मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Daily horoscope : आजचा दिवस जरा जपून! 'या' राशींसाठी अडचणीचा ठरणार रविवार

Daily horoscope : आजचा दिवस जरा जपून! 'या' राशींसाठी अडचणीचा ठरणार रविवार

Horoscope today : आज चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल. कोणत्या राशीवर काय परिणाम होणार पाहा.

Horoscope today : आज चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल. कोणत्या राशीवर काय परिणाम होणार पाहा.

Horoscope today : आज चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल. कोणत्या राशीवर काय परिणाम होणार पाहा.

आज रविवार दिनांक 12 डिसेंबर 2021 मार्गशीर्ष शुक्ल नवमी. आज चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीच्या अष्टमात मंगळ, सूर्य, केतू फारसे अनुकूल नाहीत. पोटाचे विकार त्रास देतील. आत्मविश्वास कमी होईल. व्ययस्थ चंद्र मानसिक हुरहुर लावेल. जोडीदाराची चिंता वाटेल. दिवस मध्यम.

वृषभ

रवि सप्तम स्थानात केतूसोबत आहे. व्यावसायिक अणि वैवाहिक जीवनात जपून रहा. कुठेही अनावश्यक बोलू नका. दुराग्रह टाळा. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दिवस ठिक आहे.

मिथुन

राशीच्या षष्ठ स्थानात मंगळ केतू अणि रवि. काही महत्त्वाच्या तपासण्या करणं गरजेचे असेल तर करून घ्या. शत्रू किंवा मत्सरी लोक मानसिक त्रास देतील. अष्टमात शनि शेवटचे काही दिवस आहे. त्यानंतर भाग्य अनुकूल होईल दिवस कामात व्यस्त असा जाईल.

कर्क

मंगळ रवि केतू राशीच्या पंचम स्थानात येत आहे. शैक्षणिक, सामाजिक पातळीवर तुम्ही अग्रेसर राहाल. काही नवीन विद्या शिकण्यास अनुकूल वेळ. चंद्र आज अनुकूल आहे. भाग्यशाली दिवस.

सिंह

आज राशी स्वामी रवि केतू सोबत वृश्चिक राशीत येणार आहे. गृह सौख्याच्या पर्वाची सुरुवात होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. अष्टमात चंद्र मानसिक ताण दर्शवतो.

कन्या

तृतीय स्थानात मंगळ रवि केतू भावंडांना फारसं अनुकूल नाही. मात्र धैर्य, पराक्रमाची वाढ होईल. स्वभाव तेजस्वी होईल. जलराशी वृश्चिकेत रवि सर्दीसारखे विकार देईल. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस अनुकूल.

तुला

आज रवि केतू धनस्थानात प्रवेश करणार असून धन कुटुंब वाणी यासंबंधी काही समस्या निर्माण होतील. कठोर बोलणं टाळा. डोळ्याचे त्रास संभवतात. षष्ठ चंद्र आज शारीरिक त्रास दर्शवतो.

वृश्चिक

राशीत प्रवेश करणारे मंगळ सूर्य केतू स्वभाव आक्रमक करेल. चंद्र पोटासंबंधी काही समस्या असेल तर काळजी घ्या असं सुचवत आहे.  काहीतरी चिंता सतावू शकते. दिवस शांततेत घालवा.

धनु

व्यय स्थानात मंगळ सूर्य केतू परदेश गमन, त्यासंबंधी तयारी यासाठी प्रयत्‍न सुरू करा असं सुचवत आहे. काही आवश्यक कागदपत्रे तयार करा. घरात काही जास्तीचं काम निघेल. दिवस चांगला.

मकर

आज सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश मकर व्यक्तींना अनुकूल आहे. कामाचा व्याप वाढेल. मात्र लाभ होतील. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. प्रवास योग, भावंडांची भेट संभवते. दिवस अनुकूल.

कुंभ

राशीच्या कर्म स्थानात येणारा रवि महत्त्वाचा घडामोडी करेल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर होईल. काही नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम.

मीन

आज राशीच्या भाग्य स्थानात येणारा सूर्य  शुभ फळ देईल. मोठ्या व्यक्तींची मदत होईल. धार्मिक कार्य घडेल. लोन किंवा पैश्याची देवाणघेवाण जरा जपून  करा. राशीतील चंद्र वैवाहिक जीवनात गोडी वाढवेल. दिवस शुभ.

शुभम भवतु!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs