मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Daily Horoscope: मेष राशीला गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम दिवस; मिथुन राशीने मनाचं ऐकावं

Daily Horoscope: मेष राशीला गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम दिवस; मिथुन राशीने मनाचं ऐकावं

कर्क राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील. जे लोक खाण्यापिण्याच्या व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. आरोग्यही चांगले राहील. जुनाट आजार दूर होऊ शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्क राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील. जे लोक खाण्यापिण्याच्या व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. आरोग्यही चांगले राहील. जुनाट आजार दूर होऊ शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

तुमच्या जन्मतारखेनुसार ठरणाऱ्या सूर्यराशीनुसार तुमचा आजचा दिवस (बुधवार, 23 February 2022) कसा असेल? वाचा आजचं राशीभविष्य...

  सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 23 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल )

  गुंतवणूक करण्यासाठी अगदी उत्तम वेळ आहे. पुढील योजना आखून त्यानुसार पुढं जाण्यासाठी अगदी अनुकूल काळ आहे. त्यामुळं यश साजरं करण्याची संधीही मिळेल. तुमच्यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या नात्यातून बाहेर पडणं शक्य होईल. अशी नाती दूर होतील.

  LUCKY SIGN - A black crystal

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  बिघडलेलं नातं पुन्हा जुळवायचं असेल तर त्यासाठी साधा सरळ मार्ग अवलंबा. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरळ ठेवा. एखाद्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्या नात्यात सकारात्मकता जाणवेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातल्या महत्त्वपूर्ण बदलांचं स्वागत होईल.

  LUCKY SIGN - A squirrel

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  अपघातातून बरे होऊन काम करण्यास उत्सुक असाल. काही बाबींचा वेध घेण्यास वेळ लागेल. तुमचं मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. आजचा दिवस तुमच्या मनाचं ऐका. एखाद्या जवळच्या मित्राची भेट आनंद देईल.

  LUCKY SIGN - A cobalt blue article

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  तुम्ही दिवास्वप्न पाहत असाल आणि भूतकाळातल्या कल्पनांमध्ये जगत असाल; मात्र आता त्यातून बाहेर पडून काही नवीन ध्येय गाठण्याची वेळ आली आहे. सुंदर दिसण्यासाठी स्वतःचं लाड करण्याकरिता आजचा दिवस चांगला आहे.

  LUCKY SIGN - A tinted glass

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या यांमध्ये स्वत:ची अगदी ओढाताण होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते; मात्र हे तात्पुरतं असेल. काही वेळा एखादी जबाबदारी पूर्ण करण्याची गरज कामापेक्षा अधिक महत्त्वाची ठरते. रागावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. राग आवरणं गरजेचं आहे.

  LUCKY SIGN - A sunset

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  एखादी किरकोळ गोष्ट तुम्हाला दिवसभर अस्वस्थ करील. तुमचं रूटीन ठरवताना किंवा एखाद्याला शब्द देताना काळजी घेणं आवश्यक आहे. एखादी आर्थिक अडचण आता दूर होऊ शकते. दीर्घ काळ रखडलेलं आर्थिक काम आता सुरळीत होईल. त्यामुळे तुमच्या योजना अंमलात आणण्यासाठी आजचा दिवस उत्तम ठरेल.

  LUCKY SIGN - A silk thread

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  आपल्या बोलण्यानं एखादं संकट ओढवून घेण्यापेक्षा आधीच काळजी घेणं योग्य. त्यामुळं बोलताना सावधगिरी बाळगा. जी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवते, ती तुमच्याकडून अधिक अपेक्षा करते. त्यामुळं आपली एनर्जी राखून ठेवणं आवश्यक आहे.

  LUCKY SIGN - A water body

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  मुलाखतीसाठी जात असाल, तर उत्तम तयारी करा. त्याचा फायदा होईल. कोणाच्याही टीकाटिप्पणीने तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या स्वप्नाचा पाठपुरावा करत असाल, तर वेळ वाया घालवून चालणार नाही. तुमच्या कष्टांना चांगलं फळ येईल.

  LUCKY SIGN - An indoor game

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  कोणत्याही आव्हानात्मक व्यवहारात उतरण्यापूर्वी चांगल्या वाटाघाटी करण्याची कला आत्मसात करणं आवश्यक आहे. अशा वेळी तुम्हाला तुमच्या आईचा आधार उपयोगी पडेल. शिक्षकांकडून तुमचं कौतुक होईल. त्यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढेल.

  LUCKY SIGN - A wrist band

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  तातडीची बाब काय आहे आणि महत्त्वाचं काय आहे याचा निर्णय घेण्याची वेळ येईल. तुमच्या प्रगतीवर कोणी तरी बारकाईने लक्ष देत असल्याचं जाणवेल. दिवसभरात खूप धावपळ होईल, दमछाक होईल. गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा.

  LUCKY SIGN - A cinnamon stick

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  तुमच्यातली सर्जनशीलता, कलात्मकता दर्शवण्यासाठी उत्सुक असाल. प्रेक्षकांपर्यंत तुमचं हे कौशल्य पोहोचण्याची गरज आहे; मात्र लोकांचे सल्ले ऐकण्याच्या मनःस्थितीत तुम्ही नाही आहात. एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठीचे तुमचे प्रामाणिक प्रयत्न उपयुक्त ठरतील. तुम्ही आणखी काही काळ मुखवटा धारण करू शकत नाही.

  LUCKY SIGN - A mild wind

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  एखादा नवीन प्रकल्प, उपक्रम हाती घेत असाल, तर त्यासाठी मोजूनमापून पावलं टाकणं योग्य ठरेल. खेळत्या भांडवलाची उपलब्धता चांगली राहील. नवीन लोकांच्या भेटी होतील. त्यांचा तुमच्यावर प्रभाव पडेल. एखाद्या प्रसिद्ध ठिकाणाला भेट द्याल.

  LUCKY SIGN - A floral pattern

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya