सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 2 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
बरेच दिवस खूप श्रम झाल्यानंतर आज दिवसाची सुरुवात मनातल्या शांततेच्या भावनेने आणि रिलॅक्सेशनने होऊ शकेल. एखाद्या नव्या प्लॅनवर काम सुरू करावंसं वाटेल. जवळच्या, पण काहीशा विस्मृतीत गेलेल्या मित्रांना शोधण्याचा दिवस आहे.
LUCKY SIGN – Cinnamone spice
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
एखाद्या ऑफरबद्दल विचार करण्यामुळे मनाची मोठी जागा व्यापली जाईल. अति भावनिक होणं टाळा. भूतकाळातल्या काही मर्यादांमध्ये जाणीवपूर्वक सुधारणा करता येईल.
LUCKY SIGN – A Classic Novel
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
एखादी नवीन कल्पना पुढच्या काही महिन्यांसाठी डोक्यात रेंगाळेल. ती कल्पना अधिक विकसित करणं योग्य ठरेल. काही चांगलं काम करण्यासाठी एकांत शोधण्याचा प्रयत्न करा. तेलकट खाणं टाळा.
LUCKY SIGN – An Unstable furniture
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
महत्त्वाच्या बाबीकडे निर्देश करणारे संकेत स्पष्ट नसले, तरी तुमचं लक्ष वेधून घेऊ शकतात. एखादी मैत्रीण योग्य वेळी चांगला सल्ला देऊ शकते. तुमची प्रतिमा चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करण्यासाठी ऑफिशियल आउटिंग ही चांगली संधी असू शकेल.
LUCKY SIGN – Colourful Pebbles
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
आजचा दिवस सर्वसाधारण वाटेल; मात्र हळूहळू प्रगती होत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. आज तुम्ही संवादाबद्दल सावधगिरी बाळगू शकाल. अन्यथा गैरसमज वाढू शकतात. एखाद्या कामासाठी आधीपासून तयार राहणं उत्तम.
LUCKY SIGN – Old Banyan Tree
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुम्ही बाहेरून शांत आहात; मात्र आतमध्ये भरपूर गोंधळ करणारे विचार आहेत. लहान लहान विजयदेखील तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. अधिक चांगले रिझल्ट मिळवण्यासाठी तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज्ड असणं गरजेचं आहे. लवकरच दूरचा प्रवास संभवतो.
LUCKY SIGN – A cup of Green tea
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
भूतकाळातल्या काही गोष्टींमधून बरीच शिकवण मिळाली आहे. ती अंमलात आणणं गरजेचं वाटू शकेल. तुमचे कुटुंबीय तुमच्याकडून एखाद्या गोष्टीबाबत स्पष्टता अपेक्षित करत आहेत. कामाच्या ठिकाणी लवकरच काही घडामोड घडण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – A Red Pen
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
काही नवीन घडामोडींमुळे तुमची रात्रीची झोप उडाली आहे; मात्र सर्व काही शांत होण्यासाठी थोडा वेळ द्या. एखाद्या जवळच्या मित्राचा फोन तुम्हाला नवं आयुष्य देईल. सामाजिक काम लक्ष वेधून घेईल.
LUCKY SIGN – A Tool Kit
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
उच्च शिक्षण किंवा आणखी ज्ञानार्जन करण्याचा विचार आज डोक्यात येत राहील. तुम्ही नुकत्याच भेटलेल्या एखाद्या व्यक्तीबाबत मनात नवीन भावना निर्माण होतील. आर्थिक प्रवाह सुरळीत राहील.
LUCKY SIGN – A tan wallet
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी आता तुम्ही पात्र ठराल. एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रासंबंधी किंवा हरवलेल्या व्यक्तीसंबंधी सकारात्मक बातमी कळेल. दैनंदिन जीवनातून एक ब्रेक घेणं चांगलं ठरेल.
LUCKY SIGN – A copper article
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
एखाद्या नव्या खेळाकडे आकर्षित व्हाल. लोकांना भेटण्यासाठी चांगला दिवस आहे. एखादी वैद्यकीय गरज लागू शकते, त्यासाठी तयार राहा. दिवसभराचं नियोजन एखाद्या फोन कॉलमुळे बदलू शकेल.
LUCKY SIGN – A golden Watch
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
सरप्राइज आवडण्याच्या मूडमध्ये तुम्ही नसण्याची शक्यता आहे. जुनी मैत्री गुंतागुंतीच्या टप्प्यात जाण्याची शक्यता आहे. स्वतःबद्दल एखाद्या बाबतीत शंका असल्यास तुम्हाला मार्गदर्शन करू शकणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्या. गोडधोड खाण्यात रमणं ही सध्या चांगली बाब नाही.
LUCKY SIGN – A clear sky
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya