• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • आजचं राशीभविष्य : कर्क, कन्या राशींनी जरा सांभाळून राहा; 3 राशींसाठी शुभ दिवस

आजचं राशीभविष्य : कर्क, कन्या राशींनी जरा सांभाळून राहा; 3 राशींसाठी शुभ दिवस

तुमच्या भविष्यासोबतच मंगळ ग्रहाबाबतही माहिती जाणून घ्या.

  • Share this:
आज बुधवार दिनांक 30 जून 2021.आज ज्येष्ठ कृष्ण षष्ठी. शुभ दिवस. चंद्र  कुंभ राशीत असेल. आज आपण जाणून घेणार आहोत मंगळ ग्रहाबद्दल. बलाढ्य, पराक्रमी आणि क्रूर असा हा ग्रह आहे. याला भौम अणि अंगारक असंही म्हणतात. कुंडलीमध्ये याचं फार मोठं महत्त्व आहे. वैवाहिक सुख, पराक्रम, रक्त दोष, ब्लड प्रेशर, भावंड, याचा कारक असून सैनिक, अग्निशामक दल, शल्य विशारद या व्यवसायासाठी बलवान मंगळ असणं गरजेचं असतं. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीत उच्च आणि कर्क राशीत नीच असतो. कृत्तिका, चित्रा, धनिष्टा नक्षत्राचा स्वामी असून मंगळाचा रंग लाल, रत्न मुंगा किंवा पोवळे आहे. निर्बल मंगळ असेल तर  'ओम अं.अंगारकाय नम: ' हा जप करावा. श्री गणेश उपासना करावी. आजचं बारा राशींचं भविष्य. मेष चंद्राचं कुंभ राशीतील भ्रमण लाभदायक असून दिवस चांगला आहे. तुमच्या बुद्धी चातुर्याने तुम्ही लाभ मिळवाल. संतती सुख उत्तम मिळेल. गुरुकृपा राहील. दिवस शुभ. वृषभ आज कामकाज सहजतेने आणि फारसा  त्रास न होता पार पडेल. उलट तुमची प्रशंसा होईल. सूर्य मिथुन राशीत आर्थिक बाजू सांभाळेल. दिवस समाधानकारक. मिथुन गुरू चंद्र आजही तुम्हाला उत्तम फळ देणार आहेत. काही नवीन विद्या, कला शिकण्याची संधी येईल. अध्यात्मिक उन्नती होईल. भावंड प्रेमाने राहतील. दिवस शुभ आहे. कर्क अष्टमस्थ गुरू चंद्र, राशीत मंगळ, व्यय स्थानी सूर्य अनुकूल फळ देणार नाही. दिवस मध्यम आहे. प्रकृतीकडे नीट लक्ष द्या. काही धाडस नको. दिवस मध्यम आहे. सिंह व्यय स्थानातील शुक्र मंगळ, तर सप्तम गुरू चंद्र संमिश्र फळ देणार आहेत. इकडे खर्च उभे राहणार आहेत. पण त्यासाठी पैसा पण उपलब्ध राहील. कार्य क्षेत्रात नेहमीच्या पद्धतीने दिवस घालवावा. मध्यम दिवस. कन्या आज शरीर जरा शिथील, अंग दुखणं असं काही वाटलं तर उपचार घ्या. दिवस संथ, कंटाळवाणा होऊ शकतो. काही धार्मिक बाबी, पूजा  इत्यादीसाठी खर्च संभवतो. दिवस मध्यम आहे. तुला तुमची प्रतिष्ठा, नावलौकिक वाढण्याचे संकेत आजचा दिवस देतो आहे. मुलांच्या प्रगतीचे मार्ग सुकर होतील. अष्टमात ग्रह नेहमीच प्रकृतीची काळजी घेण्याचे सुचवतात. दिवस चांगला. वृश्चिक आज तुम्ही आपल्या कुटुंबीयांना वेळ द्याल. त्यांच्यासाठी  काही तरी विशेष करून त्यांना खूश कराल. घरात रोजपेक्षा अधिक लक्ष घालून  जोडीदाराला चकित कराल. भाग्य उत्तम. धनु चतुर अणि प्रभावशाली वाणी आज तुम्हाला लोकांमध्ये वाहवा मिळवून देईल. फार खर्च, प्रवास  इत्यादी टाळा. नुकसान होऊ शकतं. भावंडं मदतीला तत्पर राहतील. दिवस अनुकूल. मकर अचानक येणारा पैसा कोणाला आवडत नाही? पण आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचा पैसाच मिळणार आहे. घरातल्या व्यक्ती सहकार्य करतील. जोडीदारासाठी जरा चिंता वाटेल. दिवस चांगला आहे. कुंभ राशीतून होणारे  शुभ ग्रहांचे भ्रमण मनाला उभारी  देईल. उत्तम पदार्थ, मौजमजा इकडे कल राहील. शत्रूवर विजय मिळवाल. मुलं खूश राहतील. दिवस  शुभ. मीन ईश्वर चरणी मन लागेल, त्यासाठी एखादी  पूजा किंवा वाचन कराल. प्रतिस्पर्धी जरा डोकं वर काढतील. पण धैर्याने तुम्ही त्यांना तोंड द्याल. संतती संबंधी शुभ कार्य कराल. अनुकूल दिवस. शुभम भवतु!!
Published by:Prem Indorkar
First published: