Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आजचा दिवस भाग्यशाली; या व्यक्तींना धनलाभ होणार

दैनंदिन राशिभविष्य : आजचा दिवस भाग्यशाली; या व्यक्तींना धनलाभ होणार

Horoscope Today : तुमच्यासोबत आज काय काय होणार? पाहा तुमचं राशिभविष्य.

आज रविवार दिनांक 23 जानेवारी 2022. तिथी पौष कृष्ण षष्ठी. आज चंद्र  कन्या राशीतून भ्रमण करीत आहे.  पाहूया बारा राशींचे भविष्य. मेष आज तुमच्या शरीराला आरामाची गरज आहे. विश्रांती घ्या. देणे-घेणे करू नका. शत्रूपासून सावध रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. दिवस बरा जाईल. वृषभ संततीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्तीसाठी आजचा दिवस शुभ आहे. मानसिक हुरहूर राहील. आर्थिक बाजू चांगली राहिल. दिवस चांगला. मिथुन आज शरीर जरा थकलेले राहिल. घरीच आराम करावा. आईवडिलांचे आरोग्य चांगलं राहिल. शुभकार्य घडतील. आर्थिक बाजू उत्तम. दिवस शुभ आहे. कर्क आज छोटीशी पार्टी किंवा कोणाला भेटण्याचा योग येईल. बिझनेसनिमित्त केलेले प्रवास यशस्वी होतील. नवीन संधी मिळतील. दिवस उत्तम  आहे. सिंह धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण येतील. आजकाल प्राप्ती अणि खर्च सारखे होत आहे. जोडीदाराला काही नवीन संधी मिळवून देईल. दिवस शुभ आहे . कन्या राशीतील चंद्र स्वास्थ्य बहाल करेल. आर्थिक लाभ होतील. स्त्रीवर्ग विशेष मदत करेल. आकर्षक खरेदी होईल. धार्मिक कार्य घडेल. दिवस शुभ आहे. तुला आज व्यय स्थानातील चंद्र भ्रमण खर्च आणि मानसिक ताण दर्शवत आहे. चंद्र गुरु षडाष्टक योग करीत आहे.अध्यात्मिक साधना करावी. दिवस मध्यम जाईल . वृश्चिक आज मित्र मैत्रिणींना भेटायला जावे लागेल. लाभ होतील. चैनीकडे कल होईल. स्त्रीवर्ग मदत करेल. आत्मविश्वास वाढेल. प्रकृती उत्तम राहिल. दिवस शुभ आहे. धनु काम आणि भरपूर काम असा दिवस आहे. मार्केटिंग, सेल्समधील लोकांना फायद्याचा दिवस आहे. आर्थिक स्थिती ठिक राहिल. प्रकृती सांभाळा. दिवस उत्तम. मकर भाग्यशाली दिवस आहे. चंद्र शुक्र प्रवास योग आणतील. त्यातून काही संधी येतील. मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे.आर्थिक स्थिती ठिक राहिल दिवस शुभ. कुंभ अष्टमात चंद्र आज अनुकूल नाही. दिवस थोडा तणावपूर्ण जाईल. उपासना करीत रहा. कुठेही अनावश्यक खर्च टाळा. डोळ्याचे त्रास होतील. दिवस मध्यम जाईल. मीन दाम्पत्य जीवन आनंदी आणि समाधानी आहे. जोडीने खरेदी, मौज कराल खर्च होतील. पण काम, व्यावसायिक लाभ उत्तम होतील. दिवस शुभ आहे. शुभम  भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या