आज दिनांक 22 जानेवारी 2022 वार शनिवार. तिथी पौष कृष्ण पंचमी.
आज चंद्र सकाळी कन्या राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
सध्या अष्टम केतूमुळे संसर्गजन्य रोग होऊ शकतात. चंद्र आज षष्ठ स्थानातून भ्रमण करेल. शारीरिक त्रास, आर्थिक अडचण किंवा शत्रूपिडा असा अनुभव येईल. गुरूकृपा आहे. दिवस चांगला आहे.
वृषभ
राशीच्या पंचम स्थानातून चंद्र भ्रमण शैक्षणिक क्षेत्रात यश देईल. संतती आनंदी असेल. अष्टमात मंगळ शुक्र काहीसे सौम्य फळ देईल. तरीही प्रकृती जपा. दिवस शुभ.
मिथुन
राशीच्या व्यय स्थानातील राहू व सप्तम स्थानात असलेला मंगळ अशा ग्रहस्थितीमुळे चिंता सतावू शकते. चंद्र आज चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. दिवस बरा आहे.
कर्क
प्रवास, भेटीगाठी असा हा दिवस आहे. भाऊ बहिणी संपर्क करतील. मंगळ आईशी मतभेद दर्शवत आहे. खर्च बेताने. कामे वाढतील. पण काळजी नको. जोडीदाराला वेळ द्या. उपासना करा.
सिंह
आज पैसा मिळण्याची शक्यता आहे. मात्र कुटुंबासाठी त्याग करावा लागेल. प्रकृती सांभाळून दगदग करा. दशमातील राहू कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. कायदा पाळा. दिवस चांगला.
कन्या
आज राशीतून होणारे चंद्र भ्रमण शुभ आहे. दोन दिवसापासून वाटणारी अस्वस्थता कमी होईल. सूर्य अणि शुक्र कार्यक्षेत्रात यश मिळवून देणार हे नक्की. गुरु जप करा. दिवस चांगला आहे.
तुला
आज चंद्र व्यय स्थानात असून पैसा, वेळ अथवा आरोग्य जपून असा. कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी आल्या तरी घाबरू नका. निवारण होतील. संतती सहकार्य करेल. दिवस मध्यम.
वृश्चिक
उत्तम लाभ, प्रवास, मित्रमैत्रिणी जमवून छोटी पिकनिक असा दिवस आहे. पण सध्या थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. मंगळ सध्या धन स्थानात आहे. अतिशय खर्च होईल. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू राहतील. काळजी घ्या .
धनु
आज भरपूर काम करावे लागेल. लागोपाठ मीटिंग्स, फोन, भेटी यामुळे थकून जाल. दिवसाचे नीट नियोजन करा. कामानिमित्त प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. दिवस चांगला आहे.
मकर
दोन दिवसापासून वाटणारा तणाव आज नक्की कमी होईल. अडचण आली असली तरी मार्ग सापडेल. जोडीदाराची साथ लाभेल. पण वाद नको. दिवस अनुकूल .
कुंभ
अष्टमात चंद्र, राशीच्या व्यय स्थानात शनी ही ग्रहस्थिती फारशी बरी नाही. प्रकृती जपून घरातली काही आवश्यक कामे करावी लागतील. शनी जप करावा.
मीन
आज काही खरेदी असेल तर करून घ्यावी. मंगळ ,बारावा गुरू हा आरोग्यचिंता निर्माण करेल .गुरूची उपासना, जप व दान करीत असावे. हिम्मत वाढेल. दिवस शुभ आहे.
शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.