मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: वाद आणि भांडणं टाळा तरच मिळेल यश; कसा असेल तुमचा 26 जुलैचा दिवस? जाणून घ्या

Daily Horoscope: वाद आणि भांडणं टाळा तरच मिळेल यश; कसा असेल तुमचा 26 जुलैचा दिवस? जाणून घ्या

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 26 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

पुढे वाचा ...

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

अखेर एखादी चांगली बातमी मिळेल आणि ती आर्थिक स्वरूपाची असेल. आजूबाजूच्या घटनांमुळे तुम्हाला भरून येईल. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती संकटात येईल. त्याचा परिणाम तुमच्यावरही होण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A small planter

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

एखाद्या नव्या व्यक्तीमुळे तुमचं लक्ष विचलित होईल. एखादा छोटा वाद होण्याची शक्यता असून, त्यात तुम्हाला बोल लावले जाण्याची शक्यता आहे. वेळेवर पूर्ण करता येणार नाहीत अशा क्षमतेबाहेरच्या गोष्टींची वचनं देऊन ठेवू नका.

LUCKY SIGN - A ruffle

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

अलीकडेच पूर्ण केलेल्या एखाद्या प्रचंड मोठ्या कामामुळे तुम्हाला थकल्यासारखं वाटेल. आता तुम्हाला पुढच्या आयुष्याचं नियोजन करण्यासाठी थोडी स्पेस हवी आहे. एखादी गरजू व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A silver string

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुम्ही शॉपिंगचं नियोजन केलं असेल, तर त्यात तुम्ही गुंतून पडाल. कामाच्या ठिकाणी काही डेडलाइन्स पाळाव्या लागणार आहेत. घरगुती मदतनीसाकडून दैनंदिन कामात काही अडथळे येण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A golden spoon

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

एखादी आश्वासक संधी तुम्हाला आधी हुकली असेल, तर आता ती पुन्हा एकदा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टी खूप जास्त विश्लेषण केल्यामुळे अपेक्षित रिझल्ट्स मिळतीलच असं नाही. आज तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येतील. त्यामुळे बॅकअप घ्यायला विसरू नका.

LUCKY SIGN - A diamond ring

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

आव्हानांच्या काळात तुम्हाला पाठिंबा देणारी एखादी स्थिर सपोर्ट सिस्टीम आहे, तुमचं भलं चिंतीत आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट फायद्याची ठरेल. तुम्हाला सध्या थोडं घाई-गडबडीत असल्यासारखं वाटेल.

LUCKY SIGN - A clay pot

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

कौटुंबिक गेट-टुगेदरमुळे तुम्हाला मोकळं होण्याची संधी मिळेल, नव्या आठवणी तयार होतील. तुमचं कौतुक करणारी व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेईल. लाँग वॉकमुळे संवादाची सुरुवात होऊ शकेल.

LUCKY SIGN - A fish net

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

तुम्हाला अधिकाराचं पद मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्याबद्दल तीव्र इच्छा ठेवाल, ती गोष्ट लवकरच तुम्हाला अनुकूल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही सहकाऱ्यासोबत वाद-भांडण टाळा.

LUCKY SIGN - Storage

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्हाला देण्यात आलेलं काम एखाद्या चांगल्या कारणाने पुढे ढकललं जाईल. तुमच्या वडिलांनी तुम्हाला काम दिलं असेल, तर तुम्ही ते पूर्ण करण्याचा विचार करायला हवा. तुमच्या शारीरिक कृती आणि मानसिक स्थिती यांचा ताळमेळ राहील, याची काळजी घ्या.

LUCKY SIGN - A saltwater lake

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

तुमच्या पुढच्या प्रवासातून तुम्हाला मनःशांती मिळेल. काही मित्र या आठवड्यात तुम्हाला भेटण्याचा विचार करत आहेत. तुम्ही तुमचे विस्कळीत असलेले विचार एकत्रित करण्याचा विचार केला पाहिजे.

LUCKY SIGN - A paper plate

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमच्या कामाचं नव्या आणि ज्येष्ठ व्यक्तीकडून कौतुक होईल. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये काही तणाव वाटत असतील, तर ती परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कोणाचा तरी तोटा होणं तुम्हाला लाभदायक ठरेल.

LUCKY SIGN - White roses

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

कामाशी संबंधित एखाद्या समस्येमुळे तुमचं लक्ष विचलित होईल. तुमच्यासोबत काम करणारा तुमचा अगदी जवळचा पार्टनर आर्थिक किंवा कायदेविषयक संकटात असू शकतो. तुमच्या आयुष्याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.

LUCKY SIGN - A yellow cloth

First published:

Tags: Astrology and horoscope