मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Daily horoscope : वृषभ राशीच्या व्यक्तींनी राग आवरा नाहीतर...

Daily horoscope : वृषभ राशीच्या व्यक्तींनी राग आवरा नाहीतर...

Daily Horoscope 18 February 2022 : तुमची जन्मतारीख ठरवते तुमची सूर्यरास. या राशीनुसार तुमचं आजचं भविष्य (Rashibhavishya).

Daily Horoscope 18 February 2022 : तुमची जन्मतारीख ठरवते तुमची सूर्यरास. या राशीनुसार तुमचं आजचं भविष्य (Rashibhavishya).

Daily Horoscope 18 February 2022 : तुमची जन्मतारीख ठरवते तुमची सूर्यरास. या राशीनुसार तुमचं आजचं भविष्य (Rashibhavishya).

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    दिवसाची सुरुवात घाई-गडबडीची, धावपळीची असू शकते, परंतु नंतर कामाला चांगला वेग येईल. हातात असलेल्या कामावर अधिक लक्ष द्या. घरगुती आघाडीवरही काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

    LUCKY SIGN - पांढरा फळा (A whiteboard)

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण करून स्वत:लाच आश्चर्यचकित कराल. काही कारणांमुळे इतरांशी वाद होतील, त्यामुळे कामावरील लक्ष विचलित होऊ शकतं. रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

    LUCKY SIGN - दोन कबुतरं (Two pigeons)

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    वेळेचं भान ठेवणं उपयुक्त ठरेल. त्यामुळे अनेक कामं वेळेत पूर्ण होतील आणि त्यासाठीची डेडलाईन पाळू शकाल. एखादी नाकारलेली संधी उपयुक्त होती असं वाटू शकेल.

    LUCKY SIGN - तुमचं आवडतं गाणं (Your favorite song)

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    सर्व लक्ष कामावर केंद्रित केल्याचा फायदा होईल. काही सहकारी तुमच्या कामात अडथळे आणण्याची शक्यता आहे. पूर्वी नियोजित केलेली एखादी लहानशी सहल आता पूर्ण करता येईल.

    LUCKY SIGN - दिवा (A lamp)

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    दिवसाची सुरुवात नेहमीपेक्षा अधिक सकारात्मक होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या मनातील योजना मांडण्यासाठी चांगला दिवस आहे. त्यातील प्रत्येक बाबीवर तपशीलवार चर्चा होईल याची काळजी घ्या. एखादा मुद्दाही मागे ठेवू नका.

    LUCKY SIGN – माईलस्टोन साईन (A milestone sign)

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    एखाद्या गोष्टीत पुढचं पाऊल टाकायचं असेल तर तुमची अंतःप्रेरणा, मनाचा आवाज मार्गदर्शक ठरेल. एखाद्या चर्चेत तज्ज्ञ म्हणून सहभागी झाला असाल तर तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. तुमचा एखादा क्लायंट तुमच्यावर मित्राप्रमाणे विश्वास ठेवू लागेल.

    LUCKY SIGN – डिजिटल साईन (A digital sign)

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    गैरसमज दूर होतील. दिवसभर कामाचा व्याप अधिक असेल. अचानक उद्भवलेल्या प्रासंगिक समस्यांमुळे सुट्टी कमी करावी लागू शकते. संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.

    LUCKY SIGN - लेड बोर्ड (A led board)

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतो. एखाद्या कामाची पूर्वतयारी करणं किती आवश्यक असतं याची जाणीव होईल. अनावश्यक धोका पत्करू नका. तब्येतीकडे लक्ष द्या.

    LUCKY SIGN – पावसाचा शिडकावा (A rain shower)

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    नेहमीपेक्षा अधिक घडामोडींचा दिवस असेल. रिअल इस्टेटसंबधित कामांसाठी कोणालातरी तुमची मदत लागू शकते. एखादं काम दीर्घकाळ सुरू असेल, तर त्याबाबत वेगळा दृष्टिकोन अंगीकारल्यास उपयोगी ठरू शकेल. लांबवर वॉकला गेल्यास शांतपणे विचार करता येईल, मन शांत, प्रसन्न होईल.

    LUCKY SIGN – सरळ रेषा (A straight line)

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    लांब राहत असलेल्या मित्राच्या संपर्कात राहणं लाभदायी ठरेल. आजच्या दिवसात काम आणि मौजमजा दोन्हीचा आनंद घेता येईल. मौल्यवान गोष्टींची काळजी घ्या. पोटाचा त्रास होऊ शकतो.

    LUCKY SIGN – मेणबत्तीचं स्टँड (A candle stand)

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    एखादी व्यावहारिक दृष्टीकोन असलेली चांगली व्यक्ती तुम्हाला भेटेल. घर आणि ऑफिस या दोन्ही आघाड्यांवर व्यवस्थित वेळ देऊ शकाल. दोन्हीकडे चांगलं संतुलन साधण्यात यश मिळेल. थकव्याचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. ध्यानधारणा करण्यावर भर द्या.

    LUCKY SIGN – सिलिकॉनचा साचा (A silicon mould)

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    अचानक एखादं किचकट काम समोर येईल. तुमच्याविषयी काहीजण गैरसमज पसरवत असल्याचं लक्षात येईल, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य ठरेल. ताणतणाव जाणवत असेल तर घरातील मंडळी मदतीला धावून येतील. दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे,त्याकडे लक्ष द्या.

    LUCKY SIGN - लाकडाचा बॉक्स (a wooden box)

    First published:
    top videos

      Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs