मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!! असं असेल 26 जानेवारीचं दैनिक राशीभविष्य

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!! असं असेल 26 जानेवारीचं दैनिक राशीभविष्य

आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य

आज दिनांक 26 जानेवारी 2023 गुरूवार. आज माघ शुक्ल पंचमी, वसंत पंचमी, सरस्वती पूजन. आज 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन असून सर्वांना शुभेच्छा!! आज चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. गुरू चंद्र शुभ योग होईल. श्री गणरायाला वंदन करून पाहुया आजचे बारा राशींचे राशीभविष्य.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मेष

व्यावसायिक अपेक्षा उंचावणारा दिवस आहे. संतती सुख आणि शैक्षणिक प्रगती यात वाढ होईल. परदेश प्रवास घडतील. मानसिक ताण जाणवेल. धार्मिक आस्था निर्माण होईल. दिवस शुभ.

वृषभ

भाग्य स्थानातील राशी स्वामी शुक्राचे भ्रमण फायद्याचे ठरेल. उंची वस्तू खरेदी, प्रवास योग येतील. वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा. राशीतील मंगळ मार्गी होत आहे. मित्र मंडळ ही तुमची प्राथमिकता राहील. दिवस उत्तम.

मिथुन

चंद्राचे दशम स्थानातून भ्रमण सामाजिक संपर्क साधेल. संतती सुख मिळेल. प्रवास योग, भेटीगाठी होतील. प्रकृतीची काळजी घ्या. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस गडबडीत जाईल.

कर्क

धनस्थान आणि भाग्य दोन्ही जागृत आहे. आर्थिक पाठबळ मिळेल. धार्मिक कार्यक्रमात हौसेने भाग घ्याल. गृह सौख्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. मात्र, गैरसमज टाळा. दिवस शुभ.

सिंह

आज मंगल दिन ईश्वर चरणी प्रार्थना करून घालवा. धर्म आणि सामाजिक जीवनात लाभ देणारे ग्रहमान आहे. गुरू बल नसले तरी आज दिवस शांततेत पार पडेल. वैवाहिक सुख मिळेल. प्रवास योग येतील. मध्यम दिवस.

कन्या

अविवाहित व्यक्तींनी लग्नाचे जोरदार प्रयत्न करावे. जोडीदार हवा तसा मिळण्याचे योग येतील. संततीसाठी कष्ट पडले तरी लाभ मिळेल, नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होतील. प्रकृती जपा. दिवस उत्तम.

तूळ

एक लाभदायक दिवस असून केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठ कामाची दाखल घेतील. संततीसाठी शुभ योग असून आनंदाचे वातावरण राहील. मित्र भेट होईल, कर्ज मुक्ती होईल. दिवस शुभ.

वृश्चिक

परदेश जाण्यासंबंधी काही कामे पडून असतील तर आज प्रयत्न करा. होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात यश देणारा दिवस आहे. वरिष्ठ खुश राहतील. घरात देखील जास्तीचे काम येईल. संततीसाठी शुभ दिवस.

धनू

गृह सौख्य, वाहन आणि वास्तू लाभ आणि धार्मिक आस्था निर्माण करणारा दिवस आहे. चतुर्थ स्थानातील चंद्र गुरू भ्रमण सुखद अनुभव देईल. मातृ-पितृ सुख लाभेल. आर्थिक लाभ होतील. दिवस शुभ.

मकर

आज राशीतील ग्रह शुक्र, सूर्य आणि बुध शुभ योग तयार करीत आहेत. आनंदात राहण्याचा दिवस आहे. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्याबाबत काळजी घ्या. दिवस मध्यम.

हे वाचा - जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

कुंभ

आज जोडीदाराला वेळ देऊन आपल्या दिवसाची सुखद सर्वात करा. खर्च होईल पण नवीन खरेदी , मौजमजा करण्यात दिवस जाईल. आर्थिकदृष्टया शुभ दिवस. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे.

मीन

आज दिवस काहीसा संथ, घरात शांतता पूर्वक जाईल. गुरू चंद्र युती योग चांगली प्रकृती आणि आर्थिक लाभ दाखवीत आहे. शत्रूपासून सावध राहा. दिवस शुभ.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Horoscope, Rashibhavishya, Rashichark