सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 मार्च 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
भूतकाळातल्या काही विचारांमध्ये तुम्ही गुंतून पडला असून, त्यामुळे पुढचे काही निर्णय घेण्यापासून तुम्ही थांबत आहात. हे विचार सोडून देण्याचा आजचा दिवस आहे. भूतकाळ आज रिलेव्हंट नाही. स्टॉक्समध्ये गुंतवणूक केलेल्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते.
LUCKY SIGN - A sparrow
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
परीक्षा किंवा प्रवेश परीक्षेसाठी तयारी करत असाल, तर त्याचे निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. तुम्ही जे काही अवलंबत आहात, जसं वागत आहात, त्याची फळं मिळण्याचा सध्याचा काळ आहे. फॅशन किंवा डिझायनिंग क्षेत्रात असलेल्यांना काही दिवस फायद्याचे असू शकतील.
LUCKY SIGN - A mushroom
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, ती व्यक्ती आणि तुमच्यामधले मतभेद दूर करण्यासाठी तुम्हाला तुमचा पर्सनल इगो आणि हेतू दूर ठेवावा लागेल. बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींना काही मूड स्विंग अनुभवाला येतील. दिवसाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी तुमचं नियमित रूटीन फॉलो होतंय ना याची काळजी घ्या.
LUCKY SIGN - A peacock
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुमच्या मनात बरंच काही ढवळतं आहे. त्यातून तुम्ही कदाचित घाईघाईत काही निर्णय घेऊ शकाल. हे तुम्ही सहज टाळू शकता. बिझनेसच्या अनुषंगाने तुमच्यासमोर येणारा सल्ला पारखून पाहू शकता. मीटिंगमध्ये तुमचे इन्पुट्स मर्यादित स्वरूपात द्या.
LUCKY SIGN - A ruffle
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुमच्या रागाचा पारा अचानक बराच वाढत असल्याने दिवसभर तुम्हाला काहीसं इरिटेटेड वाटेल. एखाद्याची चांगली कंपनी किंवा चांगले अन्नपदार्थ यांपैकी एखादी गोष्ट तुम्हाला शांत करू शकते. लाँग डिस्टन्स कॉलमुळेही काही दिलासा मिळेल.
LUCKY SIGN - A rosary
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुम्ही फार काळ बहाणा करू शकत नाही. तुम्हाला कोणाजवळ काही व्यक्त करायचं असेल, तर एखादी व्यक्ती तुम्हाला आवाहन करील, की फोन घ्या आणि कृती करून दाखवा. दिवसाच्या उत्तरार्धात बऱ्याच कृती घडतील. अडकलेले काही पैसे मिळण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - A boat
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
गेल्या काही दिवसांत बऱ्याच दिव्यातून तुम्ही गेला आहात. आता स्वतःसाठी काही वेळ काढण्याची वेळ आहे. स्वतःचे लाड करा. हवामानात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर प्रकृतीची काळजी घ्या. काही अडचणी असू शकतात. आई-वडिलांशी हार्ट टू हार्ट संवाद होणं आवश्यक आहे.
LUCKY SIGN - A metallic structure
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
आळसावल्यासारखं वाटेल. कामं पुढे ढकलाल; पण स्वतःला गिअर अप करा. आगामी काही दिवस कामाच्या ताणाचे असतील. बॅकग्राउंडला बऱ्याच गोष्टी चालू आहेत, ते तुम्हाला माहिती नाही. आरोग्यासाठी नियमित आणि सातत्यपूर्ण रूटीन ठेवा.
LUCKY SIGN - A chimney
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुमच्याबद्दल काही बोललं जातं किंवा चर्चा केली जाते, त्यातलं सगळं काही मनावर घेण्याची गरज नाही. तुमच्या भावनिक फुग्यातून बाहेर येऊन प्रॅक्टिकल विचार करायला हवा. सध्याच्या परिस्थितीत पुढे जाण्यासाठी वडील मार्ग सुचवू शकतात. आर्थिक पैलू वाढीला लागतील.
LUCKY SIGN - A bunch of lilies
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
भूतकाळात कोणाशी वैमनस्य असेल, तर ते पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. एखादी अनपेक्षित शॉर्ट ट्रिप घडू शकते. जमीन, रिअल इस्टेट आदींबद्दलच्या काही प्रलंबित मुद्द्यांना योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - A lampshade
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमच्या Dreamy Natureला विरोधाभास म्हणता येईल अशा प्रकारे आज तुम्हाला प्रॅक्टिकल आणि लॉजिकल विचार येतील. आजचा दिवस थोडा हलका असेल. तुम्ही हातातलं सगळी कामं पूर्ण करू शकता आणि संध्याकाळ मनोरंजनाची जाईल.
LUCKY SIGN - Musical note
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुम्ही कुठे जिंकाल, कुठे हराल. त्या स्पिरिटने तुम्ही नवं काम हाती घेतलं पाहिजे. येत्या काही दिवसांत नव्या बिझनेस संधी चालून येतील. ज्यांची आधीच चर्चा सुरू आहे, त्यात काही जणांना निश्चित रूप आल्याचा अनुभव येईल. तुमच्या जवळचे काही नातेवाईक सल्ला विचारत असतील, तर जवळ असाल याची खात्री बाळगा.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.