Home /News /astrology /

राशीभविष्य : 5 राशींसाठी आजचा दिवस आहे उत्तम! 'कन्या' रागावर ताबा असू द्या

राशीभविष्य : 5 राशींसाठी आजचा दिवस आहे उत्तम! 'कन्या' रागावर ताबा असू द्या

चंद्र राशीफलानुसार आजची तिथी पौंष चतुर्दशी. चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल.

मुंबई,  16 जानेवारी - आज दिनांक  16 जानेवारी 2022 रविवार,  तिथी पौष चतुर्दशी. चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. पाहू या आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवसभर चंद्र  मिथुन राशीत भ्रमण करेल. बहीण-भावांचा संपर्क होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील. गुरूकृपा राहील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. दिवस अनुकूल आहे. वृषभ कुठूनतरी अचानक मिळणारा पैसा आनंदीत करेल. तुम्ही आज कुटुंबाला वेळ द्या. फार दगदग टाळा. संतती चिंता वाटेल. गुरूची कृपा  राहील. दिवस उत्तम. मिथुन आज राशीत असलेल्या चंद्र आणि सप्तम असलेल्या शुक्राचे शुभ पडसाद उमटतील. कठोर बोलणे टाळा. घरात वाद नको. दिवस शांततेत  पार पडेल. कर्क संध्याकाळपर्यंत जरा धीर धरा. फारसे धाडस नको. प्रवास टाळा. व्यय स्थानातील चंद्र आर्थिक घडी मोडेल. शांततेत दिवस  घालवणे योग्य  ठरेल. सिंह दिवस उत्तम असून, आर्थिक चिंता  नको. फक्त उधळपट्टी टाळा. घरात कोणाशी वाद करू नका . शत्रू टिकणार नाही. वाहन सांभाळून  चालवा. प्रवास योग येतील. दिवस चांगला. कन्या आज आराम करा.  मानसिक थकवा दूर होईल. अतिविचार करू नका. संतती चिंता तुम्हाला सतत असते. रागावर ताबा असू द्या. दिवस चांगला. तूळ भाग्यकारक दिवस . चतुर्थ स्थानात असलेले  ग्रह  शारीरिक कष्ट देतात, तिकडे सतत लक्ष असू द्या. बाकी आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस चांगला. वृश्चिक अष्टमात असलेला चंद्र आणि धनस्थानात असलेला शुक्र मंगळ सतत काही तरी काम मागे लागेल. प्रकृती जपा. अतिदगदग टाळा. दिवस  फारसा अनुकूल नाही. धनू आज दोघांनी जोडीनं  बाहेर जाण्याचा दिवस आहे. मौजमजा करा. शुक्र अनेक लाभ मिळवून देईल. ऑफिसमध्ये  जास्तीचे काम पडेल. दिवस  शुभ आहे. मकर प्रकृतीच्या तक्रारी वाढतील. मानसिक ताण, आर्थिक जबाबदारी, खर्च येईल. जोडीदाराची काळजी घ्या.  वाद टाळा.  दिवस फारसा अनुकूल नाही. कुंभ पंचमात दिवसभर चंद्रभ्रमण  आहे. मुलांसाठी त्यांच्या गरजेचे सामान खरेदी करावे लागेल.  त्यांच्यावर खर्च होईल. शत्रूवर विजय मिळेल. दिवस उत्तम. मीन आज गृहसौख्य भरपूर  मिळेल. पण जास्तीचे काम ही करावे लागेल. कार्य ठरेल. दिवस उत्तम असून, आनंदात घालवा. गुरू जप करत असावा.
Published by:News18 Web Desk
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या