मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: सोमवारी 'या' राशींवर असेल महादेवाची कृपा; काय सांगते तुमची रास

Daily Horoscope: सोमवारी 'या' राशींवर असेल महादेवाची कृपा; काय सांगते तुमची रास

राशिभविष्य

राशिभविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 26 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 26 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

तुम्ही काही तरी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असलात, तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. ते व्हेंचर असू शकतं, प्रोजेक्ट असू शकतो किंवा असाइनमेंट; पण तुम्ही त्यासाठी या वेळी चांगला गृहपाठ केला असल्याची खात्री करूनच सुरुवात करा. तुम्ही स्वतःचं जे काही मूल्यमापन करता, त्यापेक्षा तुमची क्षमता खूप जास्त आहे.

LUCKY SIGN - A mirror image

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुम्ही जी मूलभूत तत्त्वं पाळता त्यांना चिकटून राहणं खूप मदतीचं ठरेल. त्यातूनच तुम्ही प्रगती करू शकाल आणि मनाची स्पष्टता तुम्हाला येऊ शकेल.

LUCKY SIGN - A silver candle

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुम्ही कोणाशी पार्टनरशिप करायचा विचार करत असलात, तर ही योग्य वेळ आहे; पण तुम्हाला बारीकसारीक गोष्टींचं पुनरावलोकन करण्याची गरज भासेल. व्यापक पातळीवर तुमच्या सर्व प्लॅन्सबद्दल एकाच वेळी सगळी माहिती सगळ्यांना सांगू नये. विनाकारण अति ताण घेऊ नये.

LUCKY SIGN - A gemstone

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुम्ही दाबून ठेवलेल्या भावना आता अशा एखाद्या व्यक्तीला दिसू शकतील, की जी व्यक्ती तुम्हाला अंतर्बाह्य ओळखते. तुम्ही भावनिकदृष्ट्या कोणावर तरी खूपच अवलंबून आहात. ते योग्य नाही. तुम्ही स्वतःला वेगळं केलं पाहिजे आणि स्वतंत्रपणे वाटचाल केली पाहिजे.

LUCKY SIGN - A yellow stone

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुम्ही ज्या व्यक्तीला काही काळ भेटलेला नाहीत, अशा व्यक्तीकडून तुमचं चांगलं स्वागत होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ऐशोआरामाच्या गोष्टींमध्ये रमावंसं वाटेल. कारण ऊर्जा त्या दिशेचे संकेत देत आहे. तुमच्यापैकी काही जण परदेशात सुट्ट्या घालवण्याचं नियोजन करत असू शकतील.

LUCKY SIGN - A candle

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुमच्यापासून लांब जात असलेल्या एखाद्या व्यक्तीशी तुम्ही रिलेशनशिपमध्ये असलात, तर भावनांपासून लवकर सुटका करून घेणं शक्य होणार नाही. तुमचा एकमेकांविषयीचा जिव्हाळा एकमेवाद्वितीय आहे. रोख रकमेचे व्यवहार करत असलात, तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण त्यावर कोणाची तरी बारीक नजर असण्याची शक्यता आहे. तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ अन्य व्यक्तीला न देण्याचा प्रयत्न करा.

LUCKY SIGN - A buddha statue

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुमच्यातले नेतृत्वगुण आता वाढत आहेत आणि तुम्हाला त्यासाठी रिवॉर्डही मिळेल. बारीकसारीक तपशीलांकडे तुमचं लक्ष असतं. तुम्ही त्या गुणांचा वापर कराल. कोणी तरी दूरवरून तुमचं कौतुक करील. घरून आलेल्या चांगल्या बातमीमुळे तुमच्यात उत्साह वाढेल.

LUCKY SIGN - An indoor plant

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

काही व्यक्तींनी तुमच्या कार्यपद्धतीवर पूर्वी आक्षेप घेतला होता; मात्र आता त्यात बदल होईल. तुम्ही काय दाखवू इच्छिता आणि लोकांना काय कळतं आहे, यात काही अलाइनमेंट आहे. आर्थिक लाभ मिळणं कायम राहील.

LUCKY SIGN - A chamber

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुमची मानसिक क्षमता आणि चपळाई यांच्या साह्याने तुम्ही जो काही प्रभाव पाडला आहे, त्याचं कौतुक व्हायलाच हवं. तुम्ही नव्या बिझनेस आयडियाबद्दल विचार करत असलात, तर ती लवकरच तुम्हाला अनुकूल ठरेल. पार्टनरशिपचीही शिफारस केली जात आहे. घरी शांतता मिळणं हे एक आव्हान आहे.

LUCKY SIGN - A climber

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

लपवलेली माहिती आणि कोणतंही आव्हान हाताळण्याचा तुमचा उत्साह याबद्दलच्या संमिश्र व्हाइब्जचा आजचा दिवस आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहात, ती व्यक्ती विश्वासार्ह नाही. तुमच्याबद्दलची माहिती त्या व्यक्तीच्या माध्यमातून दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचं त्यांच्यावरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही लवकरच एखाद्या रोड ट्रिपला जाऊ शकता.

LUCKY SIGN - A butterfly

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

आज तुम्ही तुमची प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी व्यापक प्लॅन्स कराल; मात्र ते पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. योग्य वेळेसाठी वाट पाहा. कुटुंबीयांकडून, जोडीदाराकडून मिळालेला सल्ला सध्या तरी समर्पक वाटणार नाही.

LUCKY SIGN - Canvas

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

जे प्रतिसादाची वाट पाहत आहेत, त्यांना प्रतिसाद देणं हे अवघड काम असू शकेल. तुमच्या भूतकाळातल्या कृत्यांबद्दल तुम्हाला सध्या बराच अपराधीपणा वाटत आहे. तुमच्यासोबत पार्टनरशिप केलेली व्यक्ती कदाचित तुम्हाला त्याची आठवण करून देण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - Two feathers

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya