राशीभविष्य: तुला वृषभ राशीने सावध राहावं, या राशींसाठी मात्र दिवस चांगला!

या राशींच्या लोकांकडे असतो सगळ्यात जास्त पैसा

शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा आहे वाचा.. त्याबरोबरच दररोजच्या प्रमाणे एका राशीचा स्वभाव, गुण-दोष जाणून घेऊ या. आज आहे सिंह राशीचा दिवस...

  • Share this:
आज शनिवार दिनांक 19 जून 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध नवमी. आज  जाणून घेऊ या सिंह राशी बद्दल. काल पुरुषाच्या कुंडलीतील ही पाचवी रास.अग्नी तत्त्व पुरुष राशी, स्थिर, राशीचा स्वामी  सूर्य आहे. ह्या राशीचा अंमल कटि, हृदय यावर येतो. अत्यंत शूर, टोकाचे मानी, सहृदय, दिलदार, उच्च अभिरुची असलेल्या व्यक्ती.पण कोणालाही दबून राहणे, अरेरावी सहन करणे अशक्य. सत्ता फार प्रिय असते. भरदार बांधा, बारीक कंबर, तेजस्वी  व्यक्तिमत्त्व असते. रवीची उपासना करणे योग्य ठरते. आता जाणून घेऊया आजचे  बारा राशींचे भविष्य. मेष आज राशीच्या षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण  व्यावसायिक, नोकरदार दोघांना ही चांगले  आहे. मातुल घराण्यातील व्यक्ती  भेटतील अथवा  फोन येतील. मुलाखतीतून यश मिळेल. प्रकृती जपा. वृषभ आज रवि  शुक्र पंचमातील चंद्र उत्तम फळ देतील .पण राशीतील  राहू बुध सावध गिरी बाळगा असे सांगतात. भावंड, प्रवास  आणि जनसंपर्क  असा दिवस आहे. जपून बोला. मिथुन आज चंद्र तुम्हाला आराम करा, घरात रहा  कुटुंबीयांना वेळ द्या असे सुचवतो आहे. आठवडा दगदगी चा गेला  आज निवांत स्वतः कडे लक्ष पुरवा .नवीन कपडे खरेदी कराल. एकूण दिवस उत्तम आहे. शनी  उपासना करणे. कर्क अविवाहित  व्यक्ती निराश होऊ नका. लवकरच  नवीन  स्थळ येईल. बहीण भाऊ भेट, प्रवास, घडेल. कायदेशीर  बाबीकडे  लक्ष असू द्या. राशीतील मंगळ स्वाभाविक रागीट प्रवृत्ती  देईल. पण वाद काढू नका. गुरु उपासना  सुरू ठेवणे योग्य. सिंह आज राशी स्वामी रवी  मिथुन राशीत असुन शुभ फल देणार आहे. अनपेक्षित  लाभ, भेटी  होतील. चंद्र  आर्थिक बाजू मजबूत करेल. बारावा  मंगळ  मात्र धोक्याची जाणीव करून देत राहील. गुरु कृपा  असेल. कन्या हा नवीन संधी मिळवून देणारा काळ आहे. नोकरी व्यवसाय  ठीक राहील. मित्र मैत्रिणींना भेटायला जाल. अध्यात्मिक साधना ,जप करण्यासाठी वेळ जरूर काढा. बुधाची उपासना जप करा. तुला आज दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. अष्टमात असलेले ग्रह व शनिवार, व्ययात आलेला  चंद्र सांभाळून कार्य करा, असे सांगतात. नवीन अधिकारी व्यक्तीशी ओळख होईल. त्याचा फायदा  नंतर  मिळू शकतो. वृश्चिक तुम्हाला सतत काहीतरी नवीन  करायची इच्छा असते. त्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पण अति ताण घेणे, रागीट स्वभाव त्रासदायक  ठरतो. त्यावर विजय  मिळवा. जोडीदाराला अचानक काही संधी चालून येतील. धनु आज सुट्टीचा दिवस असूनही काहीतरी महत्त्वाचा निरोप किंवा  जास्तीचे काम  येईल. दिवस थोडा गडबडीत जाऊन शकतो. मंगळ दुखापती पासून जपा असे  सुचवतो. दिवस  मध्यम आहे. मकर  उत्तम दिवस, चैन करण्याचा  तुमचा स्वभाव नाही. पण थोडे  बाहेर पडा. कुटुंब आणि संतती  यांना वेळ  द्या. ईश्वराचे चिंतन  मनात असू द्या. जोडीदाराशी वाद करू नका. दिवस शुभ आहे. कुंभ शरीर  थकलेले, मन निरुत्साही आणि मरगळ वाटत असेल  तर  काळजी करू नका. विश्रांती घ्या. मुले  अरेरावी करतील. खर्च करतील. फार  ताण घेऊ नका. सर्व  ठीक होईल. गुरु जप  करा. मीन जोडीदाराचा उत्कर्ष होईल. सहवास मिळेल.घरासाठी  नवीन वस्तु  खरेदी कराल. सुट्टीचा दिवस  मौजमजेसाठी वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. दिवस शुभ  आहे. गुरु जप करा. शुभम भवतु!!
First published: