मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : पैशाशी संबंधित समस्यांकडं गांभीर्यानं द्या लक्ष, टाळाटाळ करणं येईल अंगलट

Daily Horoscope : पैशाशी संबंधित समस्यांकडं गांभीर्यानं द्या लक्ष, टाळाटाळ करणं येईल अंगलट

Daily Horoscope : पैशाशी संबंधित समस्यांकडं गांभीर्यानं द्या लक्ष, टाळाटाळ करणं येईल अंगलट

Daily Horoscope : पैशाशी संबंधित समस्यांकडं गांभीर्यानं द्या लक्ष, टाळाटाळ करणं येईल अंगलट

20 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं सूर्यराशीनुसार भविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

संकटाच्या आणि निराशेवेळी, तुम्ही तुमच्या जुन्या आवडींकडे परत जाण्याचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला कधीकधी गतिहीन जीवनात अडकल्यासारखं वाटेल. पण, याला लवकरच गती मिळेल. हा फक्त एक मधला टप्पा आहे. पैशाशी संबंधित प्रकरणंही आठवडाभरात मार्गी लागतील. तुमच्यापैकी काहींना मानसिक आनंदासाठी पाळीव प्राणी घरी आणावेसे वाटेल. नवीन संबंध आणि नवीन संपर्क तयार करण्यापेक्षा आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये गुंतल्यास तुम्हाला जास्त चांगलं वाटेल.

LUCKY SIGN - An Open Gate

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

जर एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल, तर तिच्याकडे आता जाणीवपूर्वक लक्ष द्या. प्रकरण जास्त काळ खेचणं योग्य नाही. एक अनोखी आणि वेगळी संधी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही ताबडतोब निर्णय न घेतल्यास ती दुसऱ्याकडे जाऊ शकते. राग किंवा चिडचिड झाल्यामुळे तुम्ही काही काळासाठी बुचकळ्यात पडू शकता. गोष्टी मार्गी लागण्याची किंवा रिअॅडजस्ट होण्याची शक्यता. त्यासाठी शक्य असेल तिथे सहकार्य करा.

LUCKY SIGN - A Bone China Set

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

कोणत्याही चर्चेदरम्यान सुरुवातीला शांत राहून निरीक्षण करणं आणि नंतर आपले विचार मांडून योगदान देणं, हा तुमचा स्वभाव आहे. मात्र, या वेळी तुम्ही सुरुवातीपासूनच गुंतू शकता. पूर्वाश्रमीच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती तुमचा मागील काही महिन्यांपासून पाठलाग करत आहे. त्यामुळे लवकरच अनौपचारिक संभाषण किंवा शुभेच्छांची देवाण-घेवाण अपेक्षित आहे. तुम्ही तुमच्या कामातील वचनबद्धता व्यवस्थित करण्याचा विचार करत आहात. पण, वेळ तुम्हाला साथ देत नाही. पुढील काही दिवस असंच सुरू राहील.

LUCKY SIGN - An Amethyst

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

येत्या आठवड्याभरात प्रवास आणि धावपळ होईल. तुम्ही करत असलेल्या कामाला नवीन आयाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सोयीनुसार नवीन वेळापत्रक तयार केल्यास मदत होऊ शकते. तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर आणि दृढ आहात. तुमचं कुटुंब काही काळासाठी तुमच्यापासून डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटू शकतं. पण, नंतर सर्व सुरळीत होईल. तुम्ही तुमच्या घराची पुनर्रचना करण्याचा विचार करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तर दिशा अनुकूल ठरू शकते.

LUCKY SIGN - A sparkling painting

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

बऱ्याच काळापासून मनातच राहिलेली पॅशन आता प्रत्यक्षात आणल्यास फलदायी होईल असं वाटेल. तुम्हीही ते शेअर करण्यात अधिक आत्मविश्वास बाळगता. ज्या तुम्हाला अजूनही साथ देतील अशा जुन्या गोष्टी आणि व्यक्तींवर विश्वास ठेवा. नवीन गोष्टी आणि व्यक्तींना तो टप्पा गाठण्यास वेळ लागेल. एखादा सहकारी तुमच्या जीवनाचा एक भाग बनण्यास सुरवात करेल. अलीकडच्या काळात तुम्‍हाला भावनांबद्दल फारशी खात्री नव्हती. पण, सध्‍याची एनर्जी तुम्‍हाला या स्थितीतून बाहेर काढेल. कोणत्याही प्रकारचं व्यसन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. ते सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.

LUCKY SIGN - An Indoor Palm

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुमच्या आयुष्यातील मागील काही महिन्यांतील घडामोडी या दिवास्वप्नासारख्या आहेत. त्या दिशेनेही कृती करण्याची वेळ आली आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याबाबत काही संकेत मिळू शकतात. तुम्ही त्यांचा थोड्या काळासाठी विचार करू शकता पण त्यातून झटपट पैसे कमवता येतील. तुम्हाला मित्र आणि कामाची वेळ मॅनेज करण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल. तुमचा निर्णय पुढील काही महिन्यांत, विशेषत: कामानुसार आकारास येईल. कामाशी संबंधित प्रवास घडण्याचे योग आहेत.

LUCKY SIGN - An old favorite watch

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

आयुष्यात स्मार्ट पर्याय जुन्या तंत्रांपेक्षा अधिक फायद्याचे ठरतील. काही नवीन नियमांनुसार तुमचं आयुष्य अॅडजेस्ट करा. अधिक लवचिक आणि कोणीही सहज मदत मागेल असे स्वभावात बदल करा. आगामी काळात तुमच्या आयुष्यात फारशी मोठी घडामोड होणार नाही. त्यामुळे तुम्हाला ते कंटाळवाणं आणि दिशाहीन वाटू शकतं. तुमच्यापेक्षा वयानं लहान व्यक्ती तुम्हाला प्रेरणा देऊ शकते. जुन्या गोष्टी नव्या पद्धतीने करण्यात व्यस्त रहा.

LUCKY SIGN - A Copper Tumbler

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

तुमची विशलिस्ट तयार ठेवा. आता ती उघड होण्याची आणि पूर्ण होण्याची वेळ आली आहे. ज्या गोष्टी पूर्ण करण्याचा तुमचा हेतू होता त्यातील काही गोष्टी पूर्ण होताना दिसतील. नातेसंबंध दृढ होतील आणि एकमेकांचं कौतुकही कराल. आर्थिक गुंतवणुकीबद्दल विचार करण्यासाठी चांगली वेळ आहे. तुमच्याकडे असलेल्या पर्यायांची व्यवस्थित मांडणी करा. प्रवास करत असाल तर सामानाची काळजी घ्या. भूतकाळातील काही महत्त्वाच्या नसलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते.

LUCKY SIGN - A cracked glass

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्हाला एकाचवेळी अनेक गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामध्ये कौटुंबिक आणि कामाशी संबंधित गोष्टींचा समावेश असेल. या दोन्ही गोष्टी हाताळणं शक्य आहे असं तुम्हाला वाटेल. तरीदेखील कौटुंबिक गोष्टी काहीशा मागे पडतील. त्यांच्यासाठीही पुरेसा वेळ काढा. कामाच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तींशी स्पष्ट संवाद ठेवा. तुमचे वरिष्ठ तुमच्या टीमशी थेट संवाद साधतील. जर तुम्ही नवीन भागीदारीचा विचार करत असाल तर त्यासाठी आता योग्य वेळ आली आहे.

LUCKY SIGN - Two Sparrows

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

कोणत्याही प्रकारच्या कर्जामुळे आता थोडा त्रास होऊ शकतो. ते व्यवस्थापित करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. या वर्षी एखादं नवीन वाहन घेण्याचा योग आहे. तुम्हाला लवकरच ते अपग्रेड करण्याची गरज वाटू शकते. प्रलंबित असलेली कागदोपत्री व्यवहार व्यवस्थित करावे लागतील. तुमची आई तुमची सर्वोत्तम समर्थक आहे. तिचा तुमच्यावरील विश्वास टिकवून ठेवा. लवकरच तुम्‍हाला तुमच्‍या स्‍क्रीन टाईमवर अंकुश ठेवावा लागेल. डोळ्यांमध्ये काही समस्या असू शकतात त्यांच्याकडं लक्ष देणं आवश्यक आहे.

LUCKY SIGN - A Pastel curtain

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमच्या सभोवतालच्या लोकांना आनंदी ठेवण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवा. त्यामुळं तुमच्या ओळखी वाढतील. या ओळखींपैकी काहींना तुमच्याकडून संवाद सुरू करण्याची अपेक्षा असेल. तुमच्या ओळखीतील व्यक्तींकडून फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन आणि सखोल आध्यात्मिक दिनचर्येमध्ये गुंतण्यासाठी ही चांगली वेळ आहे. कधीकधी योग्य प्रशिक्षण चांगल्या सुरुवातीचा पाया ठेवण्यास मदत करू शकते. प्रभावशाली व्यक्तींशी तुमची भेट होण्याची शक्यता आहे. घरी स्वयंपाक करायला तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आवडेल.

LUCKY SIGN - A distinct doorbell

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

सध्याचा काळ मानसिक शांतता देणार आहे, असं एनर्जी सुचवतात. तरीही तुम्हाला शारीरिकदृष्टया बांधून ठेवल्यासारखं वाटेल. त्यामुळे आजूबाजूला फार फिरता येणार नाही. तुमचा ऑनलाइन वावर अचानक वाढेल. मुलांना तुमच्याकडून संभाषण आणि इन्व्हॉल्व्हमेंची अपेक्षा असू शकते. एखाद्या जुन्या मित्रामुळं तुम्हाला नॉस्टॅल्जिक वाटेल. तो तुमच्यासोबत एखादा प्लॅन करेल. तुम्‍हाला काही विशिष्ट स्‍वप्‍नं दिसू शकतात. ती तुमच्या सबकॉन्शिअस मनातील घडामोडींचा भाग असतील. त्यांना खूप गांभीर्यानं घेऊ नका.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya