सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
कोणत्याही प्रकारचा निरूत्साह, आळस किंवा प्रेरणेचा अभाव या आता भूतकाळातल्या गोष्टी वाटू शकतील. आता तुम्हाला ताजतवानं वाटेल. भूतकाळात तुम्हाला दिलं गेलेलं आव्हान तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कारणीभूत ठरलंय असं तुम्हाला लक्षात येईल. एखाद्या अतिशय महत्त्वाच्या विषयात चांगला सौदा मिळेल. तुमचा जोडीदार किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला मानसिक त्रास संभवतो. तुम्ही कोणाकडून काही उसनं घेतलं असल्यास ते वेळेवर परत द्यायचं लक्षात ठेवा.
LUCKY SIGN – पेंड्युलम/लोलक (a pendulum)
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
काहीवेळा आपली लढाई एकाकी असण्याचं लक्षात येतं. सध्या शांत आणि सावध राहणं हाच उपाय आहे. तुमच्या मुलांसोबत वेळ घालवल्यामुळे तुम्हाला बरं वाटू शकेल. लवकरच बदली किंवा जागेचा बदल होऊ शकतो पण तुम्ही त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही आहात. तुमचा जुना मित्र कधीकाळी तुमची आवडती असणारी गोष्ट भेटवस्तू म्हणून देईल. आयुष्यात उत्साह निर्माण करण्यासाठी घराबाहेर फिरून या.
LUCKY SIGN – बफे (a buffet)
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
अचानकपणे कुटुंबासोबत सहल आणि आऊटिंग घडण्याची शक्यता आहे. तुमच्या आसपासची काही लोकं तुमच्या आयुष्याचं बारकाईने निरीक्षण करत आहेत, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. एखादं गेट टू गेदर आयोजित करणार असल्यास सर्व व्यवस्था योग्य रितीने करा. तुमच्या मनातील एखाद्या कल्पनेबाबत तुम्ही मंथन करत असल्यास किंवा दुसऱ्याला सांगावी की नको असा विचार करत असल्यास ती सांगण्याची ही योग्य वेळ असू शकते. भटकंतीला जाण्यापेक्षा घरी राहण्याला पसंती द्याल. क्रिएटिव्हिटी वापरून संवाद केल्यास फायदेशीर ठरेल.
LUCKY SIGN – प्लश गार्डन (a plush garden)
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
जर गेले काही दिवस लक्ष केंद्रित करण्यास अडथळा येत असेल तर आता ती समस्या दूर होऊ शकते. काही कष्टदायक असाईनमेंट्सवर तुम्ही काम करण्याची शक्यता आहे. ही वेळ नवीन कामाच्या संधी मिळवण्यासाठी आणि जुन्या जवाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी चांगली आहे. मनातून शांत राहा कारण तुम्हाला चिथवणाऱ्या करणाऱ्या गोष्टी घडू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून तुमचा वापर केला जाणार नाही याबाबत तुम्ही सतर्क राहा. वैयक्तिक आयुष्य आणि काम यांच्यात अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा.
LUCKY SIGN – पिवळा गुलाब (yellow roses)
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्ही योजना करत असल्यास परदेशगमानाची संधी तुम्हाला लवकरच मिळण्याची शक्यता आहे. ग्रहमानानुसार वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, पण त्या सोडवता येतील. एखादी परिस्थिती समजून घेण्याबाबत स्वतःमध्ये चांगला बदल झाल्याचं जाणवू शकतं. तुमचं मन आता खरं आणि खोटं यात फरक करण्यास समर्थ होईल. आनंदी राहण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची आता तुम्हाला गरज न वाटणार नाही. या स्पष्टतेमुळे तुमची उत्पादकता वाढून स्वः समाधानाकडे वाटचाल होऊ शकते.
LUCKY SIGN – सोनेरी घड्याळ (a golden watch)
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
नेहमी व्यवहारी राहणं हा तुमच्या व्यक्तिमत्वातील प्रमुख भाग असला तरी सध्या तुम्हाला थोडं भावनिक झाल्याचं जाणवू शकतं. दुसऱ्यांच्या विचारांचा प्रभाव तुमच्या महत्त्वाच्या निर्णयावर होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्ही काही प्रश्नांबाबत पाठपुरावा करत असल्यास उत्तरांअभावी ते तात्पुरते बाजूला ठेवावे लागतील. तुमचे पालक तुमच्या वतीने निर्णय घेण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी थेट बोलल्यास मदत होऊ शकते.
LUCKY SIGN – काळा दगड (A black stone)
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
तुमच्या आयुष्यातील काही मुद्दे दुर्लक्षित असल्यास त्यांच्याबाबत शोध घेण्याची आता वेळ आहे. एखाद्या चालून आलेल्या चांगल्या संधीचा तुम्ही विचार करण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्वाच्या चर्चेत पुरेसं योगदान न दिल्यासारखं तुम्हाला वाईट वाटू शकेल. एखादी संधी स्वीकारण्याआधी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती करून घ्या. कारण ती स्वीकारल्यावर गोष्टी अगदी उलट वाटू शकतात. अचानक ब्रेक घेण्याची संधी मिळाल्यास ती दवडू नका.
LUCKY SIGN – चांदीचं नाण (a silver coin)
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुमच्या भावंडाशी एखाद्या बाबतीत वाद झाल्यास त्यात तुमचा पराभव होण्याची शक्यता आहे. जास्त स्पर्धात्मक होऊ नका, कारण गोष्टी लवकरच पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवणं आधीपेक्षा सोपं वाटू शकतं. तुम्हाला दडपल्यासारखे किंवा वाईट वागणूक मिळत असल्याचं वाटत असल्यास ते सांगण्यासाठी एखाद्या व्यक्तीची भेट होऊ शकते. छोट्या शहरातील एखादी व्यक्ती तुमच्या मोठी छाप पाडू शकते. ऑफिसातील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला कायदेशीरबाबीत तुमची मदत लागू शकते. काहींना आतड्यांच्या आरोग्यासंबंधित समस्यांकडे आता लक्ष द्यावं लागू शकतं.
LUCKY SIGN – तळं (a lake)
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुम्ही एखादी गोष्ट घडण्याची वाट पहात असाल तर हीच ती वेळ आहे. महत्त्वाच्या कामाची नियोजित वेळ सरल्याने आता ते पूर्ण करावंच लागेल. ज्यांनी भूतकाळात गुंतवणूक केली असेल त्यांची आर्थिक प्रगती होईल. जर तुम्हाला मूड स्विंग्स जाणवत असल्यास आता ते कमी होऊ शकतात. तुमच्या पत्नीचे कुटुंब तुमच्या सूचना आणि वेळेची अपेक्षा करू शकतं. सध्याची वेळ आरामासाठी फिरण्यासाठी योग्य नसल्याने ते नंतर प्लॅन करा. आर्थिक समस्यांबाबत आता तुम्हाला उपाययोजना मिळू शकेल.
LUCKY SIGN – लँपपोस्ट (A lamp post)
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
नवं नातं तुमच्यासाठी ट्रू सोल कनेक्ट (a true soul connect) ठरू शकतं. जे तुमच्या आयुष्यातील हरवलेला आनंद परत आणू शकतं. तुम्ही बाहेरगावी असताना तुमच्या कामाची योग्यरित्या काळजी घेतली जाईल, याकडे लक्ष द्या. तुम्ही आधी नाकारलेली संधी पुन्हा समोर येऊ शकते. गुंतवणूकीत सकारात्मक गती दिसू शकते. तुमचा जवळच्या मित्राच्या कुटुंबात वाद होऊ शकतात. त्याला भावनिक आधार देण्यासाठी तुम्ही जवळपास राहा. व्यवसायातील सहकाऱ्यांकडून तुम्हाला महत्त्वाचा आणि अपेक्षित कॉल येऊ शकतो. तुम्ही आधी वचन दिलेल्या एखाद्या व्यक्तीला तुमची खबरबात जाणून घ्यायची इच्छा असेल.
LUCKY SIGN – रफ ड्रॉईंग (a rough drawing)
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
नवी जागा, नवे लोकं आणि परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार राहा. हे बदल आता जलद घडू शकतात. खऱ्या आयुष्यातील घटना तुमचं लक्ष वेधून घेऊ शकते. एखादी प्रलंबित राहिलेली कामं हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने त्वरित हालचाल करावी लागेल. जर तुम्ही साधी व्यक्ती असाल तर जवळच्या व्यक्तीकडून तुमचा फायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. जवळच्या मित्राला आलेला वाईट अनुभव तुमच्यावर मजबूत छाप पाडू शकतो. तुमच्या दुबळ्या बाजू इतरांसमोर येणार नाहीत, याची काळजी घ्या. आर्थिक बाबीत प्रगती दिसू शकते.
LUCKY SIGN – पेपर वेट (a paper weight)
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
बराच काळ तुमच्या मनाला बोचणाऱ्या भूतकाळातील समस्यांचे निराकरण करण्याची आता वेळ आली आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही वरिष्ठांवर चांगली छाप पाडली आहे आणि आता त्याचे फायदे तुम्हाला मिळतील.
तुमच्यावर क्रश असणारी एखादी व्यक्ती तुमच्यावर लक्ष ठेवण्याची शक्यता आहे. थेट संभाषणाने प्रकरण सोडवण्यास मदत होऊ शकते. ऑफिसातील ज्युनिअर कदाचित तुमच्याबद्दल गॉसिप करू शकतो. ज्यामुळे तुम्हाला कोणावरही सहज विश्वास ठेवण कठीण जाईल. तुमच्या वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज भासू शकेल.
LUCKY SIGN – क्लिअर क्रिस्टल (a clear crystal)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs