Home /News /astrology /

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना कर्जाबाबत मिळणार मोठा दिलासा; पाहा उद्याचं राशिभविष्य

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना कर्जाबाबत मिळणार मोठा दिलासा; पाहा उद्याचं राशिभविष्य

Daily Horoscope 26 May 2022 : 26 मे 2022 या दिवशी तुमच्या राशीत काय आहे?

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 26 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्ही रिलेशनशिपमध्ये अडकण्याचा विचार करत असलात तर तुमच्या आजूबाजूला आधीच तशी एखादी व्यक्ती आहे जी तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी उत्सुक आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रॅक्टिकल बाजूला कदाचित काही काळासाठी नमतं घ्यावं लागू शकतं. एखाद्या शहाण्या, हुशार माणसाचा सल्ला जरूर ऐकण्यासारखा असेल. LUCKY SIGN - A parrot वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्याला एखादी गोष्ट पटवून देण्याची तुमच्यामध्ये असलेली शक्ती हे तुमचं इतरांपेक्षा असलेलं वेगळेपण आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वातला चार्मिंगनेसदेखील प्रभाव पाडतो. तुम्हाला नवे आणि उपयुक्त ठरतील असे मित्र मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही पूर्वी ज्याचा विचार केला असेल ती गोष्ट आता कदाचित सोडून द्यावी लागेल. कारण ती आता व्यवहार्य नसेल. LUCKY SIGN - A cardboard box मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या आई-वडिलांपैकी एकाच्या आयुष्याचा तुमच्या अंतर्मनावर प्रभाव पडला असावा. कारण तुमचे निर्णयही कदाचित त्यांच्याच वाटेवरून जाणारे असू शकतात. आतापर्यंत वाट पाहिल्याचं चीज झाल्यासारखं वाटणारी नवी संधी मिळेल. तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्याची गरज भासेल. LUCKY SIGN - A tinted glass कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) दिवस तुलनेने सोपा आणि कमी ताणाचा असेल. घराबाहेरचा अनुभव नवी ऊर्जा देणारा असेल. भले तो थोड्या काळापुरता का असेना! तुमच्या जवळची व्यक्ती असं काही तरी बोलेल की तुम्हाला त्यावर गांभीर्याने विचार करणं भाग पडेल. LUCKY SIGN - Dry flowers सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) कामाच्या ठिकाणी नवी संधी तुमची वाट पाहत असण्याची शक्यता आहे. घरातल्या परिस्थितीमुळे तुम्ही ताणाखाली असलात तर लवकरच एखादा उपाय समोर येण्याची शक्यता आहे. स्वयंशिस्तीसाठी तुम्हाला काही नवे नियम घालून घ्यावे लागणार आहेत. LUCKY SIGN - A piggy bank कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेलं काम कदाचित पूर्णत्वाला जाऊ शकतं. तुम्ही स्वतःचा बिझनेस करत असलात तर अचानक काही नवे ग्राहक मिळू शकतात. कोणी तरी तुम्हाला काही तरी नवी गोष्ट करण्यासाठी त्यात सहभागी होण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करू शकेल. अगदी बारकाईने आढावा घेऊन मगच त्यात सहभागी व्हा. LUCKY SIGN - Aroma candles तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) शुद्ध अंतःकरण असलेली एखादी व्यक्ती एकत्रितरीत्या काम करण्याचा प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे येईल. तुम्ही त्या प्रस्तावाचा विचार करू शकता. एखाद्या प्रसिद्ध आणि प्रभावी व्यक्तीशी तुमची भेट होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी त्यात रिस्क्स काय आहेत याचं गणित बांधा. LUCKY SIGN - A claypot वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्ही ज्यांच्याकडे आतापर्यंत फारसं लक्ष दिलं नसेल अशा व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीबद्दलची एखादी समजलेली बातमी अर्धवट असू शकते. एखादी हुकलेली संधी महागात पडू शकते. LUCKY SIGN - A bonfire धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) नव्या रोलमुळे तुम्हाला कष्टांच्या टप्प्यातून जावं लागेल. तुम्ही तुमचे विचार अधिक योग्य वेळेसाठी राखून ठेवू शकता. अचानक तुमच्याकडे येणारी कामं किंवा जबाबदाऱ्या तुम्ही टाळू शकता. LUCKY SIGN - A constellation मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कामाच्या ठिकाणी बिघडलेले नातेसंबंध सुरळीत करण्याला तुमचं प्राधान्य असू शकतं. तुम्ही कोणाला गृहीत धरलं असेल तर आता ते निस्तरण्याची वेळ आहे. पूर्वी तुमचं कौतुक करणारी व्यक्ती आता अचानक पुन्हा भेटू शकेल. LUCKY SIGN - A pet कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या आयुष्यात एक नवा पॅटर्न जन्म घेत आहे. त्यामुळे जुन्या, विसरलेल्या गोष्टी परत येऊ शकतील. तुम्ही तुमच्या पूर्वीच्या संपर्कातल्या व्यक्तींशीही कदाचित पुन्हा जोडले जाऊ शकाल. एखादी ट्रिप घडू शकते. LUCKY SIGN - Sunflower मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) थोडीशी द्वेषाची भावना कदाचित निर्माण होण्याची शक्यता आहे. तिकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. खासकरून वैयक्तिक कारणांसाठी लवकरच परदेशवारी घडण्याची शक्यता आहे. बँकेच्या कर्जासाठी अर्ज केला असल्यास ते मंजूर होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A closet
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या