मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : जोडीदारासोबतचा वाद आजच मिटवा नाहीतर...; काय घडेल तुमच्या राशीत पाहा

Daily Horoscope : जोडीदारासोबतचा वाद आजच मिटवा नाहीतर...; काय घडेल तुमच्या राशीत पाहा

राशिभविष्य.

राशिभविष्य.

सूर्यराशीनुसार 30 सप्टेंबर 2022 या दिवसाचं तुमचं राशिभविष्य पाहा.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 30 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

आजचा दिवस खूपच दमवणारा असेल, असं वाटत आहे. तुमच्या मनात अनेक गोष्टी सुरू असून, त्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी सोडवण्याचा तुमचा मूड आहे. तुम्हाला एकाच वेळी थोडा संयम बाळगण्याची, तसंच थोड्या मार्गदर्शनाची गरज आहे.

LUCKY SIGN - Calming music

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुमचं लक्ष नसताना अनेक गोष्टी घडल्या आहेत. तुमच्या मनातून त्या गोष्टी काढून टाकण्याआधी त्या फॅक्ट्सबद्दल जाणून घ्या. गेल्या काही दिवसांत खूप खर्च झाला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या पद्धतीचा आढावा घ्यावा लागणार आहे.

LUCKY SIGN - A silver chain

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या गोष्टी दिसाव्यात, त्याप्रमाणे विस्कळीत दिसणाऱ्या बाबी आता अगदी सुरळीतपणे दिसत असल्याचं तुम्हाला जाणवू लागलं असेल. तसंच, त्या समजून घेण्यासाठी तुमच्या मनात पुरेशी स्पष्टताही आता आहे. तुमच्या अ‍ॅप्रोचमध्ये थोडा बदल केल्यास वेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. संधी लवकरच येण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A book cover

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुम्ही बऱ्याच काळापासून थोड्या रिलॅक्सेशनची वाट पाहात होतात. ते क्षण तुम्हाला तुमच्या आवडीच्या ट्रिपमधून मिळण्याची शक्यता आहे. सध्या दैनंदिन आयुष्य खूप धकाधकीचं आहे. रिलॅक्सेशन अनुभवत असताना पुढचा प्लॅन आखून ठेवावा आणि त्याची अंमलबजावणीही करायची आहे याची खूणगाठ मनाशी बांधावी.

LUCKY SIGN - A rose quartz

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

भावनांपेक्षा अजेंडा जास्त प्रबळ असतील. तुम्ही एखाद्या गोष्टीत भावनिकदृष्ट्या गुंतला असाल आणि जेव्हा ती संपेल तेव्हा तुम्हाला त्यापासून मोकळं होणं कठीण जाईल. तुमच्या कामाची दखल लवकरच घेतली जाईल.

LUCKY SIGN - A blue sapphire

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

अनेकदा तुमच्या विचारांपेक्षा तुमच्या मतांचा आवाज अधिक मोठा असेल. अशा परिस्थितीत तुमचा संवाद विचारपूर्ण आणि टोन व्यवस्थित असावा, याकडे लक्ष द्यावं. पर्फेक्शनसाठीच्या तुमच्या संघर्षामुळे अन्य व्यक्तींना कदाचित काही त्रास सोसावा लागू शकेल.

LUCKY SIGN - A solo performance

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीत गुंतलेले असताना तुमचे विचार अनियंत्रित होणार नाहीत, याची काळजी घ्या. येत्या काही दिवसांत आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुमचं कुटुंब तुम्ही विचार करता त्यापेक्षाही अधिक प्रमाणात मानसिकदृष्ट्या तुमच्यावर अवलंबून आहे.

LUCKY SIGN - A large window

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

काही काळासाठी तुम्ही अति विचार करत आहात. त्याची तुम्हाला कशासाठीही मदत होणार नाही. तुमचे विचार एकत्र करा, ठोस प्लॅन तयार करा, एखाद्या विश्वासू, अवलंबून राहता येण्यासारख्या व्यक्तीसोबत नव्या कल्पनांबद्दल चर्चा करा. त्यानंतर तुम्हाला पुढची दिशा मिळेल.

LUCKY SIGN - A tennis racket

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्हाला तुमच्या खाण्याच्या जुन्या सवयींपासून सुटका मिळवायची आहे; पण तुम्ही त्यात यशस्वी झाला नाही आहात. आता त्या सगळ्याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. आता कठीण काळ संपल्यासारखं वाटत आहे.

LUCKY SIGN - A cluster of birds

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुम्ही दुसरा काही मार्ग शोधत असाल, तर तुम्ही हातातली संधी गमावून बसाल. तुमच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असेल किंवा एखादी गोष्ट करू की नको याबद्दल अति विचार करत असाल, तर तुम्ही ती गोष्ट हातची घालवून बसाल. तुम्हाला झेप घेण्यासाठी शक्ती लावावी लागेल.

LUCKY SIGN - A heritage clock

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुम्ही रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असाल, तर तुम्हाला अनुकूल अशा काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे. एकामागून एक नवे खर्च येत आहेत; मात्र तुम्ही ते सारं प्रभावीपणे मॅनेज करण्यात यशस्वी व्हाल. प्रकृती उत्तम राखण्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे.

LUCKY SIGN - A bell

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने काही गोष्टींवर संवाद न करण्याचं ठरवलं असेल; मात्र तो मुद्दा आता सोडवण्याची गरज आहे. कारण भविष्यात कधी तरी ते वेदनादायी ठरू शकतं. गोष्टी तात्पुरत्या बाजूला ठेवण्याऐवजी कायमची सोडवण्याला प्राधान्य द्या.

LUCKY SIGN - A semi precious gem

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs