Home /News /astrology /

Daily Horoscope : सांभाळून राहा! तुमचं गुपित कुणासमोर तरी उलगडण्याची शक्यता

Daily Horoscope : सांभाळून राहा! तुमचं गुपित कुणासमोर तरी उलगडण्याची शक्यता

Horoscope 05 May 2022 : सूर्यराशीनुसार 5 मे 2022 रोजी तुमचा दिवस कसा जाणार पाहा तुमचं राशिभविष्य

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 5 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) क्षमा मागण्यासाठी तुमच्याकडे मर्यादित संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे माफी मागण्याची आवश्यकता असल्यास वेळ न काढता लगेच मागावी. तुम्हाला अगदी आतपर्यंत हीलिंगची गरज आहे. स्वीकारार्हतेचीही तुम्हाला गरज आहे. तुम्ही त्याबद्दल विचार करत असलात, तर अर्ज करा. LUCKY SIGN - A still image वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) दिवस खूप दमवणारा असेल; मात्र परिस्थिती नियंत्रणाखाली असेल. तुमच्या यादीतली बहुतांश कामं तुम्ही पूर्ण करू शकाल. कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला अक्षरशः कंबर कसून काम करावं लागेल. जवळच्या मित्राबद्दलची सकारात्मक बातमी आनंद देईल. LUCKY SIGN - A silver wire मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) आगामी काही महिन्यांसाठी तुम्हाला काही नव्या कल्पना तयार कराव्या लागतील. अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत असलात, तर मर्यादित कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आता चांगला काळ आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती स्थिर वाढ अनुभवू शकतात. LUCKY SIGN - 2 kites कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमचं टॅलेंट दर्शवण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत. तुमच्या आत्मविश्वासामुळे इतरांना मत्सर वाटेल. तुमच्या आजूबाजूच्या काही व्यक्ती तुमच्या अचीव्हमेंट्सबद्दल, तुमच्या क्षमतेविरुद्ध गॉसिप करत असतील. सावध राहा. LUCKY SIGN - A guitar सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) दिवसाच्या सुरुवातीला चिंतेची काही लक्षणं दिसतील; मात्र तुम्ही लवकरच ते सोडवण्यात यशस्वी ठराल. एखादी नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट अनुभवल्यामुळे तुम्ही त्यावर विचार करत राहाल. एखादा जुना सहकारी अचानक, पूर्वकल्पना न देता भेटायला येईल. LUCKY SIGN - Shadow of an animal कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) रिक्रिएशनल लंचेस आणि मित्रांसमवेत आउटिंग यांमुळे आवश्यक ती ऊर्जा मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात तुमचं मन अधिक केंद्रित असेल. तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहात, त्यांची उत्तरं जुन्या ओळखीची एखादी व्यक्ती देईल. LUCKY SIGN - A cartoon तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) प्रतीक्षेत असलेल्या असाइनमेंटच्या प्रगतीची काही लक्षणं थोडा दिलासा देतील. अचानक आखलेल्या सहलीमुळे आवश्यक तो उत्साह मिळेल. कोणी तरी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असेल, तर तुम्ही त्यासाठी रिमाइंडर लावण्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. LUCKY SIGN - A red stone वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमचं एखादं गुपित अन्य कोणाला तरी समजण्याची शक्यता आहे. तुमच्या काही कमिटमेंट्स पूर्ण झालेल्या नाहीत. तिकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. औषधांच्या बाबतीत दक्ष राहा. LUCKY SIGN - A box धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) नेहमीपेक्षा तुम्हाला आज शांत वाटेल. गेल्या काही दिवसांत तुम्हाला तसं वाटत नाही. कामाच्या ठिकाणी नव्या कामासाठी तुम्हाला धोरणनिश्चिती करावी लागेल. हाताखालची कुशल व्यक्ती तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या एकत्रीकरणासाठी मदत करील. LUCKY SIGN - A constellation मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) सध्याच्या काळात वर्क ट्रिपदेखील तुम्हाला मोकळं होण्यासाठी एक चांगली संधी देऊ शकते. तुम्ही विश्वास ठेवत असलेला मित्र आता तुम्हाला उपयोगी पडेल. तुमच्या शहरात प्रवास करत असलेला एखादा नातेवाईक तुमच्याकडे मदत मागण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A river कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) स्वतःबरोबर संवाद साधणं ही चांगली गोष्ट आहे. आज छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद मिळेल आणि तो पुरेसा आहे. आजही तुम्हाला त्रास होईल. दुपारी अतिरिक्त ऊर्जेचे संकेत आहेत. तुमचं रूटीन आणि आरोग्य यांवर नियंत्रण ठेवा. LUCKY SIGN - A large hoarding मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखाद्या व्यक्तीने तुमच्या कामाची प्रशंसा केली असेल, तर तुम्ही कदाचित ते गांभीर्याने घेणार नाही. कारण त्यांचा तसा हेतू नसावा. तुमची क्षमता आणि उणिवा यांबद्दल तुम्हाला आता ठरवायला हवं. एखाद्या जुन्या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असलात, तर ते आता शक्य होऊ शकेल. LUCKY SIGN - A silk scarf
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या