सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio
www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
आजचा दिवस स्वतःला शक्ती देण्याचा आणि काही तरी नवा प्रयोग करण्याचा आहे. तुम्हाला तातडीने लक्ष केंद्रीत करावं लागेल, अशा काही गोष्टी आहेत. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज भासेल.
LUCKY SIGN - A solitaire
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
आज भूतकाळातला एखादा क्षण पुन्हा जगण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी अनेक टप्पे अजून गाठण्याची गरज आहे. लग्नाचं निश्चित झाल्यामुळे कुटुंबात आनंदाची लहर येईल.
LUCKY SIGN - A feather
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
एखाद्या गोष्टीला बराच वेळ लागत असेल, तर त्याचा अर्थ असा नव्हे की ती गोष्ट होणारच नाही. तुम्ही प्रयत्न करायला हवेत, संयम पाळायला हवा आणि तुमच्या ऊर्जेला अन्य ठिकाणी वाट करून द्यायला हवी. कामाच्या ठिकाणी टीका होऊ शकेल.
LUCKY SIGN - A wooden box
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या तुम्हाला कडकपणे अंमलबजावणी करावयाच्या टाइमलाइन्सची आठवण करून देतील. कामाचा वेग वाढवण्याची गरज भासेल. नव्या संधीमुळे कामासाठी नवा उत्साह मिळेल. विश्रांतीदेखील महत्त्वाची आहे.
LUCKY SIGN - White slab
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्ही एखादी गोष्ट मागे ओढून धरण्याचा प्रयत्न करत असलात, तर ते आता सोडून देण्याचा काळ आहे. तुम्ही तुमच्या रागाचं प्रदर्शन खूप जास्त घडवलंत, तर तुमची मनःशांती भंग होईल. मित्रत्वाच्या भावनेतून केलेल्या कृतीमुळे तुमचा दिवस चांगला जाईल.
LUCKY SIGN - A jade plant
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुम्ही स्वतःसाठी मिळवलेल्या एखाद्या गोष्टीसाठी सेलिब्रेशन लवकरच होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्लॅन्सची आता अंमलबजावणी होत आहे. तुम्ही जे निर्णय घेऊ शकला असतात, त्यावर विचार करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी थोडा वेळ काढा.
LUCKY SIGN - A sticker
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
एखाद्या गोष्टीमुळे तुमचं लक्ष विचलित होत असेल, तर त्याचं कारण तुम्ही तसं होऊ देता हे आहे. तुमचा सहकारी अशी एखादी कल्पना मांडेल, की ज्यातून उत्पन्नाचा नवा स्रोत प्राप्त होऊ शकतो. तुम्ही ट्रिपचं प्लॅनिंग करणार असलात, तर ते लवकरच करा.
LUCKY SIGN - Sunshine
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
आज तुम्हाला नशिबवान असल्यासारखं वाटेल. आज तुम्ही स्वतःसाठी ठरवून घेतलेली सगळी कामं पूर्ण होतील. स्टॉक्समध्ये तुम्हाला अनुकूल हालचाली होतील.
LUCKY SIGN - Yellow candles
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुम्ही एखाद्या विचारापासून दूर पळत असलात, तर तो तुमचा पाठलाग करेल. एखादी महत्त्वाची गोष्ट करण्यासाठी तुम्हाला धैर्याचा अभाव जाणवेल. आजचा दिवस खूप हेक्टिक, दमवणारा आहे. तुम्ही काम लवकर संपवू शकणार नाही.
LUCKY SIGN - A silicon mould
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
सरप्राइज वेगवेगळ्या स्वरूपात येऊ शकतं. त्यापैकी काही प्रकार तुम्हाला आवडणार नाहीत. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. कारण तुमच्याकडून कोणी तरी दुखावलं जाण्याची शक्यता आहे. एखादी किरकोळ चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्ष राहा.
LUCKY SIGN - A crystal tumbler
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
परीक्षेचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागणार नाहीत. क्लृप्ती आणि मुत्सद्देगिरी यांचा वापर करून तुम्ही काम करून घेऊ शकाल. आजचा दिवस दमवणारा असेल; पण चांगल्या नोटवर संपेल. बेदरकारपणे ड्रायव्हिंग करणं टाळा.
LUCKY SIGN - An umbrella
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणामुळे तरी तुम्हाला प्रेरणा मिळेल. आज अंतर्मुख होणं उपयुक्त ठरणार नाही. कामाच्या ठिकाणी कोणी तरी तुमच्यावर कॅज्युअली आरोप करील. आजचा दिवस काहीसा रफ असेल.
LUCKY SIGN - A blue sky
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.