आज दिनांक 21 जानेवारी 2022. शुक्रवार आज पौष कृष्ण चतुर्थी.
चंद्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
आज चतुर्थी निमित्त दिवस गणरायाच्या चिंतनात घालवा. मन थोडं तणावयुक्त राहिल. काही शारीरिक त्रासही संभवतात. आर्थिक स्थिती ठिक राहिल. दिवस मध्यम आहे.
वृषभ
आज दिवस उत्तम असून आर्थिक, व्यावसायिक निर्णय अगदी योग्य ठरतील. धार्मिक आस्था वाढेल. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. घरामध्ये जास्त काम पडेल. दिवस मध्यम.
मिथुन
आज दिवस भर मानसिक ताणतणाव, हुरहुर आणि प्रकृती नरम गरम राहिल. काहीतरी मन गुंतून राहिल असं काम करा. प्रवास टाळा. दिवस मध्यम आहे.
कर्क
चंद्र आज उत्तम फळ देण्यास तयार आहे. आर्थिक स्थिती ठिक राहिल. गणेश पूजन करा. घरात मन रमवा. दिवस कुटुंबासाठी अनुकूल आहे. काळजी घ्या.
सिंह
आजचा दिवस घरात जास्तीची कामं, अनावश्यक खर्च असा आहे. व्यावसायिक निर्णय अगदी ठिक राहतील. संघर्षातून यश मिळेल. दिवस चांगला आहे.
कन्या
व्यय चंद्र देव दर्शन, भेटीगाठी घडवून आणेल. महत्त्वाचे फोन येतील. आज दिवस आनंदात घालवा. घरात खूप काही घटना सतत घडतील. आर्थिक बाजू चांगली राहिल. दिवस मध्यम आहे.
तुला
आजचा दिवस हा आर्थिक भरभराटीचा आहे. भक्तीची परिभाषा शिकवणारा आहे. आज भजन पूजनात मन रमू द्या. लाभ होतील. कौटुंबिक सुख उत्तम मिळेल. दिवस शुभ.
वृश्चिक
आज तुमच्या हाताने होणारे काही धार्मिक काम तुम्हाला फार आनंद देईल. राशीच्या दशमातील चंद्र दिवसभर कशात तरी गुंतवून ठेवेल. आर्थिक बाजू ठिक राहिल. दिवस चांगला जाईल.
धनु
आज धार्मिक कामावर भरपूर खर्च होईल. राशीतील मंगल शुक्र आकर्षक बनवतील. प्रकृतीकडे जरा लक्ष द्या. आर्थिक लाभ आणि भाग्यकारक असा दिवस शांततेत घालवा.
मकर
सिंह चंद्र आज काहीतरी अनिष्ट घडवून आणेल. ईश्वरचरणी मन रमवा. संततीसंबंधी काही समाचार मिळतील. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. कायदा पाळा. दिवस त्रासदायक आहे.
कुंभ
आज सप्तम स्थानातील चंद्र वैवाहिक जीवनात काही समस्या समोर आणेल. त्याचं समाधान करण्यात दिवस जाईल. राशीतील गुरू सहकार्य करेल. दिवस बरा जाईल.
मीन
आज दिवस मध्यम असून ईश्वरी उपासना अतिशय शुभ फळ देईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख आणि नातेवाईकांच्या भेटी होतील दिवस चांगला आहे.
शुभम भवतू !!
Published by:Priya Lad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.