सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
पैशांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या भोवताली होत असलेल्या गोष्टी पाहून मन भरून येईल. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती कायदेशीर अडचणीत सापडू शकते.
LUCKY SIGN – A Small Planter
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
एखादी नवी व्यक्ती आयुष्यात आल्यामुळे मन विचलित होईल. काही प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, जिचा तुमच्यावर परिणाम होईल. तुम्हाला शक्य होणार नाही अशी गोष्ट करण्याचं वचन देऊ नका.
LUCKY SIGN – A Ruffle
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
एखादं मोठं काम पूर्ण केल्यामुळे थकवा जाणवेल. आयुष्याबाबत काही प्लॅन्स तयार करण्यासाठी तुम्हाला थोडी मोकळीक हवी असेल. एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्यामुळे मदत होईल.
LUCKY SIGN – A Silver String
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
दिवस खरेदीचा आहे. स्वतःच्या आवडीच्या वस्तूंची खरेदी आज कराल. कामाच्या ठिकाणी डेडलाइन चुकणार नाही याची खबरदारी घ्या. घरात एखादी मदत करावी लागल्यामुळे तुमची दैनंदिन कामं रखडू शकतात.
LUCKY SIGN – A Golden Spoon
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
पूर्वी धुडकावून लावलेली एखादी संधी पुन्हा चालून येईल. एखाद्या गोष्टीचा अती विचार केल्यामुळे फायदा होणार नाही. टेक्निकल समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कामाचा बॅकअप ठेवायला विसरू नका.
LUCKY SIGN – A Dimond Ring
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
अडचणींचा काळ आहे, मात्र तुम्हाला लगेच कोणाचा तरी आधार मिळेल. एखादी व्यक्ती भेटल्याचे सकारात्मक परिणाम जाणवतील. आजकाल तुमची कदाचित भरपूर धावपळ होत आहे. त्यामुळे थोडा ब्रेक घेऊन स्वतःला वेळ द्या.
LUCKY SIGN – A Clay Pot
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
एखाद्या गेट टुगेदरला जाण्याची संधी आली तर सोडू नका. मनातल्या कित्येक गोष्टी बोलण्याची संधी मिळेल, हलकं वाटेल. तुमची एखादी प्रशंसक व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेईल. मनात भरपूर गोष्टींचा गुंता झाला असेल, तर थोडं पायी चालून या. मेडिटेशन केल्यास फायदा होईल.
LUCKY SIGN – A Fish net
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
पैसा, पद आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा दिवस आहे. जे काही मिळवण्याचा मनापासून प्रयत्न कराल, ते लवकरच तुमच्या पदरात पडेल. कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीसोबत वाद टाळा.
LUCKY SIGN - Storage
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुम्हाला दिलेलं एखादे काम कदाचित पुढे ढकललं जाऊ शकतं किंवा मग तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी वेळ अपुरा पडेल. दोन्ही गोष्टींसाठी आधीपासून तयारी ठेवणं उत्तम. वडिलांनी सांगितलेलं एखादं काम टाळण्याऐवजी तातडीने पूर्ण करा. मानसिक आणि शारीरिक संतुलन ठेवणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN – A Saltwater lake
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
प्रवास केल्याने मनःशांती मिळेल. या आठवड्यात शाळेतले जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. तुमच्या मनात सध्या बरीच गुंतागुंत आहे, ती सोडवण्याचा प्रयत्न करा. मन एकाग्र करून, ठोस विचार करण्याची गरज आहे.
LUCKY SIGN – A Paper plate
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
एखाद्या नव्या व्यक्तीकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुमची रिलेशनशिप सध्या अजिबात ठीक वाटत नसली, तरी घाबरण्याची गरज नाही. काही दिवसांमध्ये सगळं सुरळीत होईल. एकाचं नुकसान हा दुसऱ्याचा फायदा असतो या उक्तीचा प्रत्यय येईल.
LUCKY SIGN – White Roses
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तब्येतीच्या कारणांमुळे लक्ष विचलित राहील. तुमच्यासोबत काम करणाऱ्या एखाद्या सहकाऱ्याच्या घरी काही अडचणी निर्माण होतील. लवकरच तुमच्या आयुष्यात एखादा नवा अध्याय सुरू होईल.
LUCKY SIGN – A Yellow cloth
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.