Home /News /astrology /

Daily Horoscope : कामाच्या ठिकाणी नवा बदल तुमच्या फायद्याचा ठरणार; मोकळा होणार प्रगतीचा मार्ग

Daily Horoscope : कामाच्या ठिकाणी नवा बदल तुमच्या फायद्याचा ठरणार; मोकळा होणार प्रगतीचा मार्ग

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

Horoscope 29 April 2022 : जन्मतारखेनुसार ठरते ती सूर्यरास आणि तुमच्या या राशीनुसार तुमचा 29 एप्रिल 2022 चा दिवस कसा जाणार पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 29 एप्रिल 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) उत्पन्नाचा अतिरिक्त किंवा नवा स्रोत आकार घ्यायला सुरुवात करील. खासकरून कामाच्या ठिकाणी नवे पॅटर्न्स तयार होऊ लागतील आणि ते तुमच्या प्रगतीसाठी असतील. कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबा राहील. LUCKY SIGN - A selenite वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) चालढकल करण्याचा कोणताही विचार मनात असेल, तर तो पुढे ढकलला पाहिजे. बाहेरच्या एखाद्या सोर्सकडून मिळालेल्या उपयुक्त माहितीमुळे तुमचा दिवस वाचेल. तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेली एखादी व्यक्ती आता स्वतंत्र होण्याचा विचार करील. LUCKY SIGN - Orchids मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या सिन्सिरिटीची कदाचित सुरुवातीला फारशी दखल घेतली गेलेली नाही; मात्र आता तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच मिळतील. डिपेंडेबल व्हेंचर्समध्ये तुम्हाला यश मिळू शकेल. बाहेरच्यांच्या असलेल्या अटी-शर्ती अपेक्षेपेक्षा जास्त कडक असण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A bookworm कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) छोट्या समस्यांमुळे तुमच्यावर ताण येईल; मात्र एकावेळी एक अशा पद्धतीने त्या हाताळल्यास तुमचं आयुष्य सोपं होईल. तुमचं मूल काही मागण्या करत असेल आणि त्या योग्य नसतील. त्यामुळे त्यांना ते चांगल्या पद्धतीने समजावून देणं गरजेचं आहे. LUCKY SIGN - A crystal सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमचा कदाचित जादू किंवा चमत्कारासारख्या परिस्थितीवर विश्वास नसेल; पण काही वेळा तसं घडतं खरं. आजचा दिवस अगदी सहज-सोपा असेल. पैशांचे विषय मार्गी लागतील. तुम्हाला भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A pyramid कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्हाला तुमचं रोबॉटिक शेड्यूल आवडत नसावं. त्यामुळे तुम्ही अधिक इंटरेस्टिंग कशाच्या तरी शोधात आहात. तुम्हाला शांतपणे बसून आतापर्यंत कधीही केलं नसेल एवढं विश्लेषण करण्याची गरज आहे. तुम्हाला यंदा तुमच्या प्लॅन्सची अंमलबजावणी करायला मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A decorative ribbon तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्या आयुष्यात नव्यानेच आलेल्या एखाद्या व्यक्तीशी कोलॅबोरेशन होण्याची शक्यता आहे. तुमच्या बिझनेस स्किल्सचं कौतुक होईल आणि खासकरून तुमच्या आई-वडिलांकडून. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा रिलेशनशिपमध्ये जाण्यास इच्छुक असाल, तर कमिटमेंट देण्यापूर्वी अन्य पर्यायांची चाचपणी करू शकता. LUCKY SIGN - A neon sign वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या विचारप्रक्रियेत अचानक बदल झाल्यामुळे तुमच्या निर्णयांमध्येही बदल होऊ शकतो. तुम्ही एखाद्या कम्युनिटी प्रोजेक्टवर काम करत असलात, तर त्याची सुरुवात चांगली होईल. ज्या व्यक्ती नव्या गोष्टीसाठी अर्ज करत आहेत, त्यांना एखादी छोटी अडचण येण्याचे संकेत आहेत. LUCKY SIGN - A scheme धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) कार्यक्रम आणखी पुढे ढकलला गेला, तर तुमचे निर्णय चुकू शकतात. लीगल प्रकरणांमध्ये वेळ जाऊ शकतो, उशीर होऊ शकतो. कोलॅबोरेशनसाठी प्रयत्न करत असलेल्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A ruby red stone मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुम्हाला एखादी गोष्ट खरंच हवी आहे; मात्र तुमच्या आई-वडिलांनी त्यासाठी परवानगी दिलेली नाही. तुम्हाला त्याचं कारण कदाचित नंतर कळेल. सध्या तरी त्याची अंमलबजावणी करा. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती कदाचित तुमच्या अपेक्षांनुसार वागणार नाही. LUCKY SIGN - A solitaire कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीबद्दलची तुमची काळजी कदाचित पुरेशी ठरणार नाही. असमाधानी विचार त्रासदायक ठरू शकतात. हे कायम लक्षात ठेवा, की तुम्ही तुमचे तारणहार आहात. LUCKY SIGN - A terrace मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमचे परिपक्व निर्णय कदाचित तशाच पद्धतीने स्वीकारले जाणार नाहीत. तुम्ही काय करत आहात हे एखादी जवळची व्यक्ती पाहत असून, त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्याकडे अधिकाराचं पद असेल, तर तुमच्या सल्लागाराबद्दल पुनर्विचार करा. LUCKY SIGN - A copper jar
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या