मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : 'या' राशीला मोठा फटका बसण्याची शक्यता; महत्त्वाची कागपत्रे, डेटा जपून ठेवा

Daily Horoscope : 'या' राशीला मोठा फटका बसण्याची शक्यता; महत्त्वाची कागपत्रे, डेटा जपून ठेवा

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

25 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं राशिभविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 25 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

तुम्ही एखाद्या गोष्टीत पूर्णपणे सहभागी झाला नसलात, तर वचन न देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलाला एकाग्रतेचा अभाव जाणवत असेल. तुम्ही धातुविषयक व्यवसायात असलात, तर नफ्याचा फेरआढावा घेण्याचा काळ आला आहे. एखादी महत्त्वाची गोष्ट तुम्ही गमावली असेल, तर ती तुम्हाला पुन्हा प्राप्त होण्याची शक्यता आहे. तुमच्या एकंदर निर्णयाला नातेवाईकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. परदेशातल्या एखाद्या संधी वाट पाहत असलात, तर ती आता येण्याची शक्यता आहे. तुम्ही सिंगल असलात, तर तुम्हाला योग्य व्यक्ती तुमच्या कल्पनेपेक्षा लवकर मिळेल.

LUCKY SIGN - A key holder

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

ज्यांना दुसऱ्या संधीची गरज आहे, त्यांच्यासाठी अखेर आज नवा, ताजा दिवस उजाडला आहे. तुम्ही आता रिसेट बटण दाबून पुन्हा सुरुवात करा आणि पुन्हा गोष्टी गृहीत धरू नका. काम करण्यापूर्वी तुम्ही काय सांगताय, याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तिला हवी असलेली नात्यातली ऊब शोधत असण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याचा प्रवास तुम्हाला करायचा आहे; मात्र तुम्हाला लवकर होम-सिकनेस वाटेल. तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची विशेष काळजी घ्या.

LUCKY SIGN - A stained glass

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

प्रत्येक गोष्टीच्या मध्यात तुम्हाला असमाधानी वाटेल. प्रत्येक गोष्टीच्या प्रेझेंटेशनचं तुमच्यासाठी खूप महत्त्व आहे. अन्य स्टेकहोल्डर्सशी तुमचा छोटा वाद होऊ शकतो. मित्रांसोबत केलेलं छोटं आउटिंग दिलासादायक ठरेल. गुंतागुंत कमी ठेवणं भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला उपयुक्त ठरेल. कामाची एखादी इंटरेस्टिंग संधी किंवा कल्पना तुमचं लक्ष वेधून घेईल. आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये किंवा त्यावरचे उपचार पुढे ढकलू नयेत.

LUCKY SIGN - A new game

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

एखाद्या नवीन गोष्टीत घेतलेला रस तुम्हाला व्यग्र ठेवील. वेळेआधी केलेली पूर्ण पूर्वतयारी उपयुक्त ठरेल. एखादी नवी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमचं लक्ष वेधून घेईल. दुर्लक्ष केल्यामुळे तुम्ही एखादं महत्त्वाचं काम गमावून बसाल. तुमचं मूल तुम्हाला त्याच्या एखाद्या गुप्त अचीव्हमेंटच्या माध्यमातून सरप्राइज देईल. आज तुम्ही काही चांगल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्याल.

LUCKY SIGN - An electric gadget

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

कोणत्याही क्षणी तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव वाटला, तर लक्षात घ्या की हा टप्पा जाणार आहे. कामाच्या ठिकाणी काही सीनिअर्स तुमच्या कामाचा आढावा घेऊ इच्छित असतील. तुमच्या कामाच्या काळात कौटुंबिक सोहळा येईल. त्यामुळे गोंधळ उडेल. दूर अंतरावर राहणारं तुमचं एखादं भावंड किंवा नातेवाईक भेटण्याचं ठरवू शकतं. कामाशी भावना जोडल्यामुळे तुमच्या कामाचा वेग मंदावेल. तुम्ही काही अल्पकालीन उद्दिष्टं ठरवली असलीत, तर तुम्ही ती पूर्ण करू शकाल. विनयशीलता नसलेला तुमचा अचानक निघालेला उद्गार तुमच्यासोबत दीर्घ काळ राहील.

LUCKY SIGN - A lake

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुमची उद्दिष्टं साध्य झाली, तर तुमच्या ऊर्जेमध्ये चांगल्यासाठी बदल होईल. तुम्हाला लवकरच काही नवं काम मिळेल. काही जण काही अंतर राखून तुमच्याकडे पाहत असण्याची आणि तुमचं कौतुक करत असण्याची शक्यता आहे. पूर्वीपेक्षा तुमच्या कौशल्यांचा वापर अधिक प्रमाणात केल्यास तुमच्या खेळात बदल होईल. उत्स्फूर्तपणे दिलेलं उत्तर ही तुमची दखल घेतली जाण्यासाठीची गुरुकिल्ली ठरू शकते. लवकरच आध्यात्मिक सहल होण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A new dress

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

काम करत असताना तुमचे प्रयत्न जास्तीत जास्त असू द्या. कारण अन्य व्यक्तींचं तुमच्यावर बारकाईने लक्ष असेल. तुम्ही अलीकडेच कामावर घेतलेली व्यक्ती तुम्हाला भावनिक किंवा शारीरिक हानी पोहोचवण्याची शक्यता आहे. एखादा रस्तेप्रवास होण्याची शक्यता आहे. तुमचे आई-वडील त्यांच्या रूटीनमधून वेळ काढून तुमच्याकडे मदत मागू शकतात. पुढचे काही दिवस संथ असतील, असे ग्रहसंकेत आहेत. तुम्ही स्वतःची चाचपणी करण्यासाठी त्या दिवसांचा वापर करू शकता.

LUCKY SIGN - An eagle

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

कामाच्या ठिकाणी झालेली कोणतीही नवी घडामोड तुमच्या दृष्टीने अनुकूल ठरेल... काही जणांसाठी आत्तापुरती, तर काही जणांसाठी दीर्घ काळाकरिता. आता तुम्हाला संतुलित आणि समाधानी वाटत असेल. आर्थिक प्रवाह सुरळीतपणे विनाखंड सुरू असेल. काही प्रलंबित कायदेविषयक प्रकरणांमध्ये काही सकारात्मक हालचाली दिसतील. एकंदरीत स्थिर काळ आहे. जुन्या ओळखीच्या व्यक्तींशी पुन्हा गाठीभेटी होण्याची शक्यता. त्यातून भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमाल.

LUCKY SIGN - Chamomile flower

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

आताचा काळ खूप कष्टांचा आणि तुमची क्षमता सिद्ध करण्याचा आहे. भूतकाळातल्या तुमच्या कामामुळे तुमची दखल घेतली जाईल. तुम्ही ज्या संधीवर लक्ष ठेवून आहात, त्यावर अन्य अनेक व्यक्तीही लक्ष ठेवून आहेत. तुमची रिलेशनशिप काही आव्हानांमधून जाईल. स्वतःच्या क्षमतेबद्दल काही शंका/अविश्वास वाटत असल्यास ते सोडून द्या. तुमचं मूल एखादं नवं कौशल्य दाखवील. रिटेल थेरपीमुळे तुम्ही ताजेतवाने होऊ शकाल.

LUCKY SIGN - A butterfly

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांच्या आधारे आजूबाजूच्या सर्वांना सरप्राइज देण्याची आता तुमची वेळ आहे. तुम्ही गेल्या काही काळात न भेटलेली व्यक्ती तुमच्या गेस्चरबद्दल कौतुक करू शकते. तुमचं टॅलेंट दर्शवण्यासाठी तुम्हाला छोटी संधी मिळू शकते. नियम पाळणं ही तुमच्यासाठी सध्या समस्या होऊ शकते असं दिसतंय. एखादी वयोवृद्ध व्यक्ती तुमच्या कृतींवर टीका करील. पाळीव प्राणी आवडत असलेली व्यक्ती एखादा नवा प्राणी आणेल.

LUCKY SIGN - A fur slipper

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

खेळ हा तुमच्या आवडीचा विषय असला, तर सध्या तुमच्यासाठी योग्य काळ आहे. तुम्ही तुमची कौशल्यं वाढवू शकता आणि काहीशा अवघड वाटणाऱ्या संधीतून पार होऊ शकता. तुमचे आई-वडील व्यग्र असू शकतील. तुमच्या अपेक्षा कमी ठेवा. सावधगिरी न बाळगल्यास तुमच्यापैकी काही जण कायदेशीर अडचणीत अडकू शकतात. कामाची जागा बदलावी अशी इच्छा होईल; मात्र सध्या तरी असाल तिथेच राहणं चांगलं. गोष्टी योग्य पद्धतीने घडत नसतील, तर रिसेट मोडचा वापर करा.

LUCKY SIGN - Calming music

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

अडचणीच्या किंवा परीक्षा पाहणाऱ्या काळात तुमच्या भावना दाबून टाकण्याची गरज नाही. जवळच्या व्यक्तीसोबत आउटिंग केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत येईल. भूतकाळ आठवणं हे कायमच चांगलं असतं असं नाही. काही वेळा त्यातून काही नकोशा गोष्टींनाही चालना मिळू शकते. बँकिंगमधल्या काही समस्यांमुळे विनाकारण उशीर होईल. महत्त्वाच्या कामाची कॉपी ठेवा. कारण डेटा लॉसची शक्यता आहे. छोट्याशा गैरसमजाकडे योग्य पद्धतीने वेळीच लक्ष दिलं नाही, तो दूर केला नाही, तर दीर्घ काळ टिकू शकतो.

LUCKY SIGN - A tarot card

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs