मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात घाई नको; आधी वाचा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात घाई नको; आधी वाचा तुमचं राशिभविष्य

राशिभविष्य. (फोटो सौजन्य - Canva)

राशिभविष्य. (फोटो सौजन्य - Canva)

सूर्यराशीनुसार 27 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं राशिभविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

आज कामाच्या ठिकाणी तुम्ही प्राप्त केलेलं यश, तसंच भूतकाळातली कामगिरी याचा आढावा घेण्याचा दिवस आहे. काम पुढे ढकलण्याची तुमची सवय मोडलीत, तर तुम्हाला उपयोग होईल. भूतकाळातली एखादी व्यक्ती मदतीसाठी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करील.

LUCKY SIGN – A Rose quartz

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

दिवसभरात एक-दोन हलक्याफुलक्या घटना घडतील. त्या अँटी स्ट्रेस थेरपीप्रमाणे काम करतील. तुमचा आतला आवाज काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. ते नंतर आकार घेईल. स्वतःसाठी वेळ काढण्याचा विचार असेल, तर त्यासाठी उत्तम दिवस.

LUCKY SIGN – A wooden box

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

आज तुम्ही ठरवलेल्या गोष्टीत यश मिळेल, मग ती कितीही छोटीशी गोष्ट का असेना. तुमच्या मुलाला काही गोष्टी थेट तुमच्याकडूनच ऐकायच्यात. त्याऐवजी त्याला काहीही नकोय. कुटुंबाला सुखद सरप्राइज मिळू शकतं.

LUCKY SIGN – A bright tie

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

एखादी नवी व्यक्ती कोलॅबोरेशनचा प्रस्ताव घेऊन येईल. तुम्ही खासगी नोकरीत असल्यास पैशांचा प्रवाह आश्वासक दिसू लागेल. मागील काही दिवसांमध्ये घेतलेल्या निर्णयांवर पुन्हा विचार कराल.

LUCKY SIGN – A notebook

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

आज तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आनंदी होण्याचं कारण मिळवून द्याल. काही निर्णय तुम्ही पुढे ढकलत होतात, ते आता रद्द कराल. एखादी हरवलेली वस्तू अचानक परत मिळण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN – A Silver plate

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

एखाद्या गोष्टीबाबत पूर्ण माहिती न घेता तुम्ही जर तुमचं मत बनवत असाल, तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुमच्या कामाचा विस्तार होण्यासाठी काही संधी चालून येतील. एखादी आवड, इच्छा पुन्हा उफाळून येऊ शकेल लागेल.

LUCKY SIGN – A Bronze article

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुम्हाला वाटलं होतं त्याहीपेक्षा आधीच सेलिब्रेशन होईल. कुटुंबातील एखादी व्यक्ती उदास राहील. तिच्याशी स्पष्ट संवाद साधणं उपयुक्त ठरेल. महत्त्वाचे निर्णय घाईघाईत घेऊ नका, अन्यथा त्याचे दुष्परिणाम दिसून येतील.

LUCKY SIGN – A New upholstery

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

एखादा जवळचा मित्र नकारात्मक भावनांमध्ये गुंतेल. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला तुमची मदत लागू शकते. तुम्हाला आज ऊर्जा थोडी कमी वाटेल; मात्र ते तात्पुरत्या काळासाठी राहील. घराबाहेर पडून काहीतरी केल्यामुळे तुम्हाला पुन्हा सक्रिय व्हायला मदत होईल.

LUCKY SIGN – Sugar Syrup

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्ही विनाकारण खूप भावनिक व्हाल. कामाच्या ठिकाणी घडामोड अचानक घडेल. खरोखरच तुमच्यासाठी चांगला विचार करणाऱ्या व्यक्ती कोण याकडे तुम्ही लक्ष ठेवायला हवं.

LUCKY SIGN – A Solar Panel

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुम्ही ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आहात, अशा जवळच्या व्यक्तींपैकी काही व्यक्ती त्या विश्वासाला पात्र नाहीत. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीकडून मिळालेल्या संदेशामुळे त्रास होईल. एखाद्या नव्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्यासंबंधी सकारात्मक संकेत मिळतील.

LUCKY SIGN – Favourite Fashion Label

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमच्या एखाद्या निर्णयावर ठाम न राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमच्यावर एखादी अतिरिक्त जबाबदारी येऊ शकेल. तुम्हाला काय वाटतं ते अधिक स्पष्टपणे व्यक्त करा.

LUCKY SIGN – A Coloured glass

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

एखादं काम पूर्ण करण्यासाठी नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा आणि पुढचं नियोजन करण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्या बॉसला तुमच्याकडून पुन्हा एकदा खात्री हवी असेल. तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या अगदी जवळ पोहोचाल. प्रिय व्यक्तीचा सल्ला घेणं चांगलं राहील.

LUCKY SIGN – A blue crystal

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs