Home /News /astrology /

Daily Horoscope : महत्त्वाचा आहे उद्याचा दिवस; समोरून चालून येईल नवी संधी

Daily Horoscope : महत्त्वाचा आहे उद्याचा दिवस; समोरून चालून येईल नवी संधी

Daily Horoscope 21 May 2022 : 21 मे 2022 हा दिवस संधीचा आहे. पाहा तुमचं या दिवसाचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 21 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आश्चर्याचे धक्के बसतील, सेलिब्रेशन्स होतील. नवी हातमिळवणी तसंच गुंतवणूक यांना ग्रहस्थिती साथ देत आहे. वाटाघाटी करताना शांत राहा आणि क्रिटिकल अ‍ॅनालिसिसवर तुमचा वेळ व्यतीत करा. LUCKY SIGN - A mannequin वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) भूतकाळात तुम्ही मोठ्या भावनिक अडचणीला सामोरे गेला असलात तर तुम्हाला आता संतुलित वाटायला सुरुवात होईल. भूतकाळातल्या काही प्रथांचा अडथळा होईल. LUCKY SIGN - A role model मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) प्लॅनमध्ये अचानक झालेल्या बदलामुळे तुमचा अख्खा दिवसच बदलून जाऊ शकतो. तुम्हाला एखाद्या सोहळ्याचं आमंत्रण मिळू शकतं आणि तिथे एखादी नवी ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख तुमच्यासाठी दीर्घकालीन उपयोगाची ठरेल. बाहेर खाणं टाळा. LUCKY SIGN - A silver string कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) काही तरी नवं सुरू करण्यापूर्वी तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटू शकेल; पण सारी शक्ती तुमच्या बाजूने आहे. एखादा विशिष्ट निर्णय घेण्याबद्दल तुमच्या मनात गोंधळ असेल. त्याबद्दल स्पष्टता येण्यासाठी तुम्ही अधिक वेळ घेऊ शकता. LUCKY SIGN - A rose plant सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) दिवस चमकण्याचा आहे आणि स्वतःच्या टर्म्सवर गोष्टी पूर्ण करण्याचा आहे. तुम्ही अगदी सहजपणे बाकीच्यांवर मात करून पुढे जात असल्याचं तुम्हाला जाणवेल आणि तुमचं कौतुकही होईल. तुम्ही जे काही करत आहात त्याबद्दल तुम्हाला लवकरच काही बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A sunrise कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) दिवसाची सुरुवात संथ होईल; मात्र उत्तरार्धात त्याला वेग येईल. तुम्हाला रूटीनचा ताण येण्याची शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी स्वतःला थोडी मानसिक स्पेस आणि वेळ द्या. संध्याकाळ मजेची जाण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A tall building तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुम्ही आता प्रगल्भ झाला आहात आणि परिस्थितीचं विश्लेषण आणि प्रक्रिया करण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुमच्याकडून काही तरी उत्तम होण्याची अपेक्षा आहे आणि तुमच्याकडून त्यावर काम केलं जावं. तुमच्यावर अवलंबून असलेली एखादी जवळची व्यक्ती तणावाखाली असण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A tan wallet वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्ही ज्यांच्याशी वचनबद्ध आहात, त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणं हे तुमचं मुख्य काम आहे; पण ते न जमल्यामुळे तुम्हा दोघांना फ्रस्ट्रेशन येत असावं. प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात असलात तर अधिक चांगला काळ येण्याची वाट पाहू शकता. LUCKY SIGN - An emerald धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) दिवस अनेक संधींचा आहे. तुमच्यासाठी त्या कदाचित छोट्या असतील; पण इंटरेस्टिंग आहेत. प्रलंबित राहिलेल्या निर्णयांवर तुम्ही आता विचार केलाच पाहिजे. मेसेजेस आणि कॉल्सना प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे. LUCKY SIGN - A golden embroidery मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) दिवस अगदी सर्वसाधारण असेल. पुढचं प्लॅनिंग करू शकता. एखादा मित्र अचानक न ठरवता येऊन भेटू शकतो आणि तुमचा उत्साह वाढवू शकतो. आईची प्रकृती हे काळजीचं कारण ठरू शकतं. LUCKY SIGN - A honey bee कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला स्वप्नात असल्यासारखं वाटत असेल आणि एखाद्या व्यक्तीची तुम्हाला खूप आठवण येत असेल. पण आता तुम्ही वर्तमानकाळात यायला हवं आणि भविष्यकाळाचा विचार करायला हवा. एखादी इंटरेस्टिंग नवी संधी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्याला नवी संधी मिळू शकते. LUCKY SIGN - A jute bag मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यात, तर तुम्हाला दुखावलं जाण्याची भीती वाटते आहे. भावना व्यक्त केल्या नाहीत, तर चिंतेत भर पडते आहे. त्यामुळे तुम्ही हे लिहून पाठवू शकता. तुमचं गुपित माहिती असलेला अत्यंत जवळचा मित्र ही विसंबून राहण्यास योग्य व्यक्ती आहे. LUCKY SIGN - A lake
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या