सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 24 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
एकाच वेळी अनेक मुद्दे उपस्थित झाले असले, तरीही परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. सध्या तरी ऑफिसचं काम काहीसं हलकं होण्याची शक्यता आहे. एखादं लक्षणं कायम राहिल्यास लगेचच वैद्यकीय मदत आणि सल्ला घ्या.
LUCKY SIGN - An abstract art
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुम्हाला पूर्वी एखादी संधी हुकली असली, तर ती आता वेगळ्या स्वरूपात पुन्हा पुढे येण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळच्या वर्तुळातली एखादी व्यक्ती तुमच्या प्रतिमाहननाचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. स्वतःवर खूप टीका करणं म्हणजेच खूप जास्त प्रमाणात सेल्फ-क्रिटिकल राहणं ही चांगली गोष्ट नाही.
LUCKY SIGN - A squirrel
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
एखादा रचनात्मक आतला विचार तुम्हाला परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळण्यास मदत करील. दुसऱ्यांचे सल्ले ऐकू नका. नेहमीपेक्षा वेगळ्या कामामुळे अस्वस्थता येण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - A nightingale
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
कामाच्या ठिकाणी काही घडामोडी घडण्याचा, बदल होण्याचा हा काळ आहे. जॉब, कामाचं ठिकाण किंवा ऑफिसचं आवार यांपैकी कशात बदलाची शक्यता. पैशांचा प्रवाह सुरळीत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. आई-वडिलांचे मूड्स बदलत राहणं ही काळजीची गोष्ट होऊ शकेल.
LUCKY SIGN - A goldfish
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्ही काही काळासाठी रिलॅक्स असाल आणि थोडी विश्रांती घेऊ इच्छित असाल. तुमच्या बिझी शेड्युलमुळे तुमच्या जोडीदाराला तुम्ही दुरावल्यासारखं वाटत असेल. शेअरिंगमुळे या परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होऊ शकेल.
LUCKY SIGN - A sparrow
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
दिवस सोशलायझेशनसाठी आणि आउटिंगकरिता प्लॅन करण्यासाठी चांगला आहे. अचानक हातात आलेलं एखादं काम तुम्हाला मागे ठेवावं लागू शकेल. एखाद्या नव्या व्यक्तीमुळे एखादी नवी जॉब अपॉर्च्युनिटी मिळू शकेल.
LUCKY SIGN - A turtle
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
दिवस काहीसा बिझी असू शकतो. हवाहवासा असलेला दिलासा संध्याकाळी मिळू शकतो. सध्याच्या दृष्टीने एखादी अत्यंत महत्त्वाची असलेली गोष्ट तुमच्याकडून कदाचित निसटू शकते. हे टाळण्यासाठी नोट्स काढून ठेवा. नव्या विचारामुळे तुम्हाला स्पेक्युलेशनसाठी अधिक प्रेरणा मिळेल.
LUCKY SIGN - A claypot
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
दीर्घकाळापासून दुर्लक्षित राहिलेला प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन तुम्ही आता करू शकाल. तुम्हाला त्याच्या यशाबद्दल खात्री वाटतेय आणि तुम्ही योग्य मार्गावर असाल. दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकेल.
LUCKY SIGN - A spade
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
एखादा नातेवाईक छोटासा त्रास देऊ शकेल. एखादी नवी गुंतवणुकीची संधी नंतर चांगला परतावा देईल. तुमचं भावंड तुम्हाला माहिती नसलेल्या विषयाची जाणीव करून देईल.
LUCKY SIGN - An ancient coin
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
प्रवास आणि अन्य काही गोष्टींची शक्यता आहे. सध्याचा काळ तुम्हाला एका जागी स्थिर राहून विश्रांतीची संधी देणार नाही. चिंता किंवा घाईघाईत निर्णय घेणं टाळावं. तुम्हाला आधी सुचवण्यात आलेल्या एखाद्या गोष्टीला धरून राहावंसं वाटेल.
LUCKY SIGN - A closet
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमचे विचार सध्याच्या वातावरणाला साजेसे नाहीत; मात्र दृष्टिकोनात बदल झाल्यास तुमच्या समस्या सुटू शकतात. अन्य व्यक्ती तुम्हाला जोखतात, त्याबद्दल तुम्ही कधीच काळजी केलेली नाही आणि आताही ती करू नये. एखादा नवा मित्र आयुष्यात येईल आणि त्यामुळे दिलासा मिळेल.
LUCKY SIGN - A sepia tone photo
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
एखादा विचार तुमच्या मनात घोळत असेल आणि त्यानेच तुमचं मन व्यापून टाकलं असेल. त्यावर अधिक विश्लेषण व्हायला हवं, असा विचार मनात येईल. व्यापक दृष्टीने पाहिल्यास तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यास मदत होईल. उत्पन्नाच्या केवळ सोयीच्या स्रोतावर अवलंबून राहणं योग्य/पुरेसं नाही.
LUCKY SIGN - A silver plate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.