मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जिच्यामुळे पालटेल तुमचं नशीब

Daily Horoscope : अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जिच्यामुळे पालटेल तुमचं नशीब

Daily Horoscope 07 August 2022 : एखादी जुनी किंवा नवी आणि महत्त्वाची अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल.

Daily Horoscope 07 August 2022 : एखादी जुनी किंवा नवी आणि महत्त्वाची अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल.

Daily Horoscope 07 August 2022 : एखादी जुनी किंवा नवी आणि महत्त्वाची अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 7 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) समोरच्या व्यक्तीचा हेतू माहीत असूनही तुम्ही कदाचित धोका पत्कराल. उशिरा का होईना इतरांवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी गेल्या काही दिवसांत सोपं झालं आहे. मात्र नियोजित गोष्टीबाबतची पर्यायी व्यवस्था तुमच्याकडे असेल, याची दक्षता घ्या. लवकरच एखाद्या ट्रिपला जाल. नको असलेली व्यक्ती अचानकपणे भेटू शकते. मित्रमंडळींची निवड हुशारीनं करा. LUCKY SIGN – An Indoor Plant वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) कधीकधी तुम्ही जुन्या विचारांनुसार वागता, पण लोकांमध्ये आणि तुमच्यात मतभिन्नता असू शकते. वेळच्यावेळी काम केल्यानं एखादा प्रकल्प लवकर पूर्ण करता येऊ शकेल. काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची आणि काही नवीन गोष्टी सुरु करण्याची संधी तुम्हाला मिळेल. या खेपेला धैर्य एकवटणं जड जाणार नाही. एखाद्या दूरच्या व्यक्तीकडून तुम्हाला शुभवार्ता मिळेल. LUCKY SIGN – A bunch of Flowers मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) मनाला शांत करण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. भविष्यातील दिवस सुकर करण्यासाठी याची नक्कीच मदत होईल. एखादी व्यक्ती या आधी प्रभावी वाटली नसेल, तरी आता ती तशी वाटू शकते. तुम्हाला एकांतात वेळ घालावावा असं वाटेल. तुमच्यावर काही कौटुंबिक तणावाचं ओझं असेल, तर ते लवकरच कमी होईल. कर्जाबाबत सध्या विचारणा करू नका. LUCKY SIGN – A ceramic vase कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) काही मोठ्या व्यक्तींवर तुम्ही चांगली छाप पाडू शकाल. यावर लक्ष ठेवणारी एखादी व्यक्ती तुमच्याकडे कामासंदर्भात विचारणा करेल. तुमचा स्वतःवरचा विश्वास अनेक प्रकारे वाढेल. तुमच्यातील क्षमतांबाबत आणि तुमच्या भूतकाळातील यशाबाबत एखादी व्यक्ती तुम्हाला जाणीव करून देईल. काही गुंतवणूक केली असेल, तर त्यात वाढ होण्याची चिन्हं आहेत. तुमच्या सध्याच्या नात्यांत नवेपणा आणण्यासाठी प्रयत्न करा. LUCKY SIGN – A pink flower सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखादं नियोजन केलं असेल तर ते पूर्ण करणं कठीण वाटेल. रोजची कामं वेळखाऊ ठरतील. कृतकृत्य होण्याची वेळ आली आहे. आधीच्या कामाचं चांगलं फळ मिळेल. सगळ्या गोष्टींचा एकदम विचार केल्यानं गोंधळ उडेल आणि अनावश्यक ताण येईल. त्यापेक्षा एकेक करून गोष्टी हातावेगळ्या करा. पुन्हा जोमानं उभं राहण्यासाठी एखादी सुट्टी घेण्याचा विचार कराल. LUCKY SIGN – New perfume कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) सार्वजनिक ठिकाणी खासगी गोष्टींवर बोलणं टाळा. तुमच्या अपरोक्ष तुम्हाला काही प्रकरणांमध्ये गोवलं गेल्याचं लक्षात येईल. बऱ्या-वाईट अशा एकत्रित भावना आजच्या दिवशी असतील. तुमच्याबद्दल आकर्षण वाटणारी एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल. तुम्ही स्वतः भावनिक झाल्याचं तुम्हाला जाणवेल. घाई, गडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. द्विधा असेल, तर त्यावर नंतर विचार करा. दीर्घ श्वसन करा. LUCKY SIGN – A whiteboard तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटणार असाल, तर त्यांच्या वेळेचा आदर करा व पूर्ण आस्थेनं त्यात सहभागी व्हा. ज्या राबवणं तुम्हाला शक्य होणार नाही, अशा कल्पनांबद्दल बोलणंही तुम्ही टाळाल. काही काळासाठी आर्थिक अडचण असेल तर त्यावर तुम्ही लवकरच मात कराल. वरिष्ठांनी तुमच्याबाबत जे चांगलं मत बनवलंय, त्याला धक्का लागू न देण्याचा तुमचा प्रयत्न असेल. LUCKY SIGN – A silicon mould वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) कोणीतरी मुद्दाम तुमच्याशी भांडण उकरून काढेल. चित्त ठिकाणावर ठेवून तुम्ही ते परतवून लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्वभावामुळे यात अडचण येऊ शकेल, पण शांत होण्यासाठी लवकरच तुम्हाला मार्ग सापडेल. इतर लोकं काम आणि ताण देऊन जबाबदारीचं ओझं वाढवतील. तुमच्या मनात अनेक गोष्टींचा विचार सुरू असेल मात्र सगळ्या गोष्टींवर बोलणं महत्त्वाचं नाही. आधीचं एखादं प्रकरण सोडवण्याची एखादी संधी मिळेल. बाहेर जेवायला गेल्यानं नेहमीच्या आयुष्यात आवश्यक असलेला वेगळेपणा मिळेल. LUCKY SIGN – A string of lights धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमच्या इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी वातावण तयार होतंय. तुम्हाला कृतज्ञ वाटेल. क्षुल्लक गोष्टीवरून छोटासा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुमच्या मतांशी सहमत नसेल, उलट काही वेगळाच सल्ला देईल. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची गरज तुम्हाला वाटेल. काही धार्मिक गोष्टी करणं उपयोगी ठरू शकतात. LUCKY SIGN – A migratory bird मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) काही विपरित घडेल असं वाटत असेल, तर तुमची भीती खरी ठरू शकते. हे टाळण्यासाठी त्याबाबत विचार न करणं उत्तम ठरेल. आज ठरवलेली कामं होतील. ठरलेला दिनक्रम पाळणं शक्य होईल. काही मित्रमंडळी तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतील, पण तुमची इच्छा नसेल. दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात असाल, तर विचारपूर्वक निवड करा. LUCKY SIGN – A sun block कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) नम्र स्वभाव ठेवला, तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. याच पद्धतीनं वर्तन ठेवलं तर गोष्टी विनासायास घडतील. या आठवड्यात मुलांमुळे आनंद द्विगुणित होईल. सतत पुढे ढकललं जात असलेला कौटुंबिक स्नेहमेळावा निश्चित होईल. कामातून थोडी विश्रांती घेऊन इतर जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्याल. आर्थिक स्थैर्य असेल त्यामुळे ताण कमी होईल. तुमचा चांगला काळ लवकर येत आहे. काळा रंग वापरू नका. LUCKY SIGN – A clay pot मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) आयुष्य कंटाळवाणं होईल. त्याला चांगलं करण्यासाठी काही महत्त्वाकांक्षा गरजेच्या वाटतील. एखाद्या गोष्टीसाठी जुने वरिष्ठ तुमची मदत मागतील. मर्यादित संधींमध्येही तुम्हाला तुमच्यासाठी एखादी संधी मिळेल. कष्टाचं फळ मिळण्याचा काळ आला आहे. त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. दाबून ठेवलेल्या भावना अचानक लोकांमध्ये असताना उफाळून येतील. आर्थिक प्रगतीला काही काळासाठी खीळ बसेल. तुमचे छंद जोपासा. LUCKY SIGN – An awaited mail
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या