• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • दैनंदिन राशिभविष्य : आज 'या' राशीवर होणार लक्ष्मीकृपा; अचानक धनलाभाची शक्यता

दैनंदिन राशिभविष्य : आज 'या' राशीवर होणार लक्ष्मीकृपा; अचानक धनलाभाची शक्यता

Daily horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार आहे?

  • Share this:
आज रविवार दिनांक 31 ऑक्टोबर 2021. आज चंद्र दिवसभर सिंह राशीतून भ्रमण करेल. जाणून घेऊया आजचे बारा राशींचे राशी भविष्य. मेष दिवस चांगला असून गृह, कुटुंब, संतती याबाबतीत लक्ष घालण्याचा आहे. अध्यात्मिक साधना करण्यासाठी फार शुभ काळ. विद्यार्थ्यांना दिवस  अनुकूल. आहे. आर्थिक दृष्ट्या समाधानकारक. वृषभ राशीत असलेला राहू निर्णय घेताना थोडी द्विधा मनस्थिती करतील. वैचारिक गोंधळ निर्माण होईल. शेजार्‍यांपासून त्रास संभवतो. प्रकृती मध्यम राहील. आर्थिक घडामोडी होतील. दिवस  चांगला आहे. मिथुन आज होणारे प्रवास फायदा करून देतील. गुरू शुभ आहे. अष्टम शनी व पंचमात मंगळ व्यवहार सांभाळून करा हे सांगतात. प्रकृती जपा.  सप्तम स्थानी आलेला शुक्र घरासाठी, पत्नीसाठी काही खरेदी करायला लावेल. दिवस चांगला आहे. कर्क आज राशीच्या धनस्थानातील चंद्रभ्रमण शुभ संकेत देत आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. अचानक धनलाभ संभवतो. षष्ठ शुक्र अधिकारी  व्यक्तीशी भेट डोळ्याची काळजी घ्या. दिवस अनुकूल आहे. सिंह राशीत असलेला चंद्र, तृतीय स्थानातील सूर्य अनेक संधी निर्माण करतील. गुरु चंद्र दृष्टी योग शुभ आहे. मंगळ नवीन खर्च उभे करायला तयार आहे. पण काळजी नका. शुक्र आर्थिक लाभ करून देईल. गुरु उपासना करावी. कन्या आज दिवस फारसा अनुकूल नाही. विचित्र अशी हुरहूर जाणवेल. खर्च होईल. नवीन काम सुरू होईल. दागदागिने आकर्षित करतील. मुलांची  अवाजवी चिंता करू नका. गुरु जप करणं योग्य ठरेल. तुला आज दिवस लाभदायक आहे. आवडत्या व्यक्तीला भेटावंसं वाटेल. केलेल्या कामाची प्रशंसा होईल. कामाचे फळ देणारा दिवस. वडील व्यक्तींची काळजी घ्या. त्यांना वेळ द्या. दिवस शुभ. वृश्चिक आज तुमचा मान वाढेल. तसंच कामही वाढेल. जास्त ताण घेऊ नका. प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराला काही नवीन वस्तू  मिळू शकतात. दिवस चांगला  आहे. धनु भाग्यशाली दिवस. ताण कमी होईल. छोटे प्रवास, मौजमजेसाठी वेळ जाईल किंवा त्यासंबंधी चर्चा होईल. तुमच्या बुद्धीचा उत्तम वापर करून  घ्या. भविष्याचे आर्थिक नियोजन  करा. मकर मानसिक ताणतणाव, आर्थिक नुकसान, संतती चिंता असा हा दिवस आहे. पण गुरु महाराज सगळ्यातून बाहेर काढतील. विश्वास ठेवा. खाण्यापिण्याचे बंधन पाळा. दिवस मध्यम. कुंभ दिवस आनंदी आहे. मौजमजेसाठी वेळ काढा. जोडीने फिरायला जा किंवा घरात काही विशेष पूजा करा. शत्रूकडे लक्ष असू द्या. साडेसाती  सुरू आहे. शनी जप करा. दिवस शुभ. मीन आज काहीसा विचित्र थकवा येईल. खर्च करावा, कर्ज घ्यावं असं वाटेल. पण सावध. कोणाला हेवा वाटेल असं सध्या काही करू नका. शांततेत आपलं काम करत रहा असं ग्रह सुचवतात. दिवस मध्यम. शुभम भवतु.
Published by:Priya Lad
First published: