Home /News /astrology /

Daily Horoscope 18 जानेवारी 2022 : 'वृश्चिक' रुटीनमधून ब्रेक घ्या, 'मीन' दिवसाची सुरुवात प्रसन्न

Daily Horoscope 18 जानेवारी 2022 : 'वृश्चिक' रुटीनमधून ब्रेक घ्या, 'मीन' दिवसाची सुरुवात प्रसन्न

आज दिनांक 18 जानेवारी 2022. वार मंगळवार. जन्मतारखेनुसार ठरणाऱ्या सूर्यराशीप्रमाणे तुमचं भविष्य काय.. वाचा..

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पिक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य (Daily Horoscope for 18 January 2022 ) सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दिवसाची सुरुवात नेहमीपेक्षा लवकर आणि काही अनपेक्षित अडचणींनी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी थोडं आरामदायी वाटेल. एक नवीन आणि वेगळा दृष्टिकोन प्रेरणादायी ठरेल. LUCKY SIGN - (A lilac artwork) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) गंभीर चर्चेमुळे काही गोष्टींना उशीर होऊ शकतो. तुमच्या बोलण्याने अधिक गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. एखादा महत्त्वाचा धागा, आधार तुमचं काम सोपं करू शकेल. LUCKY SIGN - लाकडी बॉक्स (a wooden box) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) कामकाजात स्थिरता येईल. नवीन कल्पनांवर आता विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्याला डेट करत असाल, तर तुमचा पार्टनर तुमच्या काही गोष्टींना विरोध करू शकतो. एखाद्या गोष्टीवर तुमचं एकमत होणार नाही. LUCKY SIGN - mirrorwork कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) घरच्या कामात अधिक अडकल्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकेल; मात्र एखाद्या पदार्थावर चर्चा करणं, खाण्याच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यानं थोडी मजा वाटेल. पुस्तकं वाचणं, टीव्ही पाहणं, सोशल मीडियावर आवडता कंटेंट पाहणं तुमचा मूड सुधारण्यास मदत करेल. त्यामुळं आज आवर्जून याची मजा घ्या. LUCKY SIGN - पोपट (a parrot) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमच्यावरचा ताण वाढण्याची शक्यता आहे, मात्र एखादी चांगली बातमी ताण थोडासा हलका करण्याचं काम करेल. जवळच्या मित्राशी बोलण्यानं ताण कमी होईल. LUCKY SIGN - जुनी डायरी (an old diary) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) आजच्या दिवसात तुमच्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. अचानक काही समस्या उद्भवू शकतात. तुम्ही ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. LUCKY SIGN - An indoor game तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) स्वतःच्या काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी, विशेषत: ऑफिसमधलं काम असो किंवा घर आवरणं, यासाठी आजचा दिवस चांगला आहे. या कामात तुम्हाला काही तरी महत्त्वाचं सापडण्याची शक्यता आहे. पोटाच्या आरोग्याची काळजी घ्या. LUCKY SIGN - काचेची बाटली (A glass bottle) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) नेहमीच्या रुटीनमधून थोडा ब्रेक घेण्याचा विचार करा. तुम्ही जिथे आहात तिथेच तुमची गरज असते. दूरवरून कोणी तरी तुम्हाला भेटायला येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - स्टेशनरी बॉक्स (A stationery box) धनु (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) हरवलेली एखादी गोष्ट सापडण्याची दाट शक्यता आहे. जवळपासच्या छोट्या ट्रिपची योजना आखत असाल, तर ती प्रत्यक्षात येऊ शकते. तुम्हाला खेळ आवडतात याची जाणीव होईल. LUCKY SIGN - सायकल बेल (a cycle bell) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) योग्य दिशेने केलेले थोडेसे प्रयत्नदेखील यश देतील. निर्णय घेण्यासाठी आपल्या आंतरिक संकेतांचे/अंतरात्म्याच्या आवाजाचं ऐका. काही वेळ अस्वस्थता जाणवली तरी आजचा दिवस अधिक चांगला आहे, याची खात्री बाळगा. LUCKY SIGN - new cutlery कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) नवीन कपड्यांचं आकर्षण तुम्हाला शॉपिंग करायला उद्युक्त करेल. आज तुम्ही तुमची सगळी दिवसभरातली काम छान पार पाडाल. काही रखडलेले प्रश्नही तात्पुरत्या उपायाने सुटू शकतील. LUCKY SIGN - छत्री (an umbrella) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्या अपेक्षेपेक्षा अगदी वेगळं असे सहकाऱ्यांचं वर्तन आश्चर्यचकीत करेल. निसर्गाच्या सान्निध्यात असाल तर दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न असेल. मुलांवर लक्ष ठेवा. LUCKY SIGN - hanging planters
Published by:News18 Web Desk
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या