Home /News /astrology /

Daily Horoscope : 'या' राशीच्या आयुष्यात 'ती' पुन्हा येतेय; विचारपूर्वक घ्या निर्णय

Daily Horoscope : 'या' राशीच्या आयुष्यात 'ती' पुन्हा येतेय; विचारपूर्वक घ्या निर्णय

Daily horoscope 26 June 2022 : तुमच्या राशीनुसार तुमचा 26 जून 2022 चा दिवस कसा जाणार पाहा राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 26 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्ही जेवढे अधिक विनम्र व्हाल तेवढा इतरांचा तुमच्यावरचा विश्वास वाढत जाईल. तुम्ही विनम्र असलात तर अनेक गोष्टी फारशा विरोधाशिवाय होत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. तुमची मुलं हा तुमच्या आनंदाचा मुख्य स्रोत आहे. कामासाठी प्रवास पुढे ढकलला गेला असेल तर तो आता होण्याचे संकेत आहेत. नेहमीच्या रूटीनला आत्ता थोडा ब्रेक देऊन अन्य जबाबदाऱ्यांकडे लक्ष देऊ शकता. पैशांचा प्रवाह चांगला आहे आणि ताणाची पातळीही नियंत्रणात आहे. LUCKY SIGN - Black Tourmaline वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) सांसारिक जीवन कमी आव्हानात्मक वाटेल आणि खूप उंच झेप घेण्यासाठी तुम्ही एखाद्या नव्या प्रेरणेचा शोध घ्याल. एखादा जुना सहकारी तुमच्याशी वैयक्तिक कामासाठी संपर्क साधील. संधी मर्यादित आहेत; मात्र तुम्हाला एक मिळू शकेल. सध्याचा काळ स्वीकारण्याचा आहे आणि तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्याल. दाबून ठेवलेल्या भावनांचं कदाचित सार्वजनिकरीत्या प्रदर्शन होईल. त्यामुळे इतरांना त्रास होऊ शकेल. गेल्या काही काळात झालेली आर्थिक प्रगती आता काही काळ स्थिर राहील. LUCKY SIGN - Clear quartz मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या गरजा आणि इच्छा यांच्या अनुषंगाने अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. तसं एकदा झालं, की तुम्ही कृतज्ञतेच्या भावनेने भारलेले असाल. एखाद्या किरकोळ मुद्द्यावरून वादविवाद किंवा भांडणाची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराला तुमचा विचार कळलेला नाही आणि जोडीदाराकडून पूर्णतः विरुद्ध काही तरी सुचवलं जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्वतःसाठी काही वेळ काढावा किंवा स्वतःला काही स्पेस असावी, असं वाटेल. आध्यात्मिक साधनेतून शांतता मिळेल. LUCKY SIGN - Yellow sapphire कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल अनेकदा काही गृहीत धरलं असेल, तर तुमची भीती खरी ठरण्याची शक्यता आहे. हे थांबवण्यासाठी सातत्याने त्यावर विचार करणं थांबवावं. तुम्ही तुमच्या मानसिक सामर्थ्यावर काम करत असल्याप्रमाणे दिवसाची ऊर्जा शिस्तबद्ध दिसत आहे. तुम्ही तुमचं रूटीन अगदी बारकाईने पार पाडू शकाल. तुमचे काही मित्र तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र तुम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा नाहीये. तुमच्याकडे कोलॅबोरेशनची काही नवी कल्पना असली, तर तुम्ही पार्टनर निवडताना पुन्हा विचार केला पाहिजे. LUCKY SIGN - Blue sapphire सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत तुमची अपॉइंटमेंट असली, तर त्यांचा वेळ आणि मेंटल स्पेस यांचा आदर करा. तुम्हाला ज्या कल्पनांची अंमलबजावणी करणं शक्य नसेल, त्या कल्पनांबद्दल बोलणं टाळू शकता. सध्या आर्थिक परिस्थिती बिकट असून, ती परिस्थिती लवकरच सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. वरिष्ठांवर तुमचं इम्प्रेशन पडलं आहे आणि ते खोटं ठरणार नाही, यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. एखादी वृद्ध व्यक्ती तुमच्याकडे साह्य मागण्याची शक्यता आहे. आई-वडील काही तरी महत्त्वाचं नियोजन करत असण्याची शक्यता असून, त्यात त्यांना तुमच्या मताची गरज आहे. LUCKY SIGN - Amethyst कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) कोणी तरी मुद्दामहून वाद उकरून काढण्याची शक्यता आहे. त्याला विरोध करा. दिवसाच्या उत्तरार्धात Temperament शांत करण्यात यश मिळेल. तुम्हाला काम आणि ताण देऊन ओझं टाकण्याचा प्रयत्न इतरांकडून होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनात बऱ्याच काही गोष्टी सुरू आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणं महत्त्वाचं नाही. तुम्हाला भूतकाळातल्या एखाद्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणं शक्य होऊ शकेल. घराबाहेर काही वेळ घालवल्यास तुम्हाला हवा असलेला बदल मिळेल. LUCKY SIGN - Garnet stone तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुम्ही एखादा प्लॅन आखला असेल; मात्र तो प्रत्यक्षात येण्यासाठी थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. उशीर होण्यासाठी नेहमीची साधीसुधी कामं कारणीभूत ठरतात. तुम्ही पूर्वी केलेल्या कामाबद्दल आता गौरव होईल. एका वेळी एकच काम करावं. एका वेळी अनेक गोष्टी करणं, अनेक गोष्टींवर विचार करणं यांमुळे गोंधळ उडू शकतो आणि विनाकारण ताण येतो. मानसिक स्वस्थता मिळण्यासाठी एखादा छोटा ब्रेक घ्या. LUCKY SIGN - Green onyx वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) खासगी संभाषण सार्वजनिक ठिकाणी करणं टाळा, खासकरून ते तुमच्या जोडीदाराबरोबर असलं तर. तुम्हाला नको असलेल्या भावनांमध्ये तुम्ही अडकत असल्याची जाणीव होईल. दिवस संमिश्र भावनांचा आहे. भूतकाळातल्या अल्पकालीन रिलेशनशिपमधली व्यक्ती तुमच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करील. तुम्हाला भावनिकदृष्ट्या असुरक्षित झाल्यासारखं वाटेल. कोणतेही निर्णय अचानक, विचार न करता घेऊ नका. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही गोंधळलेले असलात, तर सोडून द्या. LUCKY SIGN - Lapis lazuli धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) स्वतःचे लाड करा. कारण तुम्हाला रिफ्रेश होण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचं रिलॅक्सेशन तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला मदत करील. पूर्वी एखादी व्यक्ती तुम्हाला आकर्षक वाटली नव्हती, ती आता इंटरेस्टिंग वाटू लागेल. तुम्हाला मित्रांसोबत कमी, तर स्वतःसोबत जास्त वेळ घालवावासा वाटेल. तुमच्यावरच्या एखाद्या कौटुंबिक ताणाचा प्रश्न आता निकाली निघेल. उगीचच कोणाचं तरी साह्य मागू नका. LUCKY SIGN - Tiger’s eye मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमच्या अलीकडच्या प्रेझेंटेशनमुळे कामाच्या ठिकाणच्या व्यक्तींवर तुमचं चांगलं इम्प्रेशन तयार होऊ शकेल. तुमच्यावर लक्ष ठेवून असलेली एखादी व्यक्ती तुमच्यासाठी एखाद्या सकारात्मक बदलाचं नियोजन करू शकते. तुमचा तुमच्यावरचा विश्वास बऱ्याच काळाने पुन्हा प्रस्थापित झाला आहे. तुमच्या पूर्वीच्या कामामुळे तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होईल. तुम्ही काही गुंतवणूक केली असेल, तर त्यात थोडी हालचाल दिसू शकेल. तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपमधले विषारी विचार काढून टाकण्याचा विचार करा. LUCKY SIGN - A malachite कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) दुसऱ्या व्यक्तीच्या हेतूचा अंदाज लावणं फारसं सोपं नाही. तरीही तुम्ही ती जोखीम पत्करू इच्छिता. नंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींवर विश्वास टाकणं सोपं होईल. सध्याच्या प्लॅनला पुरेसं बॅकअप आहे ना, याची खात्री करा. लवकरच ट्रिप किंवा प्रवास घडण्याची शक्यता आहे. तुम्ही दुर्लक्ष करू इच्छित असलेली एखादी व्यक्ती अचानक येऊन भेटण्याची शक्यता आहे. तुमचे जवळचे मित्र काळजीपूर्वक आणि शहाणपणाने निवडा. LUCKY SIGN - A black obsidian मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखाद्या विशिष्ट मुद्द्याबद्दल तुम्ही पुराणमतवादी राहाल आणि ते इतरांच्या लक्षात येईल. प्रोजेक्ट लवकर पूर्ण करण्यासाठी साधा दृष्टिकोन तुम्हाला उपयोगी ठरेल. एखाद्या प्रभावी व्यक्तीशी तुमची भेट होण्याची आणि त्या व्यक्तीशी कोलॅबोरेशन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. धैर्य असणं उपयुक्त असतं. दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Citrine
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या