मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Daily horoscope : 'या' राशीसाठी फारसा अनुकूल नाही आजचा दिवस

Daily horoscope : 'या' राशीसाठी फारसा अनुकूल नाही आजचा दिवस

Daily horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार?

Daily horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार?

Daily horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार?

आज रविवार दिनांक 28 नोव्हेंबर 2021 आज चंद्र दिवसभर सिंह राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

दिवस चांगला असून गृह, कुटुंब, संतती याबाबतीत लक्ष घालण्याचा आहे. अध्यात्मिक साधना करण्यासाठी फार शुभ काळ. विद्यार्थ्यांना दिवस  अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या समाधानकारक.

वृषभ

राशीत असलेला राहु मानसिक द्वंद्व निर्माण करेल. वैचारिक गोंधळ होईल. घराकडे लक्ष द्या. घरकाम जास्त वेळ घेईल. प्रकृती चांगली राहील. दिवस चांगला आहे.

मिथुन

आज होणारे प्रवास फायदा करून देतील. गुरु शुभ आहे. अष्टम शनी आणि पंचम मंगळ व्यवहार सांभाळून करा हे सांगत आहेत. प्रकृती जपा. सप्तम स्थानी आलेला शुक्र खरेदी करायला लावेल. दिवस चांगला आहे.

कर्क

आज राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण शुभ संकेत  देत आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. अचानक धनलाभ संभवतो. अधिकारी  व्यक्तीशी  सांभाळून बोला. फायदा होईल. दिवस अनुकूल आहे.

सिंह

राशीत असलेला चंद्र, तृतीय  स्थानातील सूर्य अनेक संधी निर्माण करतील. चंद्र शुक्र योग शुभ आहे.  मंगळ  नवीन खर्च उभे करायला तयार आहे. पण काळजी नको. शुक्र आर्थिक लाभ करून देईल. गुरु उपासना  करावी.

कन्या

आज दिवस फारसा अनुकूल नाही. विचित्र अशी हुरहूर जाणवेल. खर्च होईल. नवीन काम सुरू होईल. भावंड मदत करतील. मुलांची अवाजवी चिंता करू नका. गुरु जप करणे  योग्य ठरेल.

तुला

आज दिवस लाभदायक आहे .आवडत्या व्यक्तीला भेटावंसं वाटेल. केलेल्या कामाची प्रशंसा होईल. कामाचं  फळ देणारा दिवस.

वडील व्यक्तींची काळजी  घ्या. त्यांना वेळ द्या. दिवस शुभ.

वृश्चिक

आज तुमचा  मान वाढेल. तसंच कामही वाढेल. जास्त ताण घेऊ नका. प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष  करू नका. जोडीदाराला काही छान वस्तू  मिळू शकतात. दिवस चांगला  आहे.

धनु

भाग्यशाली दिवस. ताण कमी होईल. छोटे प्रवास, मौजमजेसाठी वेळ जाईल किंवा त्यासंबंधी चर्चा होईल. तुमच्या बुद्धीचा उत्तम वापर करून  घ्या. भविष्याचं आर्थिक नियोजन  करा.

मकर

मानसिक ताणतणाव, आर्थिक नुकसान, संतती चिंता असा हा दिवस आहे. पण गुरु महाराज सगळ्यातून बाहेर काढतील. विश्वास ठेवा. मधुमेही व्यक्तींनी जास्त काळजी घ्या. खाण्यापिण्याचं बंधन पाळा. दिवस  मध्यम .

कुंभ

दिवस आनंदी आहे. मौजमजेसाठी वेळ काढा. जोडीने फिरायला जा किंवा घरात काही विशेष पूजा करा. शत्रूकडे लक्ष असू द्या. साडेसाती  सुरू आहे. शनी जप करा. दिवस  शुभ.

मीन

आज काहीसा थकवा येईल. खर्च करावा, कर्ज घ्यावं असं वाटेल. पण सावध. कोणाला हेवा वाटेल असं सध्या काही करू नका. शांततेत आपलं काम करत रहा, असं ग्रह सुचवतात. दिवस मध्यम.

शुभम भवतु.

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark, Zodiac signs