Home /News /astrology /

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींची प्रगती निश्चित; पाहा तुमचं राशिभविष्य काय आहे?

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींची प्रगती निश्चित; पाहा तुमचं राशिभविष्य काय आहे?

Daily Horoscope 20 May 2022 : तुमचं 20 मे 2022 रोजीचं राशिभविष्य जाणून घ्या.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दिवस असा आहे, की तुम्ही वैयक्तिक आणि प्रोफेशनल अशा दोन्ही पातळ्यांवर प्रत्यक्ष प्रगती अनुभवू शकाल. तुमच्या असं लक्षात येईल, की काही गोष्टी तुमच्यासाठी एकत्र येत आहेत. तुम्ही ब्रेक घेण्याचं नियोजन करत असलात, तर आणखी काही काळासाठी ते टाळा. LUCKY SIGN - A novel वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) काही महिन्यांपूर्वी तुम्ही ज्याची कल्पना केली होती, त्या प्रगतिशील कालखंडाकडे तुम्ही आता वाटचाल करत आहात. परदेशातून येणारी एक व्यक्ती तुमच्यासाठी संधी आणण्याची शक्यता आहे. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली असलीत, तर तिचा आता आढावा घेण्याची गरज आहे. LUCKY SIGN - A solitaire मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्ही भूतकाळात रमण्याची शक्यता आहे. तुमच्या मोठ्या अचीव्हमेंट्सच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळतील. दिवसाची सुरुवात संथ होण्याची शक्यता आहे; मात्र तुमच्या ऊर्जेमुळे तुमचा दिवस उत्तम जाईल. मोठ्या कार्यवाहीची अपेक्षा नाही. LUCKY SIGN - A clear quartz कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) बऱ्याच काळापासून हरवलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला आता कळण्याची शक्यता आहे. तुम्ही कदाचित कोणाला तरी अगदी जवळून फॉलो करत असण्याची शक्यता आहे. आता तुमचे विचार व्यक्त करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला भावनिक मार्गदर्शनाची गरज भासू शकेल. LUCKY SIGN - A neon sign सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमच्या मुलांना तुमच्या वेळेची आणि तुमच्याकडून लक्ष दिलं जाण्याची गरज भासेल. भूतकाळात केलेल्या एखाद्या गुंतवणुकीचा उपयोग आता होऊ शकतो. तुम्ही लवकरच एखादं गेट-टुगेदर आयोजित करण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A raft कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही आधीची मोहीम अत्यंत यशस्वीरीत्या हाताळलीत. त्यामुळे आता ब्रेक घेऊन पुढचं नियोजन करण्याची गरज आहे. तुमच्या मनात अनेक कल्पना येतील. त्यापैकी योग्य कल्पनांची निवड तुम्ही कराल, याची काळजी घ्या. अचानक रोख रकमेचा प्रवाह येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A new road तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) पुढचं पाऊल उचलण्यास विरोध करू नका. जोखीम घेण्यास हरकत नाही. नव्या वातावरणाशी तुम्हाला लवकरच जुळवून घ्यावं लागेल. घर किंवा ऑफिस बदलण्याचं नियोजन करत असलात, तर ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - An old acquaintance वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्ही तुमचा संताप सोडून दिलात, तर तुम्हाला सर्वोत्तम संधींपैकी संधी मिळेल आणि कमीत कमी चिंता सहन कराव्या लागतील. तुमचं स्वतःवरचं नियंत्रण सुटू देऊ नका. व्यायाम, ध्यानधारणा यांची शिफारस करण्यात येत आहे. LUCKY SIGN - A piggy bank धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) रहस्याची उकल होईल. तुमच्या मनात जे बराच काळ सुरू होतं, ते कसं थांबवायचं याचे क्लूज तुम्हाला मिळतील. जुन्या पद्धतींना आता काही मूल्य नसल्याने तुम्ही आता गोष्टींकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहायला सुरुवात कराल. LUCKY SIGN - A black diary मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमच्या आजूबाजूला सुरू असलेल्या बऱ्याच नाट्यकल्लोळामुळे तुमची शांती हरपेल. एखादी प्रामाणिक व्यक्ती तुमच्या मदतीला येईल. मॅनिप्युलेशनला बळी पडणार नाही याची काळजी घ्या. हे वगळता दिवस अनुकूल. LUCKY SIGN - A trampoline कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही आणि तुमच्या इंटरपर्सनल स्किल्ससाठी दिवस सुरळीत असेल. नव्या कमिटमेंट्स करणं फायद्याचं ठरेल. एखाद्या जवळच्या मित्राला एखादा संदेश पोहोचवण्यासाठी तुमची मदत लागू शकेल. एखाद्याला साथ देण्याचा, एखाद्याच्या बाजूने उभं राहण्याचा दिवस आहे. LUCKY SIGN - A string of lights मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) निद्रिस्तावस्थेतून जागं होऊन आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेण्याची ही वेळ आहे. तुमची उपस्थिती नसल्याचा फायदा काही जणांनी आधीच घेतला असण्याची शक्यता आहे. विचारप्रक्रिया थेट आणि स्पष्ट असली, तर पुढे जाण्यास सोपं ठरेल. तुमचा जुना बॉस तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A ruby red
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या