मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: मेष, वृषभेसाठी उत्तम दिवस; इतर दोन राशींनी थोडं सांभाळा

राशीभविष्य: मेष, वृषभेसाठी उत्तम दिवस; इतर दोन राशींनी थोडं सांभाळा

आज   मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट 2021.तिथी श्रावण कृष्ण नवमी. आज चंद्र  वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात असेल. कुणाला बुध-शुक्र उत्तम फळ देईल? वाचा भविष्य

आज मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट 2021.तिथी श्रावण कृष्ण नवमी. आज चंद्र वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात असेल. कुणाला बुध-शुक्र उत्तम फळ देईल? वाचा भविष्य

आज मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट 2021.तिथी श्रावण कृष्ण नवमी. आज चंद्र वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात असेल. कुणाला बुध-शुक्र उत्तम फळ देईल? वाचा भविष्य

आज   मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट 2021.तिथी श्रावण कृष्ण नवमी. आज चंद्र  वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज  दिवस फार चांगला आर्थिक लाभ झाल्यामुळे  प्रसन्न असेल. कुटुंबाला महत्त्व द्या. त्यांच्या मागण्या पूर्ण करा. संतती संबंधी काही घटना घडतील. घरत शुभकार्य होईल. दिवस शुभ आहे.

वृषभ

आरोग्य ठीक राहील. चंद्र राहू एकत्र असल्याने मन जरी अस्वस्थ असले तरी  काळजी नको. हळुहळु सगळे ठीक होईल. तुमच्या चिकाटी, परिश्रम, अणि जिद्दीचे फळ मिळणार. खरेदी चा मूड होईल.दिवस चांगला आहे.

मिथुन

व्यय स्थानात चंद्रराहू, त्रासदायक  दिवस. . आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. .  तृतीय सूर्य  मदत करेल. पण एकूण दिवस फारशी उलाढाल ना करता घालवावा. मन व्यग्र राहील. मध्यम दिवस.

कर्क

धनस्थानातील रवि अधिकारी व्यक्तीशी ओळख करून देईल. नवीन परिचय होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्य ठीक राहील. आज आपण काही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. दिवस चांगला.

सिंह

फोन, भेटी गाठी, महत्त्वाचा निर्णय  असा हा दिवस आहे. खर्च जरा जपून करा. धनस्थानातील शुक्र अचानक लाभ देईल.  कुटुंबाला वेळ द्यावा लागेल.पण रागावर नियंत्रण ठेवा. दिवस शुभ आहे.

कन्या

भाग्यातील चंद्र राहू आज  संभ्रमात ठेवतील. दिवस काही विशेष काम उरकून टाकण्याचा आहे. , चिकित्सा  करू नका.  त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. फार दगदग करू नका. दिवस बरा आहे.

तुला

अष्टमात असलेले चंद्र राहू आजही मानसिक ताण,शरीर कष्ट दर्शवतात. कार्य क्षेत्रात काही नवीन संधी मिळतील. सिंह राशीतील सूर्य,मंगळ लाभ देतील. कार्यक्षेत्रातील बदल उत्तम राहतील. सर्दी पडसे अंग दुखी होऊ शकते. दिवस मध्यम  आहे.

वृश्चिक

राशीत केतू,व सप्तमात चंद्र राहू योगाने थोडा कठीण दिवस आहे. सामाजिक जबाबदाऱ्या घेणे तुम्हाला आवडते. पण त्यापासून मनस्ताप होऊ शकतो. कोणाशी शाब्दिक बोलाचाली झाली तरी धैर्याने काम पुर्ण करा. दिवस मध्यम.

धनु

आर्थिक नुकसान, वाहनांसाठी खर्च, किंवा एखाद्या मोठ्या खर्चाची तजवीज करण्यासाठी कर्ज  असा हा दिवस फारसा अनुकूल नाही. दुखापत   होण्यापासून जपा. शत्रू वर मात करू शकाल. दिवस मध्यम आहे.

मकर

तुम्ही सर्व कामे विचारपूर्वक करता. आज मन थोडे  द्विधा होणार आहे. विवेक  बुद्धी  जे सांगेल  तोच निर्णय घ्या. मुलांची चिंता असेल तर त्याचे निरसन करून घ्या. अष्टमात मंगळ त्रासदायक. भाग्यात बुध शुक्र उत्तम फळ देतील.

कुंभ

चतुर्थ स्थानात भ्रमण करणारा चंद्र मानसिक दृष्ट्या चांगला आहे. पण राहू चिंता वाढवेल.

आर्थिक स्थिती ठीक राहील. नोकरीत लाभ . शत्रू तुमच्या पुढे टिकणार नाहीत. प्रभावशाली दिवस.

मीन

आज  मंगळ सूर्य आरोग्याचा तक्रारी, प्रवासात त्रास  असे फळ देतील पण काळजी नको . चंद्र राहू योगाने थोडा मानसिक ताण जाणवत असेल तर. गुरु उपासना करावी. दिवस मध्यम आहे.

शुभम भवतु!!

First published: