Home /News /astrology /

Daily Horoscope : रविवार उत्साहात जाईल की, काही वाईट घडण्याचे संकेत? वाचा राशीभविष्य!

Daily Horoscope : रविवार उत्साहात जाईल की, काही वाईट घडण्याचे संकेत? वाचा राशीभविष्य!

सूर्य राशीनुसार जाणून घ्या आजचं भविष्य...

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 8 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) काही महिन्यांपूर्वी तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागतील. शेजारी तुमच्याबद्दल चुकीचं मत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही शांत रहा आणि वाद घालू नका. एक विचारपूर्वक दिलेलं गिफ्ट तुम्हाला आवडेल. दातदुखी होऊ शकते काळजी घ्या. LUCKY SIGN - A paper boat वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) ऑफिसमध्ये सुरू असलेल्या अनेक गोष्टींबद्दल कदाचित तुम्हाला चांगला सल्ला मिळेल. तुमच्या टीममधील सहकारी संवेदनशील आणि गरजेनुसार लवचिकता दाखवणारे आहेत त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. नात्यांत शिथिलता जाणवेल. परदेशी जायच्या तयारीत असाल तर बुकिंग लगेच करा. LUCKY SIGN - A sparrow मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) गेल्यावर्षी तुम्ही पाहिलेलं स्वप्न आता आकार घ्यायला लागेल. तुम्हाला विश्वासार्ह सहकारी मिळतील. शंकांमुळे मनस्वास्थ बिघडेल. कुटुंबियांसोबत धार्मिक यात्रा कराल. काही घटना व्हायला उशीर झाल्याने नाराज झाला असाल पण आता सगळं सुरळीत होईल. एखादी प्रोजेक्ट आयडिया तुम्हाला आवडेल. LUCKY SIGN - A building कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही आधी ज्या उत्साहाने काम करत होतात त्याच उत्साहाने काम करा. मनाची शक्ती उपयोगी पडेल. काही दुर्दैवी घटना घडल्या असतील तरीही त्यांचे वाईट परिणाम होणार नाहीत. सगळ्यांकडून मदत घेत रहा. तुमचे पालक लवकरच तुम्हाला सरप्राईज देतील. बाहेर फिरून आल्याने मन आनंदी होईल. LUCKY SIGN - A sunrise सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) प्रत्यक्ष काम किंवा गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी त्याची योजना तयार करून त्याला सुरूवात करा चांगले रिटर्न्स मिळण्यासाठी तुम्हाला कामात आणि गुंतवणुकीत सातत्य दाखवावं लागेल. तुम्ही आधी सोबत काम केलेल्या व्यक्ती तुमच्याकडून सल्ला मागतील. ग्रहस्थितीनुसार अनेक स्रोतांतून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कुणीतरी तुमच्या म्हणण्याला विरोध करेल. घरात शांतता राहील. जर वाद असतील तर ते तुम्ही सोडवाल. धीर धरणं गरजेचं आहे. LUCKY SIGN - Blue ray कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) अधिक प्रॅक्टिकल ज्ञान आणि क्रियाशील नियोजन उपयोगी ठरेल. तुम्ही काही नवं करायचं ठरवलं असेल तर त्यासंबंधी वस्तूंचा किंवा संधींचा शोध ता सुरू करायला हवा. एखाद्या जुन्या सहकाऱ्याची मदत होईल. कुटुंबीयांचा पाठिंबा राहील. तुमचं स्वप्न साकार करायचं असेल तर घराबाहेरच्यांना काही सांगू नका. LUCKY SIGN - A brass article तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) सध्या सर्व उर्जा तुमच्या सुरू असलेल्या कामांना पूरक आहेत त्यामुळे वेळ न घालवता त्यांचा फायदा घ्या. इतर दिवसांप्रमाणे हा दिवसही उत्तम आहे. खरेदी किंवा एखादा पेपर सबमिट करणं कुठलंही काम तुम्ही पूर्णत्वास न्याल. आवडीचा खेळ खेळाल. मित्रासोबत गप्पा झाल्याने दिवस मस्त जाईल. तुम्ही ज्याची वाट पाहताय ते मिळायला अजून थोडा वेळ आहे. LUCKY SIGN - A tie वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखाद्या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा तुम्ही विचार करत असाल, पण सध्याची परिस्थिती उपयुक्त नाही. तुम्हाला जे सांगायचं आहे ते सध्या सांगू नका. दुसऱ्याच्या विषयात नाक खुपसू नका. तुम्ही आता घेतलेल्या कठीण निर्णयांचा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या विषयावर काम करत आहात तो आता आकार घ्यायला लागेल. नित्य व्यायामाने तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. LUCKY SIGN - Violet flowers धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) सगळं विस्कटलेलं जुळून येतंय असं वाटावं इतकी चांगली स्थिती आहे. लग्नासाठी स्थळं येतील, नात्यांतील दुरावा कमी होईल. संवादातली महत्त्वाची दरी सांधली जाईल. येत्या काही दिवसांत काही प्रभावी व्यक्तींना भेटाल त्याचा फायदा होईल. तुमचे मुद्दे मांडायला कचरू नका. महत्त्वाच्या गेट-टुगेदरचं आमंत्रण मिळेल. LUCKY SIGN - A Butterfly मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमचा प्रामाणिक हेतू आणि तुमची इच्छा यांनी सगळ्यांना चकित कराल. विनाकारण तुम्हाला कुणीतरी घरी बोलवलं तरीही ते चांगलंच आहे. अनेकांना वचन देऊ नका नाहीतर वेळ कमी पडेल आणि कामांना उशीर होईल. घरातील मोठ्या माणसाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय. सक्ती म्हणून स्वयंपाकघरात काम करावं लागेल. LUCKY SIGN - A Candle stand कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला माणसांना भेटायला एक दिवसाआड घराबाहेर पडावंसं वाटत असेल तर त्यावर बंधन आणायला हवं. त्याने तुमच्या कामावर विपरित परिणाम होतोय. तुमची कौशल्य विकसित करून ज्ञान संपादन करण्यासाठी वेळ वापरा. तुमचा सीव्ही अपडेट करा. ज्युनिअरला प्रेरणा द्याल. लेखक असाल तर तुमचं लिखण प्रकाशित करायला चांगला दिवस आहे. सर्जक व्यक्तींना नव्या संधी सापडतील. तब्येतीची काळजी घ्या. LUCKY SIGN - Calming music मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही बरेच कौशल्यवान असाल पण नम्रता अंगी बाणवा. कधीकधी तुम्ही समोरच्याचा अपमर्द करता. तुम्ही आज जे आहात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रचंड कष्ट घेतले आहेत पण त्याची जाणीव ठेवून वागायला हवं. लहानपणापेक्षा अधिक चांगली जीवनशैली आणि संपत्ती कमवल्यामुळे तुम्ही सर्वच मिळवलंय असं समजू नका. सकारात्मक टीकेसाठी तयार रहा. LUCKY SIGN - A a thrilling novel
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या