मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : 'ती' हुकलेली संधी पुन्हा मिळणार; 'या' राशीच्या व्यक्तींनी तयार राहा

Daily Horoscope : 'ती' हुकलेली संधी पुन्हा मिळणार; 'या' राशीच्या व्यक्तींनी तयार राहा

आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

खूप आधी येऊन गेलेली जुनी संधी पुन्हा तुमच्यासमोर येईल तर काही जणांना नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 24 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) एखाद्या जवळच्या व्यक्तीला कदाचित तुमच्या पाठिंब्याची, आधाराची गरज भासेल. त्यातून काही मुद्द्यांवर मतभेद होतील; मात्र ते लवकरच सुटतील. हाती अधिकार असलेल्या एखाद्या व्यक्तीला भेटायला जाताना तुम्हाला कदाचित संकोच वाटेल किंवा कदाचित थोडेसे निराशही व्हाल. LUCKY SIGN - A money plant वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) आजचा दिवस तुमची इच्छा असली, तर पूर्णपणे आनंदाचा आणि सेलिब्रेशनचा असू शकेल. तुमची इच्छा नसली तर मात्र दिवस कंटाळवाणा ठरू शकेल. निवडीचा अधिकार तुम्हाला आहे. आर्थिक बाबतीत घाई-गडबडीत निर्णय घेऊ नका. LUCKY SIGN - A red decor मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) पैशांचा प्रवाह वाढल्याने तुमच्या आशा पल्लवित होतील. तुम्हाला कसलं व्यसन असलं, तर आता तुमच्या सवयींमध्ये सुधारणा झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. गृहिणींचं वेळापत्रक खूप व्यग्र असेल आणि नव्या वेळापत्रकाशी जुळवून घेण्यात थोडीशी अडचण येईल. LUCKY SIGN - A soft toy कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एरव्ही तुमचे विचार शिस्तबद्ध असतात; मात्र मनात कन्फ्युजन झाल्यामुळे विचार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी थोडा शांत वेळ काढण्याची गरज आहे. अचानक मागणी वाढल्याने कापड उद्योगात तेजी अनुभवता येईल. LUCKY SIGN - A signal सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) पुढे काय करायचं याबद्दलची कल्पना तुम्हाला आलेली आहे; मात्र तुम्ही अद्याप त्या कल्पनेला तुमचं 100 टक्के देत नाही आहात. आता वेळ भरारी घेण्याची आहे. तुम्ही भूतकाळात केलेल्या एखाद्या गोष्टीची दखल घेतली जाण्याची किंवा त्यासाठी पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A bike कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) बराच काळ सुप्तावस्थेत असलेल्या एखाद्या कल्पनेचा विस्तार करण्याची वेळ आता आली असल्याचे संकेत आहेत. बीज रुजून रोप होईल आणि त्याचं पुढे झाडात रूपांतर होईल. तुम्ही ट्रिपवर असताना रोमँटिक इच्छा असलेल्या एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A feather तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखादं आउटिंग, गेट-टुगेदर किंवा पार्टी होण्याचे संकेत आहेत. दिवसाचा उत्तरार्ध पूर्वार्धाच्या तुलनेत अधिक ताजंतवानं करणारा असेल. सकाळपासून दुपारपर्यंत तुम्ही थोडे आळसावल्यासारखे असाल. LUCKY SIGN - A karaoke वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) इतरांना तुमच्या ठाम कल्पनांबद्दल काही समस्या असल्या, तरी तुम्हाला मात्र त्या कल्पना पटलेल्या आहेत. तुमच्या मानसिक लवचिकतेबद्दल तुम्हाला कदाचित थोडं काम करावं लागण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी एखादी चांगली संधी तुमच्यासमोर आली होती. ती आता कदाचित पुन्हा येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A new book धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) बऱ्याच काळानंतर तुम्हाला आता अधिक संतुलित असल्यासारखं वाटेल. तसंच, तुमच्या आजूबाजूला सुरू असलेल्या बऱ्याच गोष्टींबद्दल तुमच्या मनात स्पष्टता आली आहे. आता शिस्तबद्ध व्हा. उत्साहाने पुढे वाटचाल करण्यासाठी ठोस प्लॅन तयार करा. तुम्ही पूर्वी कोणाला कर्ज देऊ केलं असेल, तर ते आता परत मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A piano मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी सज्ज राहायला हवं. कारण काही व्यक्ती तुमच्या अधिकारपदाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. कोणी तुमच्या अंतर्गत विषयांमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही तुमची नाराजी व्यक्त करू शकता. टीनएजर्सचा सध्याचा काळ गोंधळाचा असू शकेल. LUCKY SIGN - Square box कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही तुमचं भावनिक रूप मागे ठेवून व्यावहारिक रूप पुढे आणलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आयुष्यात जेव्हा महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज असते, तेव्हा गप्प पडून राहणं तुम्हाला परवडणारं नाही. एखादी नवी संधी तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही अ‍ॅडजस्टमेंट्स कराव्या लागण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A gift box मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) नव्या गोष्टी स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाची तयारी झाली आहे, असं वाटतं. जे काही होईल, ते स्वीकारा; पण तुमचं मन अस्वस्थ असावं. भीती मागे टाकून तुम्ही पुढे जायला हवं. सर्व काही नियतीच्या नियोजनानुसार चाललं आहे. LUCKY SIGN - A clock tower
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या