमच्या इन्स्टिंक्टनुसार काम करा. नकारात्मक भावनांना आवर घाला. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाच्या रिझल्ट्सचा असेल; मात्र ते रिझल्ट्स स्थिर असण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - Amethyst

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

चांगल्या सजेशनमुळे बराच मौल्यवान वेळ वाचेल. बराच काळ थांबवलेला निर्णय घेण्यासाठी आता तुम्हाला कॉन्फिडन्ट आणि कन्व्हिन्स्ड वाटेल. कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य असेल. स्वतःला उपलब्ध ठेवण्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतील.

LUCKY SIGN - A garnet stone

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya