Home /News /astrology /

Daily Horoscope : आधीच्या कामांचं फळ मिळेल, नव्या संधीचेही संकेत; तुमच्या राशीत काय पाहा राशिभविष्य

Daily Horoscope : आधीच्या कामांचं फळ मिळेल, नव्या संधीचेही संकेत; तुमच्या राशीत काय पाहा राशिभविष्य

Daily Horoscope 25 June 2022 : 25 जून 2022 रोजीचं तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 25 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मिळून काही मुद्द्यांवर चर्चा करणं टाळायचं ठरवलं आहे, हा प्रश्न आता सोडवावा लागेल. भरारी घेण्यासाठी तुम्हाला एखादा नवा ट्रेंड आकर्षित करून घेईल. जागृत राहा. LUCKY SIGN - Calming music वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही पब्लिक डीलिंग प्रोफेशनमध्ये असलात तर काही सकारात्मक घडामोडी अनुभवाला येतील. खर्च वाढत आहेत मात्र तुम्ही त्यांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकाल. नियमितपणे आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य द्यावंच लागेल. LUCKY SIGN - A silver chain मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्ही दुसरीकडे पाहत असलात तर हातात असलेली संधी जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव जाणवत असेल किंवा ते पद स्वीकारावं की नाही याबद्दल अति विचार करत असलात तर ती चिंता आता रेलेव्हंट राहणार नाही. वेळेचं योग्य व्यवस्थापन करावं लागेल. LUCKY SIGN - A book cover कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्हाला तुमच्या जुन्या खाण्याच्या सवयी तसंच अन्य काही सवयी सोडून द्यायच्या आहेत पण त्यात तुम्ही यशस्वी झाला नाहीत. आता त्या सगळ्याचा गंभीरपणे आढावा घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत कोणालाही भावनिकदृष्ट्या कमिटमेंट दिलेली नाही याची खात्री करा. LUCKY SIGN - A rose quartz सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही काही काळापासून रिलॅक्सेशनची वाट पाहत होतात. ते क्षण तुम्हाला ट्रिपमधून मिळतील. आयुष्य खूप दमवणारं आणि व्यग्र झालं होतं. आता भविष्याचं प्लॅनिंग करा आणि ठोस कृती करण्याचं उद्दिष्ट ठेवा. LUCKY SIGN - A blue sapphire कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) काही काळ तुम्ही अति विचार करत आहात. त्याचा तुम्हाला कशासाठीही उपयोग होणार नाही. तुमच्या विचारांचं एकत्रीकरण करा, नियोजन करा, कोणा करी विश्वासू व्यक्तीसोबत चर्चा करा. त्यानंतर लवकरच तुम्ही झेप घेऊ शकाल. LUCKY SIGN - A solo performance तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखादी महत्त्वाची गोष्ट करत असताना तुमचे विचार अनियंत्रित होणार नाहीत, याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या सुपरव्हिजनखाली असलेल्या अनेक गोष्टी पणाला लागलेल्या असू शकतात. येत्या काही दिवसांत आर्थिक स्थिती सुधारू शकेल. LUCKY SIGN - A large window वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) काही वेळा तुमची मतं तुमच्या विचारांपेक्षा पुढच्या काही गोष्टी मांडतील. तुमचा संवाद आणि टोन यांच्यावर असलेलं मनाचं नियंत्रण गमावू नका. तुमच्या पर्फेक्शनसाठीच्या संघर्षामुळे अन्य काही व्यक्तींना विनाकारण त्रास होऊ शकतो. LUCKY SIGN - A tennis racket धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखादी नवी व्यक्ती तुमच्या आयुष्याला भावनिक स्पर्श करील. तुम्हाला थोडं सोयीचं वाटण्यासाठी आणखी काही काळ घ्याल. एखादी नवी कल्पना तुमच्या मनात येईल. भूतकाळात केलेल्या एखाद्या कामाचं बक्षीस आता मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A cluster of birds मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) बऱ्याच गोष्टींची आता चांगली अलाइनमेंट होत आहे आणि ते समजून घेण्याची स्पष्टताही तुम्हाला आली आहे, असं तुमच्या लक्षात येईल. तुमच्या दृष्टिकोनात थोडा बदल केल्यास तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकेल. एखादी संधी लवकरच येत असण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A heritage clock कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमचं लक्ष नसल्याच्या काळात अनेक गोष्टी घडलेल्या असू शकतात. त्या गोष्टी तुमच्या मनातून कायमस्वरूपी पुसून टाकण्याआधी त्या जाणून घेण्यासाठी काही वेळ द्या. गेल्या काही दिवसांत प्रचंड खर्च झाला आहे. तुमच्या खर्चाच्या पॅटर्नचा आढावा घेण्याची गरज तुम्हाला भासू शकेल. LUCKY SIGN - A bell मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) दिवस दमवणारा आहे. तुमच्या मनात अनेक गोष्टी चालू असतील. तुम्हाला त्या सर्व गोष्टी एकाच वेळी सोडवायच्या असतील. तुम्हाला थोडा संयम आणि मार्गदर्शनाची गरज आहे. LUCKY SIGN - A semi-precious gem
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या