मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Daily horoscope : प्रवासाचा प्लॅन करत असाल तर आजचा दिवस उत्तम

Daily horoscope : प्रवासाचा प्लॅन करत असाल तर आजचा दिवस उत्तम

Photo: Shutterstock

Photo: Shutterstock

Daily horoscope 20 February 2022 : तुमच्या सूर्यराशीनुसार तुमचा रविवार कसा जाणार पाहा.

  सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

  अर्धवट राहिलेली कामं पुन्हा सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही पुढे काय करावं याचा सल्ला देण्यासाठी अनेक लोक पुढे येतील मात्र, 'ऐकावे जनाचे,करावे मनाचे', हे लक्षात ठेवा आणि तुमच्या आवडीलाच प्राधान्य द्या. तुमच्या जवळची व्यक्ती लांबच्या सहलीला जाण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. भावनिक संतुलन राखण्यासाठी तुम्हाला समुपदेशकांची मदत घ्यावीशी वाटेल.

  LUCKY SIGN – एक सावकाश जाणारं वाहन (A slow moving vehicle)

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  तुम्हाला अतिशय आवडणारी एखादी गोष्ट कायमची तुम्हाला मिळू शकते. कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर त्याचं नियोजन करण्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. आजारपणातून किंवा एखाद्या शारीरिक व्याधीतून बरं होण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी मनाला उत्साह देणारं, आरामदायी ठिकाण अचानकच सापडेल. इतरांवर सहज विश्वास ठेवण्याच्या तुमच्या वृत्तीनं तुमचं नुकसान होतं. तेव्हा विश्वास ठेवताना नीट पारख करून घ्या. अपचनाचा त्रास होऊ शकतो.

  LUCKY SIGN – सुकलेलं फूल (A dry flower)

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  आत्तापर्यंत सगळं काही तुमच्या अंदाजाप्रमाणेच घडत असेल, तर त्यात बदल करण्याचा प्रयत्न करू नका. सध्याचा काळ घडत असलेल्या गोष्टींच्या विरुद्ध जाण्यासाठी योग्य नाही. काही न ठरलेले बेत अचानक अंमलात आणावे लागतील; पण त्यातून चांगलंच घडेल. काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा निर्माण होईल. कामाच्या बाबतीत सहकाऱ्यांची मदत घेणं फायदेशीर ठरू शकतं. वेळेचं व्यवस्थापन महत्त्वाचं ठरेल. सध्या काही सहलीच्या, प्रवासाच्या योजना आखत असाल तर, त्या प्रत्यक्षात येतील.

  LUCKY SIGN – सिरॅमिक बाऊल (A ceramic bowl)

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या गोपनीय गोष्टी उघड करण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्यामुळे विश्वासघात झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर त्यात यश मिळेल. स्वत:ला दोष देणं थांबवा, तुमच्या या सवयीमुळे तुम्ही ज्या गोष्टीसाठी जबाबदार नाही त्यासाठीदेखील विनाकारण अपराधीपणाचं ओझे बाळगाल. तुम्हाला आयुष्यात काहीतरी नावीन्य हवं असेल तर अनेक पर्याय उपलब्ध होतील. वाढत्या खर्चामुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

  LUCKY SIGN – शटल (A shuttle)

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  तुमच्या आक्रमक स्वभावामुळे एखाद्या व्यक्तीला तुमचा राग येऊ शकतो आणि त्यातून वाद वाढू शकतो. पुन्हा एकदा नव्या उत्साहानं व्यायाम सुरू करण्याची योजना आखत असाल, तर त्यात यश येईल पण काही अडथळेही येतील. पुढचा आठवडा फार धावपळीचा नसेल; मात्र आधी कबूल केलेल्या कामांमुळे वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन करण्यासाठी उत्तम वेळ आहे. परिस्थितीनुरूप तुमच्या आजूबाजूलाही काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे, कदाचित हे बदल दीर्घकालीन असतील. मुलांकडे अधिक लक्ष द्या, त्यांच्यासाठी आवर्जून थोडा वेळ काढा.

  LUCKY SIGN – सूर्योदय (A sunrise)

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  कोणतंही ध्येय न ठेवता एखाद्या गोष्टीच्या मागे लागलात तर मानसिक थकवा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोष्टी सोप्या ठेवा ज्यामुळे पुढं जाण्यास मदत मिळेल. मनात अनेक गोष्टींमुळे गोंधळ निर्माण झाला असेल तर सध्या त्याकडे लक्ष न देणं योग्य ठरेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळं राहील अशी साधी दिनचर्या आखण्याची गरज आहे. तुमचा जोडीदार नेहमीपेक्षा जास्त आग्रही झाल्याचं वाटू शकतं. तुम्हाला तुमची भूमिका मांडण्याची संधी मिळू शकते.

  LUCKY SIGN – जायफळ (A nutmeg)

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  पूर्वी तुम्हाला नावं ठेवणारी व्यक्ती आता चांगली मित्र बनू शकते. शिस्तबद्ध रूटिन पाळण्याचा प्रयत्न करत असाल, तर काही काळासाठी त्यात अडथळा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी गडबड गोंधळामुळे कामावरचं लक्ष विचलित होऊ शकतं, परंतु त्याचा ताण घरी आणू नका. घरातील प्रसन्न कौटुंबिक वातावरण तुम्हाला शांतता, मनस्वास्थ देईल ज्याची तुम्हाला गरज असेल, अपेक्षा असेल. तुमच्यापेक्षा वयानं लहान असणारी एखादी व्यक्ती तुम्हाला आदर्श मानत असेल.

  LUCKY SIGN - ब्लॅक कॉफी मग (A black coffee mug)

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  परदेशात जाण्याची तुमची तीव्र इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. घटस्फोटासारख्या समस्या दूर होण्याची शक्यता आहे. एकाच गोष्टीवर अनेकांची मतं घेतल्यानं मनात गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे त्याबाबतीत एकच मत पक्कं करा आणि त्याआधारे काम करा. परस्पर विरुद्ध मतांमुळे, बोलण्यांमुळे गोंधळ निर्माण होतो. दिवसअखेरीस त्यावर फार उहापोह करण्याची गरज नसल्याचं लक्षात येईल आणि तेच उपयोगाचं ठरेल. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात पुढे येईल.

  LUCKY SIGN – बॉटल ओपनर (A bottle opener)

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  मस्करी करणं, खिल्ली उडवणं आणि ताण दूर करण्यासाठी हलकेफुलके विनोद करणं यात मोठा फरक आहे, हे लक्षात घ्या आणि त्यानुसार संभाषण करा. अन्यथा तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ निघू शकतो. आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास याच्यातील सीमारेषा ओळखण्यास शिका. तुम्ही शिक्षकी पेशात असाल, तर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या वागण्या-बोलण्यात फरक असल्याचं जाणवू शकतं. यापुढे तुम्हाला नेमकी गरज कुठे आहे आणि तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे, याचा योग्य विचार करून काम करण्याची गरज आहे. तुम्हाला एखादा आश्चर्याचा धक्का बसू शकतो. घरात किंवा घराबाहेर आज कामाचा भार हलका असेल.

  LUCKY SIGN - सुरवंट (A caterpillar)

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  तुमचा स्वभाव, वृत्ती कशी आहे याबाबत इतरांना पूर्ण अंदाज आलेला असेल. त्यामुळं तुमच्या स्वभावाबद्दल अगदी ठामपणे सांगणारी एखादी व्यक्ती तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. एखादं नवीन कौशल्य प्राधान्यानं आत्मसात करणं गरजेचं आहे. यामुळं तुम्हाला मोठं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कंटाळवाणे वाटत असेल पण काही काळातच त्यात बदल होईल. एखादी व्यक्ती तुमच्यापासून खूप दूर असेल; पण ती तुमचाच विचार करत असेल. वडिलांची प्रकृती बरी नसेल तर भावनिकरित्या देखील तुम्ही त्यांच्याबरोबर आहात याची त्यांना खात्री करून द्या. टप्प्याटप्प्यानं एखादं काम पूर्ण करणं त्यात चांगलं यश देईल.

  LUCKY SIGN – वेलवेटचं कुशन (A velvet cushion)

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  पाणी तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकते. योग्य पद्धतीनं ऊर्जा मिळाल्यानं तुम्हाला अधिक ठाम आणि स्थिर वाटेल. एखादं काम स्वीकारलेलं असेल तर त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी योग्य रणनीती आखून काम सुरू करा. रिलेशनशिप मध्ये असाल तर त्यासाठी वेळ द्या. सगळं काही असूनदेखील तुम्हाला काहीतरी अपूर्ण, अपुरं असल्यासारखं वाटू शकेल. तुम्हाला काहीतरी हवं आहे, पण ते मिळत नाही आहे, अशी भावना असेल. मात्र मनात येणारे असे विचार बाजूला ठेवा आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

  LUCKY SIGN – मासा (A fish)

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  एखादं कौशल्य आत्मसात करता करता अर्धवट सोडून दिलं असेल तर आता त्याची गरज भासेल. तुमची प्रगती होत असेल, पण त्याचवेळी जबाबदारीचं ओझंही वाढल्याचं जाणवेल. ज्यांनी हे अगदी हलक्यात घेतलं असेल, भविष्याच्या दृष्टीनं नियोजन केलं नसेल त्यांना आता जागे होण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी हा वेक अप कॉल आहे. तुमच्या मदतीची गरज असलेल्या एखाद्याचा आधार बनण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. हॉस्पिटलला भेट द्यावी लागू शकते कदाचित ते एखाद्या व्यक्तीला बघायला जाण्यासाठी असू शकते. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज लागू शकते. तुम्ही मालक असाल तर कामकाज करणाऱ्या दुसऱ्या फळीतील व्यक्तींचे योग्य परीक्षण केलं आहे याची खात्री करा.

  LUCKY SIGN – स्वत: डिझाइन केलेलं कापड (Self designed cloth)

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs