Home /News /astrology /

Daily Horoscope : रागामुळे 'या' राशीच्या व्यक्तींना मोजावी लागेल मोठी किंमत; पाहा उद्याचं राशिभविष्य

Daily Horoscope : रागामुळे 'या' राशीच्या व्यक्तींना मोजावी लागेल मोठी किंमत; पाहा उद्याचं राशिभविष्य

Daily Horoscope 28 May 2022 : सूर्यराशीनुसार तुमचं 28 मे 2022 चं राशिभविष्य जाणून घ्या.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 28 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) एखादं काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी तुम्ही संघर्ष करत असल्यास आता तुम्हाला त्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल. तुमच्या मनावर वाढलेल्या ताणाचा त्रास होऊ नये यासाठी अनेक अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये गुंतून राहा. आर्थिक समस्यांमध्ये थोडा दिलासा मिळेल. LUCKY SIGN - A clear quartz crystal वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवता त्या व्यक्तीबद्दलचं सत्य तुम्हाला अचानक कळेल. तुमचा जवळचा मित्र तुमच्यासाठी एखादं सरप्राइज प्लॅन करत असण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी रागाचा उद्रेक झाल्यास त्याचा परिणाम तुम्हाला नंतर भोगावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते टाळा. LUCKY SIGN - A feather मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) सध्या सुरू असलेला आयुष्यातला अस्वस्थतेचा तात्पुरता टप्पा आता संपत आला आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असलात, तर आता तुम्ही झेप घेऊ शकाल. तुमच्या भिंतींना कोणी तरी कान लावून बसलं आहे. म्हणजेच तुमच्या हालचालींवर कोणी तरी बारीक लक्ष ठेवून आहे. LUCKY SIGN - A shining star कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. एखादी त्रयस्थ व्यक्ती तुमच्या कामाचं मूल्यमापन करत असेल आणि त्यांच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडेल. तुमच्याशी जे चांगलं वागले नाहीत त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळेल. LUCKY SIGN - A deep blue sky सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) भूतकाळात घेतलेल्या छोट्या निर्णयांना आता मोठी, चांगली फळं मिळायला सुरुवात होऊ शकेल. तुमचं मन कशात तरी गुंतलं असेल आणि तुम्हाला त्याबद्दल काही तरी इन्स्टिंक्ट वाटत असेल तर तुम्हाला अज्ञात शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल. कुटुंब तुम्हाला तुमच्या निर्णयात साथ देईल. LUCKY SIGN - A new road कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमची भीती दाबणं टाळा. आता भीतीला तोंड देण्याची वेळ आहे. गेल्या वेळी तुम्ही जिथून एखादं काम सोडलं असेल तिथून पुन्हा सुरू करून नव्या टप्प्याचं नियोजन सुरू करा. तुम्ही काही तरी जाणून घेण्यास उत्सुक असलात तर तुम्हाला ती माहिती मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A yellow stone तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्या मनात एखादा न सुटलेला मुद्दा असेल तर आता तो सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा अनावश्यक ताण आणि लक्ष विचलित होणं दूर होईल. तुम्ही एखाद्या व्यक्तीला विसरला असलात, तर ती व्यक्ती तुमच्याशी पुन्हा जोडून घेण्याचा प्रयत्न करील. LUCKY SIGN - A shimmering cloth वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) भूतकाळात केलेल्या एखाद्या गोष्टीचं फळ आता मिळावं अशी तुम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही ते विसरून जाऊन पुढे वाटचाल करावी, अशी शिफारस केली जात आहे. जीवनात एखादं सरप्राइज समोर येण्याची शक्यता आहे. ती तुमच्यासाठी गुड न्यूज असेल. तुम्हाला प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभेल. LUCKY SIGN - A silk pouch धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखादी नवी प्रेरणा तुम्हाला काही तरी Extraordinary काम करण्यासाठी प्रेरणा देईल. तुम्ही अलीकडेच सादर केलेल्या कामाला संमिश्र प्रतिसाद मिळेल. तुम्हाला त्यावर पुन्हा काम करावं लागण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावं लागण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A chimney मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) द्वेष वाटत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणी तरी तुमचं बोलणं गुप्तपणे ऐकत असण्याची शक्यता आहे. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचं नियोजन करत असलात तर ते आणखी काही काळासाठी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. वारसा हक्काचा मुद्दा आता सोडवला जाण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Sea salt कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) साधा-सरळ दृष्टिकोन उत्तम रिझल्ट्स देईल. कोणी तुमच्या कामाविषयी तुमच्या पाठीमागे तक्रार करत असेल तर तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. छोटी चोरी होण्याची शक्यता आहे. तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या आईला भावनिक पाठिंब्याची गरज आहे. LUCKY SIGN - A lampshade मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) सध्या बदलाचा हंगाम आहे. नोकरीत, आवडी-निवडीत किंवा सवयीत बदल होऊ शकतो. जे काही होईल ते चांगल्यासाठी होईल. तुम्हाला स्वयंप्रेरणा मिळेल आणि सातत्य राहील. पैशांचा प्रवाह सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे. LUCKY SIGN - A peacock
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या