सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 23 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
कोणी तरी दुरून रोमँटिक पद्धतीने तुमचं कौतुक करत असेल. एखादा नवा दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी मदत करील. तुम्हाला लवकरच कोलॅबोरेशनची एखादी संधी मिळू शकेल.
LUCKY SIGN - An old architecture
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुम्हाला जे लोकांनी करावं असं वाटत असेल, ते तुम्ही स्वतः आधी केलं पाहिजे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पाठीमागून काही त्रास दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे. तुमच्या आतल्या आवाजाचं ऐकणं गरजेचं आहे. काही ध्यानधारणा करणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN - A jade plant
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुम्ही करारात सहभागी नसलात, तर एका मर्यादेच्या पलीकडे विनवणीचा प्रयत्न करू नका. नियोजनबद्ध असाइनमेंटची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्यास तुम्हाला तुमच्या मिशनच्या जवळ घेऊन जाईल. कामासाठी एखादी छोटी ट्रिप होण्याचे संकेत आहेत.
LUCKY SIGN - A large terrace
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुमची तयारी कदाचित पुरेशी नसेल आणि त्यामुळे तुम्हाला फ्रस्ट्रेशन येऊ शकेल. तुमच्या इंडस्ट्रीतली एखादी वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला एखादा असा सल्ला देईल, की तो कायम लक्षात ठेवावा. तुमच्या हेतूपेक्षा अधिक एखाद्या गोष्टीचं लक्ष्य तुम्ही ठेवू शकाल.
LUCKY SIGN - A light tower
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
कामाच्या संधीमुळे तुम्हाला कदाचित प्रवासाचा योग लवकरच येऊ शकेल. तुम्हाला घरच्या पातळीवर कदाचित काही आव्हानांना तोंड द्यावं लागेल; मात्र अचानक झालेल्या आउटिंगमुळे तुम्हाला रोजच्या रूटीनपासून हवी असलेली सुटका मिळू शकेल.
LUCKY SIGN -Glass jars
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
गुंतवणूक हे काळजीचं कारण होऊ शकेल. तुमची टीम तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करण्याची शक्यता आहे. कुटुंबातल्या कोणी तुम्हाला सल्ला दिला, तर तुम्ही तो टाळू नये.
LUCKY SIGN - A coffee mug
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
एखादी नव्याने ओळख झालेली व्यक्ती तुमचा लाइमलाइट खेचून घेण्याची शक्यता आहे; मात्र ते तात्पुरतं असण्याची शक्यता आहे. एखादा ऑनलाइन कोर्स किंवा ट्युटोरियल तुम्हाला आकर्षक वाटेल आणि त्यात प्रवेश घ्यावासा वाटेल. नव्याने मिळालेल्या आत्मविश्वासामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल.
LUCKY SIGN - A candle stand
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
कल्पना न केलेल्या अनेक अडचणींमुळे तुमच्या कामाच्या गतीवर परिणाम झाला आहे. तुम्हाला अधिक प्रयत्न करून गोष्टी पुढे ढकलत राहावं लागेल. पूर्वीच्या प्रलंबित राहिलेल्या एखाद्या विषयात काही हालचाल होऊ शकेल.
LUCKY SIGN - A garden
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुम्ही जे काही पुढे ढकलत आहात, ते काम आधी करा. खासकरून घराच्या आघाडीवर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या जवळच्या मित्राकडून सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - A solar panel
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
आंतरराष्ट्रीय संधीमुळे सरप्राइज आणि गुड न्यूज मिळेल. एखाद्या प्रलंबित असाइनमेंटला मंजुरी मिळू शकेल. फिटनेसच्या संदर्भात एखादा इशारा मिळू शकेल आणि तुम्ही त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं.
LUCKY SIGN - A flower vase
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुम्हाला इम्प्रेस करणाऱ्या एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीशी तुमची भेट होण्याची शक्यता आहे. दक्षपणा सर्वोच्च पातळीवर असायला हवा. तुम्ही काळजी घेतली नाहीत, तर एखादी मौल्यवान गोष्ट गमावू शकाल.
LUCKY SIGN - A honeybee
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
एखादी छोटी, नवी असाइनमेंट येत्या काळात तुम्हाला मोठ्या संधी मिळवून देऊ शकेल. चांगलं काम करण्याच्या ताणामुळे तुम्ही कदाचित थोडे बॅकफूटवर येऊ शकाल. या आठवड्याच्या अखेरीला पैशांचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - Buddha statue
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.