सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 24 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल )
एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. एखादं गेट-टुगेदर होईल, ज्यामुळे तुम्हाला रुटीनमधून चांगला ब्रेक मिळेल. मन आनंदी होईल. नवीन कामाचा विचार करत आहात ते आकार घेऊ लागेल.
LUCKY SIGN - A piece of camphor
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
आपल्या हाताखालच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देणं खूप महत्त्वाचं ठरेल. तुमचं कौतुक असणाऱ्या व्यक्तीला तुमच्यासोबत थोडा वेळ घालवण्याची इच्छा असेल. भविष्यात पुढे जाण्यासाठी भूतकाळातल्या काही कटू आठवणी विसरणं आवश्यक आहे.
LUCKY SIGN - A fictitious story
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
काही अनपेक्षित गोष्टी घडतील. आश्चर्य वाटेल पण काळाबरोबर चालत राहा. नकळत का होईना जोडीदाराशी वाद झाला असेल तर त्याच्याशी संवाद साधून वाद मिटवा. मुलं नेहमीपेक्षा अधिक हट्टीपणा करत असल्याचं जाणवेल.
LUCKY SIGN - A banyan tree
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. त्यामुळे आर्थिक लाभ आणि मनःशांती मिळेल. कायदेशीर वाद सुरू असल्यास एखाद्या किरकोळ बदलामुळे अनुकूल निकाल लागू शकेल. आजचा दिवस मन सैरभैर राहील. कमी वेळेत जास्त कामं करण्याची कसरत करावी लागेल.
LUCKY SIGN - A paper bag
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुमच्या मनाचं ऐकणं लाभदायी ठरेल. अलीकडे तुमचा स्वभाव रागीट झाला आहे, ही मोठी समस्या आहे. त्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीचा तुम्हाला दरारा वाटेल. लवकरच एखादा प्रवास घडेल.
LUCKY SIGN - A black crystal
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
आधीच्या योजनेत थोडा बदल करा. एखादी व्यक्ती अनेकांकडे तुमच्या कामाची शिफारस करू शकते. आर्थिक लाभ होईल. काही दिवसांपासून तुमच्या मनात घोळत असलेल्या भावना व्यक्त करणं योग्य ठरेल. गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा.
LUCKY SIGN - Mints
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
घरी असताना कामाच्या ठिकाणी येणारा ताण दूर ठेवा. काही घरगुती समस्या आज डोकं वर काढतील. तुम्ही दिलेला शब्द पाळण्यास तुम्हाला उशीर होऊ शकतो. कोणाचा तरी तोटा आज तुम्हाला फायदा करून देऊ शकतो.
LUCKY SIGN - A sparrow
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
काही तरी गमावण्याची भीती आता दूर ठेवली पाहिजे. गरज असलेल्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही पोहोचू शकत नाही, हे लक्षात घ्यावं लागेल. त्यानुसार तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर नात्यात असाल तर ती व्यक्ती काही गोष्टींवर चर्चा करू इच्छित असेल, त्याचा तुमच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - A golfcart
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
विनाकारणच रागावणं केव्हाही घातकच असतं. दिवसाच्या सुरुवातीला तर अशी चिडचिड त्रासदायकच ठरते. उगाचच राईचा पर्वत करणं टाळा. विश्वासार्हतेबाबतच्या काही प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं. घरात एखादी आनंदाची घटना घडेल. चांगली बातमी मिळेल. त्यामुळे तुमचा उत्साह, आनंद वाढेल.
LUCKY SIGN - A silicon bowl
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
तुम्ही सांगायला इच्छुक नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुमचे जवळचे मित्र प्रयत्न करतील; मात्र याबाबत चर्चा करायला हरकत नाही. कुटुंबातल्या तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्याबाबत अविश्वास वाटू शकतो. शक्य असल्यास सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं टाळा. तुम्ही काही वेळ स्वत:ला देण्याची गरज आहे.
LUCKY SIGN - A glazed glass window
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमचं रुटीन सांभाळणं शक्य होत नसेल तर त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे. तुमची एखादी प्रिय वस्तू हरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या मौल्यवान गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. एखादा छानसा सुसंवाद तुमचा मूड चांगला करील.
LUCKY SIGN - A flower laden tree
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
सभ्यतेनं, नम्रतेनं वागण्याच्या तुमच्या गुणाची प्रशंसा होईल. तुम्ही करत असलेल्या कामावर तुमचा ठसा उमटेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. एखादी लंच पार्टी उत्साह वाढवेल.
LUCKY SIGN - A silver spoon
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs