Home /News /astrology /

Daily Horoscope : 28 जूनला 'या' राशीच्या घरी येणार पाहुणा; पाहा सविस्तर राशिभविष्य

Daily Horoscope : 28 जूनला 'या' राशीच्या घरी येणार पाहुणा; पाहा सविस्तर राशिभविष्य

Daily Horoscope 28 June 2022 : 28 जून 2022 रोजीचं बाराही राशींचं भविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 28 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमची अर्धवट राहिलेली कामं संपवण्यासाठी आणि जुनी देणी देण्यासाठी दिवस चांगला आहे. सौम्य संसर्ग किंवा किरकोळ दुखापतीची शक्यता आहे. त्यामुळे दक्ष राहावं. वादाच्या प्रसंगात स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. संतुलित अ‍ॅटिट्यूड भविष्यात उपयुक्त ठरू शकतो. LUCKY SIGN - A garden वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) दिवसाची ऊर्जा तुम्हाला अनुकूल असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही कदाचित तुमच्या नव्या कामांची यादी तयार करायला पुढाकार घेऊ शकाल. कोणी तुमच्याकडे कर्जाबद्दल विचारणा केली, तर तुम्ही नम्रपणे नकार देऊ शकता. स्वतःची योग्य ती काळजी घेणारं रूटीन बसवावं. LUCKY SIGN - Two feathers मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्ही आतून कणखर असल्याचं दाखवत असलात, तरी इतरांना कदाचित तुमची अधिक संवेदनशील बाजू अनुभवता येईल. काम करून घेण्यासाठी वाटाघाटीच्या काही क्लृप्त्यांची आवश्यकता भासेल. एखादा सहकारी मदत मागू शकेल आणि त्याला खरंच मदतीची गरज असू शकेल. LUCKY SIGN - Riverside कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) जुन्या ओळखीच्या व्यक्तींशी पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे. घराबाहेरच्या कामांसाठी वातावरण अनुकूल नसण्याची शक्यता आहे. एखाद्या कारणासाठी तुम्ही पाठिंबा देऊ इच्छित असलात, तर आता त्यासाठी योग्य संधी आहे. प्रवास घडण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A handmade paper सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) अचानक, पूर्वकल्पना न देता पाहुणे येण्याची शक्यता आहे. दिवसभर मिठाई खाण्याचा योग आहे. काही प्रलंबित देणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या सपोर्ट स्टाफकडून एखादी तक्रार, समस्या येण्याची शक्यता आहे. ती प्राधान्याने सोडवा. LUCKY SIGN - Pearls कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) कामाच्या ठिकाणचं वातावरण आता अनुकूल असेल आणि त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल. घरी, तसंच ऑफिसमध्येही तुमचं पेपरवर्क शिस्तबद्ध ठेवा. तुमची झोप अपुरी झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री चांगली झोप घेता येईल असं पाहा. LUCKY SIGN - Doorstep तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) भावनिक झाल्यामुळे तुम्ही दुर्बळ होणार नाही. तुमची बलस्थानं पुढे ठेवा. नवी रेसिपी ट्राय करण्यासाठी आणि नवे Ties करण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्या. LUCKY SIGN - A red scraf वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) वाईट स्वप्नं पडणं हा केवळ सुप्त मनात दडलेल्या भीतीचा खेळ असतो. त्यामुळे अशी स्वप्नं पडल्यास ती फार गांभीर्याने घेऊ नका. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्या रूटीनपासून तुमचं लक्ष विचलित करील. जुन्या मित्राला भेटून दिवस स्पेशल बनवा. LUCKY SIGN - A brick wall धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुमचा विरह जाणवतो आहे. तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी आवर्जून वेळ काढा. महिन्याच्या अखेरीला अचानक एखादी ट्रिप होण्याची शक्यता आहे. रूटीन मेडिकल चेकअप उपयुक्त ठरू शकतं. ध्यानधारणा करा. LUCKY SIGN - A neon sign मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) दिवसभर जुन्या आठवणींत रममाण व्हाल. सत्य परिस्थिती जाणून घेणं उपयुक्त ठरेल. तुमची भावंडं तुमच्या ऑथोरिटीचा कुठे तरी उपयोग करू इच्छित असतील. जुन्या दृष्टिकोनाचा समावेश करून नवा प्लॅन तयार करा. LUCKY SIGN - A glass bottle कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमची भीती आता नियंत्रणाखाली आहे. काळ बदलतो आहे. त्यामुळे आता आणखी वाईट स्वप्नं पडणार नाहीत. गेल्या काही महिन्यांत तुम्ही जे काही प्राप्त केलं आहे, त्याबद्दल कृतज्ञतेची भावना तुमच्या मनात दाटून येईल. तुमच्याकडे आणखी एखादी अतिरिक्त जबाबदारी येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A banyan tree मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही तुमच्या कुटुंबाचे भावनिक आधार आहात. त्यामुळे तुमचा अधिक वेळ त्यांना हवा आहे. एखादी नवी पार्टनरशिप होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय व्यावसायिकांचा दिवस बिझी असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामात अडथळे येतील. LUCKY SIGN - Birds together
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या