Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : सांभाळून राहा! थोडा अडचणीचा जाणार आजचा दिवस

दैनंदिन राशिभविष्य : सांभाळून राहा! थोडा अडचणीचा जाणार आजचा दिवस

तुमच्या राशीत आज काय?

तुमच्या राशीत आज काय?

Rashibhavishya : पाहा तुमचं आजचं राशिभविष्य (Daily horoscope).

आज तारीख 22 ऑगस्ट 2021.आज चंद्र दिवसभर मकर राशीत भ्रमण करेल. आज नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन (Raksha bandhan 2021). आजचे बारा राशींचे राशी भविष्य (Rashibhavishya). मेष आज चंद्र दशम स्थानात शनिसोबत असेल. चंद्र शनि योग नकारात्मक मानसिकता वाढवेल. कार्यक्षेत्रात काहीसा तणाव असेल. घरात काही गडबड राहिल. जास्त श्रम टाळा. दिवस शांततेत घालवा. वृषभ आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक उन्नती, गुरुकृपा आणि शुभ घटनांचे राहिल. आर्थिक बाजू चांगली राहिल. घरांमध्ये काही जास्तीची कामं, दुरुस्ती निघेल. दिवस एकूण गडबडीत जाईल. छोटे मोठे समारंभ होतील. मिथुन आज अष्टमात चंद्र शनि विचित्र मानसिक अवस्था करेल. मन कुठेही रमणार नाही  शारीरिक व्याधी डोकं वर काढतील. आर्थिक परिस्थिती मात्र चांगली राहील. संतती सुख चांगले. दिवस मध्यम आहे. कर्क आज चंद्र शनि सप्तम स्थानात असून जोडीदारासाठी  विशेष अनुकूल नाही. मानसिक आरोग्य जपा. खर्च जपून करा. अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्य ठरेल  दिवस शुभ. सिंह राशीतील मंगळ  सूर्य तुम्हाला तेजस्वी अणि आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल. मात्र खर्च आणि मिळकत याची गडबड होऊ देऊ नका. कोणालाही कठोर बोलू नका. दिवस मध्यम आहे. कन्या आज संततीसाठी थोडी  चिंता वाटेल. प्रकृती कडे लक्ष द्या. विशेष करून डोळ्यांची काळजी घ्या. अपघात टाळण्यासाठी वाहन जपून चालवा. आर्थिक गुंतवणूक सांभाळून करा. दिवस मध्यम जाईल. तुला आज राशीच्या चतुर्थ स्थानातील चंद्र शनि कार्यक्षेत्र आणि घर दोन्हीकडे अडचणी निर्माण करतील. जास्तीचा ताण पडेल. गुरु कृपेचा लाभ घ्या. चिंता करू नका. दिवस बरा. वृश्चिक आज दिवसभर काही ना काही सुरू राहिल. आर्थिक बाजू चांगली राहील. संतती सुख चांगले. घरात खूप काम पडेल. प्रवास योग येतील. तुमच्या भाग्याचे दिवस येणार आहेत. धनु आर्थिक भरभराट, अडकलेला पैसा मिळणे, सरकारकडून लाभ असा हा दिवस आहे. त्यासाठी थोडा प्रयत्‍न केला पाहिजे. कायदे पाळा. पोटाचे त्रास वाढतील. दिवस ठीक आहे. मकर आज राशीतील चंद्र शनि मन थोडे नाराज ठेवतील. जोडीदारासाठी भरभराटीचा काळ आहे. वाहन जपून चालवा. प्रवास एकट्याने करू नका. दिवस बरा जाईल. कुंभ आज व्यय स्थानातील चंद्र शनि परदेशासंबंधी काही बातमी देतील. प्रकृती जरा शिथील राहिल. आर्थिक बाजू ठिक आहे. व्यवसायात अचानक नवीन संधी मिळतील. दिवस मध्यम जाईल. मीन आज दिवस वृद्ध व्यक्तींकडून लाभ होण्याचा आहे. व्यय स्थानात गुरू धार्मिक कारणांवर खर्च होईल. काही नवीन ओळखी होतील. पैसा अतोनात खर्च होईल. पंचमात सूर्य बुध आहे. नाव लौकिक मिळेल. दिवस शुभ.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या