सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 22 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
आता तुम्हाला खूप आत्मविश्वास वाटेल तसंच कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावीशीही वाटेल. कुटुंबातल्या प्रत्येकाकडून तुम्हाला खूप पाठिंबा, सहकार्य मिळेल. प्रवास करताना तुमच्या सामानाची काळजी घ्या.
LUCKY SIGN - A blue bag
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
नव्या उपक्रमांवर सध्या काही बंधनं येऊ शकतात. कारण त्यावर काही आक्षेप घेतले जाऊ शकतात किंवा उशीर होऊ शकतो. पुढचं शिक्षण घेण्याची मानसिकता तुम्ही केली असेल तर तुम्ही त्यात पुढचं पाऊल उचललंच पाहिजे. एखादं ऑथोराइज्ड डॉक्युमेंट काळजीचं कारण बनेल.
LUCKY SIGN - A neon band
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमचा अचानक घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे नव्या शक्यतांचा उदय होऊ शकेल. अधिक शोधा. जोडीदाराबरोबरचा वाद दिवसभर टिकेल. कामानिमित्त छोट्या ट्रिपची बातमी थोडासा दिलासा देईल.
LUCKY SIGN - A diamond
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुम्ही अनेक मित्रांना आकर्षित केलं असेल; मात्र तुम्हाला आवडेल असा मार्ग काही मोजक्यांनीच निवडला असेल. दिवसात किरकोळ डिप्रेशन येऊ शकेल त्यातून जाणीवपूर्वक बाहेर पडा. सिंगल व्यक्तींना शोध घेण्यासाठी दिवसाचा उत्तरार्ध चांगला ठरेल.
LUCKY SIGN - A green dress
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुमच्या सभोवती सुरू असलेल्या हालचालींबद्दल सावध राहा. एखादा छोटासा ट्विस्ट किंवा जखम होण्याचे संकेत आहेत. तुम्हाला रस असलेली एखादी व्यक्ती आता काही खेळी खेळण्याची शक्यता आहे. मानधनाबद्दलची चांगली बातमी येण्याचे संकेत आहेत.
LUCKY SIGN - A keyhole
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
नव्या कपड्यांची किंवा अन्य काही गोष्टींची अचानक खरेदी होण्याचा योग आहे. काम थोडं कमी असेल त्यामुळे मित्रांना भेटण्यासाठी चांगला दिवस. जुन्या आठवणींमुळे आनंद मिळेल.
LUCKY SIGN - A gold bangle
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
तुमच्या नव्या कल्पनेची शक्यता आता आकार घेऊ शकेल. तुम्ही भूतकाळात कोणाचा छळ केला असेल तर ती व्यक्ती तुम्हाला पुन्हा भेटण्याची शक्यता आहे. आपल्या घरात एखादा शांत कोपरा असावा, अशी गरज तुम्हाला भासेल.
LUCKY SIGN - A single stem
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
नव्या जॉबसाठी अर्ज करत असाल तर दुसऱ्या चाचणीसाठी तयारी करा. तुम्ही कंपनी व्यवस्थापनाला जे काही सादर करणार असाल त्याला संमिश्र प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका.
LUCKY SIGN - A rocking chair
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
एखाद्या कलाकाराकडून तुम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू आता तुमच्यासमोर येऊ लागतील. एखादं नवं कोलॅबोरेशन होण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - A photo display
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
एखादी माहिती कोणी वैयक्तिकरीत्या तुम्हाला देईपर्यंत तुम्ही त्यावर विश्वास ठेवता कामा नये. तुमच्या जवळच्या वर्तुळात एखादी व्यक्ती येण्याचा प्रयत्न करत असेल. पैशांचा प्रवाह सुरळीत राहिल.
LUCKY SIGN - An art gallery
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
बहुतांश वेळ तुम्ही घरगुती प्रकरणांत बिझी राहाल. तुम्हाला खूप सोल्युशन्स मिळणार नाहीत. उत्पन्नाच्या एखाद्या अतिरिक्त स्रोतामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.
LUCKY SIGN - Lock and key
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुम्ही ज्या व्यक्तींची काळजी करता त्यांच्याशी सत्य बोलण्यासाठी तुम्हाला धैर्य गोळा करावं लागणार आहे. तुमच्या वरिष्ठांकडून अप्रूव्हल मिळण्यासाठी कदाचित वेळ लागेल. प्रलंबित असलेल्या एखाद्या कायदेविषयक प्रकरणात काही हालचाल होण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - The rope
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.