Home /News /astrology /

Daily Horoscope 15 January 22: तूळ राशीला प्रेमात मिळेल यश; वृषभ व्यक्तींनी कुणावर चटकन विश्वास ठेवू नका

Daily Horoscope 15 January 22: तूळ राशीला प्रेमात मिळेल यश; वृषभ व्यक्तींनी कुणावर चटकन विश्वास ठेवू नका

दैनंदिन राशीभविष्य: 15 January 2022 चा हा शनिवार तुमच्यासाठी कसा असेल? काय सांगते तुमची सूर्यरास?

दैनंदिन राशीभविष्य: चांद्रराशी आपल्या जन्मपत्रिकेवरून काढतात, तरी सूर्यराशी ठरते आपल्या जन्मतारखेनुसार. (Zodiac sign Sun sign) सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक सूर्यराशीचं 15 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आज जागरूकतेनं काम करणं महत्त्वाचं आहे. कायदेशीर बाबी लवकरच मार्गी लागतील. आज तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त उत्साही वाटेल. नेहमीपेक्षा अधिक नीटनेटकं नियोजन करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. गुंतवणूक करताना सावधगिरीने करा. LUCKY SIGN - बांबूचं रोप (A bamboo plant) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही जो काही पसारा मांडला आहे, तो कमी करण्याची वेळ आली आहे. नुकत्याच भेटलेल्या कोणावरही विश्वास ठेवू नका. विशेषत: कोणत्याही भागीदारीसाठी. लवकरच एखादी नवीन भूमिका पार पाडण्याची वेळ येऊ शकते. LUCKY SIGN - चहाची किटली/भांडं (A teapot) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्हाला जे क्रिस्टल्स आवडतात ते फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करू शकत नाही. धडा घ्या आणि पुढे जा. मातृपक्षाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - चांदीचे दागिने (silver jewelry) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) अचानक घडलेल्या अनपेक्षित आणि सकारात्मक गोष्टींमुळे आश्चर्याचा धक्का बसेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. ज्यांना बाहेर फिरायला आवडतं ते लवकरच काही तरी योजना आखण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - जुना दिवा (an old lamp) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आधी आव्हानात्मक वाटणाऱ्या कामावर नवीन उपाययोजना मिळू शकतात. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. किरकोळ डोकेदुखी किंवा वेदना दिवसभर त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळं दिवसभर अस्वस्थता वाटू शकते. LUCKY SIGN - a solar panel कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) आज हातात असलेली तुमची अनेक कामं पूर्ण होतील. त्यामुळं तुम्हाला खूप नशीबवान असल्याचं वाटेल; मात्र तुमचे हुकमाचे सर्व एक्के एकाचवेळी वापरू नका. लवकरच कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग आहे. LUCKY SIGN - जुनं मासिक (An old magazine) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) प्रेमाशी संबधित असलेले प्रश्न सुटतील. गृहिणींसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची सर्जनशीलता प्रभावीपणे पुढे येईल. स्वत:ला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN - (A prominent billboard) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या भावना दडपून टाकू नका. जिच्याशी तुम्ही तुमच्या मनातील भावना शेअर करू शकता अशी एखादी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. वेळेचं योग्य नियोजन नसल्यानं किंवा निश्चित दैनंदिन वेळापत्रक नसल्यानं दिवसभर खूप धावपळ करावी लागू शकते. वरिष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. LUCKY SIGN - बॅडमिंटन कोर्ट (a badminton court) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) बरेच दिवस रखडलेली कामं निवांतपणे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. साधा आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. मित्रपरिवार काहीतरी मस्त बेत आखत असेल तर आज तुम्हाला ते कळू शकतं. LUCKY SIGN - पीस (a feather) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) नवीन गोष्टींशी जुळवून घेणं आव्हानात्मक असलं तरी तुम्ही ते नक्की करू शकता. याबाबत कुटुंबातला नवीन सदस्य तुमच्याकडे अपेक्षेनं पाहत असेल. गेट टुगेदर्स होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - प्रभावी रंगाचा पोशाख (A bright outfit) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) दररोज एक ठराविक रुटीन पाळण्याचे चांगले परिणाम दिसू लागल्यानं तुम्हाला समाधान लाभेल. जुन्या मित्राशी संपर्क साधण्याचा पुन्हा प्रयत्न करा. करिअरमध्ये थोडं शैथिल्य आल्यासारखं वाटेल. निरीक्षण करत राहा. LUCKY SIGN - a flickering light मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) नवीन काम, प्रोजेक्ट हाती घेतला असेल आणि अडथळे येत असतील तर तो लगेच सोडून देऊ नका. काही वेळा परिणाम दिसायला वेळ लागतो. कुटुंबाला थोडा वेळ द्या. तुम्ही पूर्वी कोणाला मदत केली असेल तर ती व्यक्ती कदाचित तुम्हाला त्याची परतफेड करण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - स्वच्छ आकाश (a clear sky) Keywords : प्राची
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या