सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 16 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं लांबणीवर टाकत असाल तर आज त्यासाठी वेळ नक्की काढण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणी उगाचच जज करत असेल, तर तिकडे दुर्लक्ष करा. तुमचं ऑफिसचं काम चोख करा. कारण अचानक तपासणी होऊ शकते.
LUCKY SIGN – A boat symbol
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
बाहेर जाण्याचं नियोजन असल्यास ते आठवड्याअखेरसाठी ठेवा. आजचा दिवस समस्या निवारण करण्याचा आहे. आर्थिक प्रगतीची चिन्हं आहेत. अडकलेला Cash Flow सुधारेल.
LUCKY SIGN – A bus stand
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
आजच्या दिवसाचा जास्तीत फायदा करून घ्या. कारण आजची ऊर्जा तुम्ही जे कराल त्याला बळ देणारी आहे. तुमचा बॉस आज तुमची मोठ्या संधीसाठी शिफारस करू शकतो. संध्याकाळी एखाद्या स्पेशल व्यक्तीकडून तुम्हाला ट्रीट मिळू शकते.
LUCKY SIGN – A bright lounger
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
आज तुम्ही स्वतःसाठी शॉपिंग करायचं ठरवलं असेल तर त्यात तुम्ही पुरेपूर गुंतू शकता. कामाच्या ठिकाणी ठरावीक डेडलाइन्स आहेत. घरकामातला मदतनीस कामात अडथळा आणू शकतो.
LUCKY SIGN – Silverware
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
आज तुमच्यासाठी टीमवर्क उपयोगी पडेल. आज तुम्हाला सहयोगाची संधी असल्यास ती घेतलीच पाहिजे. घरी झालेल्या भांडणाचा परिणाम तुमच्या दिवसावर होऊ शकतो. जे घडलं ते सोडून द्या.
LUCKY SIGN – Steel cutlery
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
जर तुमचं काम अडकलं असेल आणि त्यासाठी एखाद्याचा इगो कुरवाळावा लागणार असल्यास ते आत्ताच करा. लांब पल्ल्याचं नियोजन फायदेशीर ठरेल. आज रात्री घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तयार राहा आणि सर्व गोष्टी आणून ठेवा.
LUCKY SIGN – A red dot
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
आजचा दिवस भावंडांसोबत घरी किंवा virtually काही वेळ घालवण्यासाठी चांगला आहे. कामाच्या ठिकाणी काम वाढू शकतं आणि तुमच्या योगदानाचे पुनरावलोकन केलं जाऊ शकतं. अति तणावामुळे तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकतं.
LUCKY SIGN – A Peacock
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
शपथ घ्या, की तुमचा जुना छंद किंवा आवड नेहमी जोपासाल. सध्या पुन्हा ते आठवण्याची वेळ आहे. आजचा दिवस प्रगतिशील ऊर्जेचा असून तुम्ही जे काही करायला सुरू कराल ते पूर्ण करू शकाल.
LUCKY SIGN – Wood panels
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
दूरवरून किंवा परदेशातून आलेल्या कॉलमुळे तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला खास असल्यासारखं वाटेल. एखादी शॉर्ट ट्रिप तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. तुमच्या सध्याच्या नात्यांसंदर्भात काही प्रश्नांवर तत्काळ उत्तरांची गरज असू शकते. स्पर्धेवर बारकाईने नजर ठेवा.
LUCKY SIGN – A resin block
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
आजचा दिवस नव्याने रूटीन सुरू करण्यासाठी चांगला आहे. एखादं पुस्तक किंवा लेख यामुळे प्रेरणा मिळेल. तुम्हाला हरवल्यासारखी वाटलेली एखादी गोष्ट आज तुम्हाला मिळू शकते. तुमच्या गरजांना प्राधान्य द्या.
LUCKY SIGN – A sparrow
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुम्हाला जे करायचे आहे त्यातली प्रगती हळू असल्याची चिन्हं दिसू शकतात. तुमच्या मनाला फॉलो करा आणि नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस संमिश्र असला तरी स्थिर असेल.
LUCKY SIGN – Flower laden tree
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
एका चांगल्या सूचनेमुळे तुमचा बराच मौल्यवान वेळ वाचेल. आता तुम्हाला कॉन्फिडंट वाटेल आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला निर्णय आता घ्याल. कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य द्याल. स्वतःला अॅक्सेसिबल केल्याने काम होईल.
LUCKY SIGN from above – A silk scarf
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.